मराठी बातम्या /बातम्या /religion /कसा असेल 24 मार्चचा दिवस? एखाद्या गोष्टीची उत्सुकता तुम्हाला त्रास देऊ शकते

कसा असेल 24 मार्चचा दिवस? एखाद्या गोष्टीची उत्सुकता तुम्हाला त्रास देऊ शकते

 प्रत्येक राशीचं 24 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 24 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 24 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 मार्च:  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 24 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

तुमच्यावरची एखादी जबाबदारी प्रलंबित असेल, तर तुम्ही ती अगोदर पूर्ण केली पाहिजे. थोड्याशा गूढतेमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. आजचा दिवस एकंदरीत प्रॉडक्टिव्ह आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ऊर्जा अधिक संलग्न असल्यासारखं वाटत आहे.

LUCKY SIGN - A Crystal Vase

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

मूळ नियोजनात काही बदल झाल्यास ते पुन्हा तयार करावं लागू शकतं. प्रवासाचं नियोजन करत असलात, तर उशीर टाळण्यासाठी अगोदरच ते निश्चित करा. एखाद्या गोष्टीची उत्सुकता तुम्हाला त्रास देऊ शकते.

LUCKY SIGN - A Yellow Crystal

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

आश्चर्याचा धक्का मिळण्याचा योग आहे. महत्त्वाच्या घडामोडींमुळे आजचा दिवस व्यग्र असेल. कामाच्या ठिकाणी कोणी तरी तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असेल. आज महत्त्वाच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात.

LUCKY SIGN - A Blue pottery mug

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात राग असेल तर तो बाहेर काढा. भावना दाबून ठेवल्यानं तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी दुरून दिसू शकतात. काही तरी वाटाघाटी करण्यासाठी तुमच्या भावंडाला तुमच्या मदतीची आवश्यकता भासू शकते.

LUCKY SIGN - Two Feathers

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुमच्या मूळ विचाराला कोणताही पर्याय उपलब्ध नाही. नवीन गोष्टी स्वीकारण्यापूर्वी तुमच्या मनात त्यांच्यासाठी पुरेशी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्याची प्रेरणा मिळेल. पोटाच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

LUCKY SIGN - A Pyramid

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुम्ही एखादी कमिटमेंट केली असेल तर तुम्हाला ती पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहावं लागेल. तुमच्या अगदी जिव्हाळ्याची बाब असलेल्या प्रकल्पामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. तुमच्या संवाद कौशल्याचा जास्तीत जास्त वापर करा. विचारपूर्वक खा.

LUCKY SIGN - A Sticker

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

कोणी तरी पाठपुरावा करत असेल, तर तुमची अंतिम मुदत चुकली असण्याची शक्यता आहे. जे घडलं आहे त्याबद्दल प्रामाणिक असणं चांगलं आहे. अद्याप अपूर्ण असलेलं काम तुम्हाला पुन्हा सुरू करावं लागेल. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतो.

LUCKY SIGN - Old Car

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

गांभीर्याने न केलेले प्रयत्न अपेक्षित परिणाम देऊ शकत नाहीत. काही काळ तुम्ही लक्ष केंद्रित करण्याच्या समस्येशा सामना करत आहात. तुमच्या भावंडाचा मित्र तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो. दिवस मार्केटमध्ये घालवणं उपयुक्त ठरू शकेल.

LUCKY SIGN - A Blur Image

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्ही सहज गृहीत धरलेली एखादी गोष्ट खरी ठरू शकते. कौटुंबिक इतिहासातून काही तरी नवीन समोर येऊ शकतं. आज कामापेक्षा कुटुंबाला जास्त प्राधान्य राहील. तुम्ही एखाद्या गुंतागुंतीच्या समस्येचं निराकरण करू शकाल.

LUCKY SIGN - A cereal bowl

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

जी बाब आपण बदलू शकत नाही ती सोडून देणं अधिक योग्य ठरेल. आज एखाद्याच्या बाजूनं किंवा विरुद्ध निर्णय घेणं अवघड ठरू शकतं. दिवसाचा अतिशय काळजीपूर्वक उपयोग करा. एखाद्या छोट्या सहलीमुळे तुम्हाला चांगलं वाटेल.

LUCKY SIGN - A Wooden Frame

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

एखाद्या नियोजनातून तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसतील तर ते सोडून देणं योग्य आहे. ऑफिसमध्ये कोणी तरी तुमची माहिती वापरू शकतं, त्यामुळे सावधगिरी बाळगा. एखादी चांगली बातमी मिळण्याचा योग आहे. लवकरच सकारात्मक बदल दिसतील, असे संकेत आहेत.

LUCKY SIGN - A Potful of sugar

 मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

बऱ्याच काळानंतर आज एखाद्या जवळच्या मित्राशी बोलणं होऊ शकतं. मनापासून संभाषण केल्यास भूतकाळातल्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं. तुम्ही संयमी आहात याचा अर्थ तुम्ही आणखी काही काळ वाट बघू शकता. निर्णय देण्यापूर्वी तुम्ही सर्व माहिती तपासली आहे याची खात्री करा.

LUCKY SIGN - A Lavender flower

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion