मराठी बातम्या /बातम्या /religion /

Horoscope Today : संध्याकाळी तुमच्याकडे पाहुणे येऊ शकतात

Horoscope Today : संध्याकाळी तुमच्याकडे पाहुणे येऊ शकतात

 प्रत्येक राशीचं 24 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 24 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 24 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 24 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

तुमच्यासोबत वागताना भावनात्मक दृष्टीकोन ठेवला जात आहे, असं तुम्हाला वाटू शकतं, परंतु असं होऊ शकत नाही. तुमच्या जवळचे असे काही लोक असू शकतात, जे तुमच्याबद्दल खरोखर चांगला विचार करीत नसतील. तुम्ही स्वतःच ध्येय म्हणून ज्या गोष्टींचा पाठलाग करत होता, त्या गोष्टींचे पुनरावलोकन करण्याची ही वेळ आहे.

LUCKY SIGN from above – A narrow road

स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुम्हाला अशा एखाद्या गोष्टीमध्ये प्रगती होताना दिसत असेल, ज्यासाठी खूप प्रयत्न केले असतील. लक्षात ठेवा, पहिली चाल करणं हे दुर्बलतेचं लक्षण नाही. बाह्य परिस्थितींपेक्षा आंतरिक अनुभूतीला प्राधान्य देऊ शकता.

LUCKY SIGN from above – A storm

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुम्हाला कसं वाटतं? हे इतरांना लवकरच सांगावं लागेल, आणि खोट्या आश्वासनांवर अवलंबून राहून जगण्यास नकार द्यावा लागेल. पाठिंब्याची अपेक्षा करू नका, कारण तुम्हाला तो लगेच मिळणार नाही. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीमध्ये थोडीफार हालचाल दिसून येईल.

LUCKY SIGN from above – A glass jar

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

जर तुमची तयारी चांगली नसेल, तर तुम्हाला तुमच्या क्षमतांविरुद्ध, मर्यादांच्या पलीकडे ढकललं जाण्याची शक्यता आहे. पालकांचा पाठिंबा मिळेल, पण नातेवाईक तुम्हाला आश्चर्याचा धक्का देण्याचा विचार करू शकतात. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत स्वारस्य नसेल, तर तुम्ही त्यास नकार देऊ शकता.

LUCKY SIGN from above – Marigold

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुम्हाला कामासाठी प्रवास करण्याची तीव्र इच्छा जाणवत आहे.

सध्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्हाला पुढील वचनं पाळणं कठीण वाटू शकतं. आर्थिक हालचाल वाढेल.

LUCKY SIGN from above – A bridge

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

शांत राहणं नेहमीच चांगल नसतं, आणि ते आजही सिद्ध होईल. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत हस्तक्षेप करण्याचा तुमचा आग्रह वेळेवर आणि योग्य होता, असं तुम्हाला वाटेल. तुमच्या मागील कामगिरीचं कौतुक होईल. खरचं गरज असलेल्या एखाद्याला आधार द्या.

LUCKY SIGN from above – A copper jug

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

ग्राहकांकडून करण्यात येणारं कौतुक तुमचं मनोबल वाढवेल, तरीही आव्हानं चालू येत राहतील. एक चांगलं धोरणात्मक टीमवर्क तुम्हाला वैयक्तिक मर्यादा ओलांडण्यास मदत करू शकतं. तुमच्यातील स्कील अपग्रेड करण्याची संधी आता येऊ शकते.

LUCKY SIGN from above – Bright wall

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

समृद्धी आणि विपुलता हळूहळू तुमच्या जीवनाचा एक भाग बनत आहेत. तुमच्या लक्षात येईल की, तुमची कामे मार्गी लागत असून, पूर्ण होत आहेत, उद्दिष्टं पूर्ण होत आहेत. भावनिक गोष्टींमध्येही प्रगती होऊ शकते. तुमच्या नवीन सवयीत सातत्य ठेवा.

LUCKY SIGN from above – A tamarind candy

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

जर एखाद्यानं आपल्या जीवनात मुद्दाम समस्या निर्माण केल्या असतील, आणि तेव्हा आपण दुर्लक्ष करणं पसंत केलं असेल, तर आता त्यावर बोलण्याची आणि त्या समस्येचं निराकरण करण्याची वेळ आली आहे. भूतकाळात ज्यानं तुम्हाला भावनिकरित्या दुखावलं असेल, अशा व्यक्तीला क्षमा करणं कठीण होऊ शकतं.

LUCKY SIGN from above – Silver jewelry

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुम्हाला तुमच्या क्षमतांचा वापर करायचा आहे, जो तुम्ही नेहमी कमी करण्यास प्राधान्य देता. तुमचे पालक तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी प्रेरित करत असतील, तर त्याबाबत तुम्ही विचार केला पाहिजे. तुलनेने आरामदायी दिवस आहे.

LUCKY SIGN from above – A pebble

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

आजचा दिवस हा तुमच्यासाठी एक आनंदी दिवस आहे. तरी तुमची काही वेळा चिडचिड होऊ शकते. तुमचा जोडीदार तुलनेनं समजूतदार असण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तुमच्याकडे पाहुणे येऊ शकतात.

LUCKY SIGN from above – Cinnamon

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

मोठ्या समस्या हाताळण्यासाठी काही काळ थांबणं आवश्यक आहे. सध्या अगोदर लहान समस्या हाताळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला विनाकारण तणाव जाणवू शकतो. संघर्ष टाळण्याचा हा दिवस आहे, कोणतीही नवीन सुरुवात करू नका. नोकरीच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या राजकारणात पडू नका.

LUCKY SIGN from above – An abstract art

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion