मुंबई, 23 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुम्हाला इमोशनल आणि ट्रस्ट इश्युजवर नियंत्रण ठेवावं लागेल. कामामुळे अतिरिक्त थकवा जाणवू शकतो, जो तुम्हाला अपेक्षित नसेल. जर एखाद्या गोष्टीबाबत तुमच्या मनात उत्कट भावना नसतील तर ती सोडून दिली पाहिजे.
LUCKY SIGN from above – A Rose Quartz
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
अनावश्यक तणाव आणि गोंधळामुळे गोष्टी पूर्ण होण्यास उशीर होऊ शकतो. तुम्ही नेहमी जे निश्चित केलं आहे त्यापेक्षा जास्त कराल. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल कोणतीही निर्णायक कल्पना न करण्याची ही वेळ आहे. अगोदर तुमच्याकडील फॅक्ट्स तपासा.
LUCKY SIGN from above – Topaz
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमची जागा घेऊ शकेल असा लक स्ट्रोक कार्ड्सवर आहे. हे तुमच्या इच्छेच्या दिशेनं पडणारं पहिलं पाऊल असू शकतं. तुमचे सर्व संवाद साधे आणि मुद्देसूद ठेवा. थोडीशी जोखीम असली तरी संकोच करू नका.
LUCKY SIGN from above – A Pyrite Crystal
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
एनर्जीज एका रेषेत असल्यामुळे तुम्हाला आश्वस्त वाटेल आणि आत्मविश्वास उंचावेल. तुमचा जोडीदार तुमचा आधार ठरू शकतो आणि त्याच्याकडून काही उपयुक्त सल्ले मिळू शकतात. कुटुंबातील मुलं सुट्टीसाठी उत्सुक असतील. सुट्टीचं नियोजन येत्या काही दिवसांत केलं जाऊ शकतं.
LUCKY SIGN from above – A Blue Crystal
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्ही स्वतःला धाडसी व्यक्ती समजू शकता आणि कठीण परिस्थितीत तुम्हाला हे सिद्ध करून दाखवावं लागेल. कुटुंबाला मोठ्या प्रमाणात समर्थनाची गरज भासू शकते. कामातील समस्या एक एक करून सोडवल्या जाण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN from above – Clear Quartz
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुमच्या दिनचर्येत तुम्ही ज्या बदलांचा विचार केला असेल ते समाविष्ट करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एक चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तिच्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ शकतो. आजूबाजूच्या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
LUCKY SIGN from above – An Emerald
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
कोणीतरी तुमच्या पदाचा आणि सत्तेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकेल. त्यामुळे तुम्ही जागृत राहण्याची आणि संभाषणातील मुद्द्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. लहान किंवा मोठे बदल स्वीकारण्यासाठी तयार असाल.
LUCKY SIGN from above – A malachite
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
साधारण बाबींमध्ये तुम्हाला असामान्यपणा दिसेल. तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेकडून कामासाठी चांगली संधी मिळू शकते. दुसऱ्या स्रोतातून उत्पन्न मिळवण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो.
LUCKY SIGN from above – An Amethyst
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
स्वत: च्या सर्वोत्तम क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभरासाठी तुमच्या प्राधान्यक्रमांमध्ये स्पष्टता ठेवा. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही प्रेमाच्या शोधात असाल, तर लवकरच तुमची एखाद्या व्यक्तीशी भेट होऊ शकते.
LUCKY SIGN from above – A Seashell
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
जीवनाच्या गतिशीलतेमध्ये बदल होतील. पूर्वीचे पॅटर्न तोडले गेले आहेत आणि नवीन तयार होत आहेत. घडामोडींच्या काळात स्थिर राहण्यासाठी तुम्ही तुमचे पाय जमिनीवर घट्ट रोवले पाहिजेत. काही काळासाठी इतरांना कर्ज देणं टाळा.
LUCKY SIGN from above – Jade Plant
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुम्हाला एखाद्या कठीण ठिकाणाचा प्रवास किंवा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. सतत बदलणार्या परिस्थितीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि किंचित चिडचिड होईल. तुम्हाला विश्रांतीची फार गरज आहे.
LUCKY SIGN from above – A Salt Lamp
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुम्ही परदेश प्रवासाची योजना आखत असाल तर त्यासाठी आता चांगली वेळ आहे. तुम्ही एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत असल्यास, त्यात यश मिळण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या कामांची व्यवस्थित विभागणी करा जेणेकरून ती करणं सोपं होईल.
LUCKY SIGN from above – A Marble Table
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion