मराठी बातम्या /बातम्या /religion /

आजचे राशीभविष्य, 22 जानेवारी: बिझनेसमध्ये चांगलं मार्गदर्शन करणारी व्यक्ती भेटेल

आजचे राशीभविष्य, 22 जानेवारी: बिझनेसमध्ये चांगलं मार्गदर्शन करणारी व्यक्ती भेटेल

प्रत्येक राशीचं 22 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 22 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 22 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 22 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

तुम्हाला एखाद्या भ्रमात अडकल्यासारखं वाटू शकेल. आज तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी लोकांशी बोलताना खबरदारी घ्यावी, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा पूर्ण होताना दिसेल. यातूनच पुढे एखादी चांगली बिझनेस आयडियादेखील मिळू शकते.

LUCKY SIGN – A Trunk

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

समोरून येणारी कोणतीही सूचना ऐकण्याचे दिवस आता संपले आहेत. समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनात काय सुरू आहे हे प्रत्येक वेळी आपोआपच कळेल असं नाही, त्यामुळे स्वतःच ते सांगण्याचा प्रयत्न करा. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या संधी दिसून येतील. प्रेमाच्या बाबतीत आज नशीब चांगले राहील. नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न कराल, नवीन वचनं मिळतील. एखादी जुनी भीती लवकरच नाहीशी होईल.

LUCKY SIGN – A Neon Sign

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

एखादी सवयीची गोष्ट करण्यासाठी आधीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. येत्या काळात काम पूर्ण करण्यासाठी काही सोप्या पद्धती समोर येतील. आत्मविश्वास भरपूर असेल, मात्र ताणही वाढेल. गेल्या काही दिवसांपासून होणारी सौम्य चिडचिड आणखी काही काळ सुरू राहील. तुमच्या जोडीदाराचा एखादा सल्ला विचारात घेण्यासारखा असेल.

LUCKY SIGN – A New Car

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

नवनवीन संकल्पना आणि विचार येत राहतील, मात्र या विचारांना दिशा नाहीये. एखाद्या वरिष्ठ व्यावसायिकाचा सल्ला मोलाचा ठरेल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी नात्याला क्वालिटी टाईम देणं गरजेचं आहे. तुमच्या जोडीदाराचे काही गैरसमज दूर करावे लागतील. जर परिस्थिती वेळेत नियंत्रणात नाही आणली तर मोठा वाद होऊ शकतो.

LUCKY SIGN – Antique Article

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

इतरांवर दबाव आणून काम करुन घेण्याची युक्ती आता काम करणार नाही. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कदाचित तुमचा त्रास होऊ शकतो. तुमचा हेतू चांगला असला, तरी संवाद साधण्याची तुमची पद्धत बदलण्याची गरज आहे. अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींनी आपली छाप कायम ठेवावी. गेल्या काही महिन्यांपासून धोक्यात असलेल्या व्यवसायात आता सुधारणा दिसू शकते. मेटल बिझनेसमध्ये असणाऱ्या व्यक्तींना नफा होईल.

LUCKY SIGN – A Silver Coin

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

भूतकाळातील काही आठवणींचा तुमच्या नवीन दृष्टीकोनावर प्रभाव पडेल. आधीच्या चुका पुन्हा होऊ नयेत याची खबरदारी घ्याल. काही चिंतेच्या गोष्टींमध्ये स्पष्टता दिसत नसल्यास एखाद्या व्यक्तीची मदत घेणे चांगले. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे गाडी रुळावर येईल. एखाद्या सहलीचा विचार करत असाल, तर आताच नियोजन करणं उत्तम. बिझनेसमध्ये चांगलं मार्गदर्शन करणारी एखादी व्यक्ती भेटेल.

LUCKY SIGN – A Rainbow

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

एखाद्या जवळच्या मित्राला तुमच्या कौशल्याचा फायदा होऊ शकतो. संथ दिनचर्येला ब्रेक मिळेल, पुढील काही दिवस भरपूर व्यस्त असतील. तुमच्या आवडीशी जुळवून घेणाऱ्या एखाद्या नवीन संधीच्या शोधात असाल, तर ओळखीच्या व्यक्तीकडून टिप मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि दृष्टीकोनात थोडासा बदल दिसेल. हा बदल चांगला ठरेल.

LUCKY SIGN – A Red Car

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

घाईघाईत घेतलेले सर्वच निर्णय चुकीचे ठरत नाहीत याचा प्रत्यय लवकरच येईल. काही गोष्टी नशिबातच लिहिलेल्या असतात हे समजून घ्या. तुम्हाला तुमच्या निवडीवर ठाम विश्वास आहे, आणि इतर लोकही त्याला सहमत असतील. कामाच्या ठिकाणी काहीशी अशांतता असेल. मनातील वाईट विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. सध्या सरळ मार्गावर चालणे गरजेचे आहे.

LUCKY SIGN – Your Favourite Sweet

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

रिलेशनशिपमध्ये भूतकाळात केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवतील. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, मात्र तुम्ही निभावून न्याल. भरपूर डेडलाईन एकाच वेळी सांभाळायच्या असल्यामुळे थकून जाल. एखाद्या कायदेशीर प्रकरणाबाबतचे पुरावे जपून ठेवण्याची गरज आहे. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती गोपनीय माहिती बाहेर पसरवू शकते, त्यामुळे खबरदारी घ्या.

LUCKY SIGN – An Indoor Plant

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीवर विचार करत होता, ती आता अंमलात आणण्यासाठी चांगली वेळ आहे. बिझनेस आयडियांमधून सुरूवातीला चांगले परिणाम दिसून येतील. पार्टनरशिप केल्यामुळे मदत आणि फायदा दोन्ही होईल. विवाहासाठी अनुरूप स्थळ चालून येईल. तुमचे विचार सध्या अगदी स्पष्ट आहेत. मित्रांसोबतचा एखादा अचानक ठरलेला प्लॅन थेरपीप्रमाणे काम करेल.

LUCKY SIGN – A Candle Stand

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

उच्च शिक्षणामध्ये येत असलेले अडथळे आता दूर होण्याची शक्यता आहे. एखादी ग्रँट किंवा मदत मिळेल. घरापासून दूर राहत असाल, तर काही काळ होमसिक वाटेल. व्यायाम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आता अनुकूल काळ आहे. आरोग्याच्या समस्यांमुळे काही काळ चिडचिड होईल.

LUCKY SIGN – A Yellow Stone

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

एखाद्या फॅमिली फ्रेंडकडून नव्या कामाच्या संधीची माहिती मिळेल. एका वेळी एकाच कामावर लक्ष दिल्यास अपेक्षित परिणाम दिसून येतील. अर्थात, सध्या यामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. आजूबाजूच्या नवीन लोकांमध्ये तुमच्याबद्दल काही गैरसमज निर्माण होईल, ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दैनंदिन जीवनातून ब्रेक म्हणून एक छोटीशी सहल फायद्याची ठरेल. बाहेरगावी आलेला एखादा अनुभव तुमच्यावर दूरगामी परिणाम करेल.

LUCKY SIGN – A Napkin Holder

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion