मुंबई, 20 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio
www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (21 मार्च ते19 एप्रिल)
भूतकाळात योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक होईल. कोणी तुम्हाला विनाकारण जज करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. ऑफिसमधलं काम पूर्ण असेल याकडे लक्ष द्या. त्याबाबत अचानक तपासणी होण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – Floral slippers
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
सहलीचं नियोजन महिन्याच्या मध्यात करा. आजचा दिवस नियोजन करण्याचा आणि एका वेळी एक गोष्ट हातात घेण्याचा आहे. प्रगतिशील भविष्याच्या नियोजनाचे चांगले संकेत आहेत. रोख रकमेचा अडकलेला ओघ सुरळीत होईल.
LUCKY SIGN – A bunch of gooseberries
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
आजचा दिवस ऊर्जा तुमच्या बाजूने आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्हाला जे करायचं आहे ते करता येईल. भावंड किंवा नातेवाईकाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते. संध्याकाळी अचानक एखादी खास व्यक्ती भेटायला येऊ शकते.
LUCKY SIGN – Silver wire
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्ही स्वत:साठी खरेदी करणार असाल, तर त्यात तुम्ही गुंतून पडाल. कामाच्या ठिकाणी डेडलाइन पाळण्याची गरज आहे. घरात मदत न मिळाल्याने नेहमीच्या कामात अडचणी येतील.
LUCKY SIGN – A metalic art
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
टीमवर्क हाच तुमच्यासाठी आजचा खास लक्ष देण्याचा मंत्र आहे. कामासाठी कोलॅबोरेशनची संधी मिळाल्यास, ती जरूर स्वीकारा. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वादाचा तुमच्या दिवसावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आता त्याकडे दुर्लक्ष करा आणि कोणत्याही गोष्टीबाबत घाई-गडबडीने निष्कर्ष काढू नका.
LUCKY SIGN – Colored bottle
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुमचं एखादं काम अडलं असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी एखाद्याला खूश करण्याची गरज असेल, तर त्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. सध्याच्या काळात अल्पकाळासाठीचं नियोजन लाभदायी ठरेल. आज रात्री पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज राहा. त्यांच्या स्वागतासाठी तुमची सर्व तयारी झालेली असल्याची खात्री करा.
LUCKY SIGN – A wooden box
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
कुटुंबीयांबरोबर घरात प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन वेळ व्यतीत करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी कसोटी लागण्याची, काम वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं, योगदानाचं मूल्यमापन केलं जाईल. अतिताणामुळे थकवा जाणवू शकतो.
LUCKY SIGN – A painting
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुमची जुनी आवड, छंद कायमस्वरूपी बाजूला पडू देणार नाही, अशी शपथ घ्या. तुमचा छंद, आवड नव्याने जोपासण्याची वेळ आली आहे. आजचा दिवस प्रगतिशील असेल; मात्र आळशीपणामुळे ज्याची सुरुवात कराल ते संथपणे पूर्ण कराल.
LUCKY SIGN - Ice cream
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
दूरवरून किंवा परदेशातून आलेला एखादा फोन कॉल तुमचा दिवस आनंददायी करेल. तुम्ही कोणी तरी खास असल्याची भावना निर्माण होईल. एखादी लहानशी सहल होईल. तुमच्या सध्याच्या नात्यात काही प्रश्न निर्माण होतील. त्यांची उत्तरं तातडीने शोधणं महत्त्वाचं ठरेल.
LUCKY SIGN – A ball
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आरोग्याच्या दृष्टीने नवीन दिनचर्या सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यासाठी एखादं पुस्तक किंवा लेख प्रेरणादायी ठरू शकतो. एखादी गोष्ट हरवली आहे, असं तुम्ही समजत असाल तर ती सापडू शकेल.
LUCKY SIGN – A fly
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार करत असाल तर त्या दिशेने पुढे जाण्याचे संकेत मिळू शकतात. आपल्या मनाचं ऐका. नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवा. दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल.
LUCKY SIGN – Dew drops
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
एखाद्या बाहेरच्या व्यक्तीकडून वेळेवर मिळालेली एखादी चांगली सूचना खूप वेळ वाचवेल. एखादा प्रलंबित राहिलेला निर्णय घेण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास आणि खात्री वाटेल. कुटुंब आणि मित्रपरिवाराला अधिक प्राधान्य द्याल.
LUCKY SIGN – A lake
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.