मराठी बातम्या /बातम्या /religion /कसा असेल आजचा दिवस? काही प्रलंबित विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे

कसा असेल आजचा दिवस? काही प्रलंबित विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे

प्रत्येक राशीचं 20 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 20 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 20 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 20 फेब्रुवारी:  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (21 मार्च ते19 एप्रिल)

  अनेकांना सरप्रायझेस मिळण्याची शक्यता आहे. तसंच सेलिब्रेशन्सचीही शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीला ग्रहांची साथ आहे; मात्र अंतिम वाटाघाटींदरम्यान शांत राहा. होमवर्क उत्तम रीतीने करण्यासाठी वेळ द्या. कामांना गती देण्याची शिफारस केली जात आहे.

  LUCKY SIGN - A tall glass

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  गेल्या काही काळात खूप भावनिक चढ-उतार अनुभवले असतील; मात्र आता तुम्हाला संतुलित वाटत असेल. काही जुन्या परंपरा उशिराचं कारण बनू शकतील. घरात शांतता राखण्यासाठी वडिलधाऱ्यांचं म्हणणं ऐकावं लागेल.

  LUCKY SIGN - An artifact

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  अचानक नियोजनात काही बदल करावे लागल्यामुळे दिवस ठरवल्यापेक्षा वेगळ्याच कामात जाईल. तुम्हाला एखाद्या इव्हेंटचं आमंत्रण मिळू शकेल आणि तिथे एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. ही ओळख पुढे वाढू शकते.

  LUCKY SIGN - A silver coin

  अंथरुणावर बसून जेवण केल्याने वाढते कर्ज, वास्तुचे हे नियम माहिती आहे का?

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करत असाल, तर थोडी चिंता, अस्वस्थता वाटेल; पण काळ अनुकूल आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे पुढे पाऊल टाकू शकता. एखाद्या बाबतीत निर्णय घेण्याबाबत तुमच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्यासाठी स्पष्टता येईपर्यंत अधिक वेळ घेऊ शकाल.

  LUCKY SIGN - A limited edition article

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  आजचा दिवस चमकण्याचा आहे. स्वतःच्या अटींनुसार सगळ्या गोष्टी पूर्ण करून घ्याल. तुम्ही अगदी सहजपणे इतरांना मागे टाकाल. तुमची प्रशंसा होईल. आजच्या कामगिरीसाठी तुम्हाला लवकरच बक्षीस मिळेल.

  LUCKY SIGN - A sponge

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  दिवसाची सुरुवात संथ होऊ शकते; परंतु दुपारनंतर वेग वाढू शकतो. तुमच्या रोजच्या रूटीनचा तणाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या. एखाद्या गोष्टीची अधिक चिकित्सा करण्याऐवजी ती आहे तशी चांगल्या पद्धतीने स्वीकाराल.

  LUCKY SIGN - A straw

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  गेल्या काही वर्षांत तुम्ही प्रगल्भ झाला आहात. परिस्थितीकडे बारकाईनं पाहण्याची, ती समजून घेण्याची क्षमता तुमच्याकडे आली आहे. आता तुमच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तुमच्या अगदी जवळची, तुमच्यावर अवलंबून असलेली एखादी व्यक्ती ताणात असण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - a salon nearby

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  तुम्ही ज्यांच्याप्रति वचनबद्ध आहात, त्यांच्यासोबत गरजेच्या वेळी असण्याला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे; मात्र तुमच्याकडून असं घडत नसल्यानं तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही प्रॉपर्टी डीलिंग करत असाल तर योग्य वेळ येण्याची वाट पाहा.

  LUCKY SIGN - An emerald

  या 5 चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी, म्हणून या वास्तू फॉलो करून मिळवा समाधान

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  आजचा दिवस तुमच्यासाठी अगदी डायनॅमिक आहे.अनेक संधी तुमच्यासाठी खुल्या होतील. सध्या त्या लहान असतील, पण इंटरेस्टिंग असतील. काही प्रलंबित विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. फोन-मेसेजेसना उत्तर देणं योग्य ठरेल.

  LUCKY SIGN - A golden embroidery

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  आजचा दिवस काही विशेष फोकस नसूनही चांगला जाईल. पुढच्या काही गोष्टींचं नियोजन करण्यासाठी आजचा दिवस सत्कारणी लावू शकता. एखादा मित्र अचानक तुम्हाला भेटायला येईल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. आईच्या तब्येतीची काही चिंता उद्भवू शकते.

  LUCKY SIGN - A saltwater tub

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  स्वप्नासारखं वाटत असेल; मात्र कोणाची तरी खूप उणीव तुम्हाला जाणवत असेल. परंतु वास्तवाचं भान ठेवून भविष्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भावनिक संतुलनासाठी आध्यात्मिक साधनेत गुंतण्याची गरज आहे.

  LUCKY SIGN - A cement bag

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  आपल्या भावना जाहीर केल्यास दुखावले जाण्याची भीती वाटत असेल; पण जाहीर न केल्यास बेचैनी येईल. अशा परिस्थितीत त्या

  लिहून पाठवण्याचा मार्ग निवडू शकता. तुमचं रहस्य जाणणारा विश्वासू मित्र अवलंबून राहण्यासाठी योग्य व्यक्ती आहे.

  LUCKY SIGN - A water body

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion