मराठी बातम्या /बातम्या /religion /कसा असेल 19 मार्चचा दिवस? आठवडाभरात आर्थिक घडामोडीही वेग घेतील

कसा असेल 19 मार्चचा दिवस? आठवडाभरात आर्थिक घडामोडीही वेग घेतील

प्रत्येक राशीचं 19 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 19 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 19 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 19 मार्च: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    तुम्ही तुमच्या जुन्या आवडीकडे परत वळलात, तरी आयुष्यात अचानक खूप मोठा बदल घडणार नाही. सध्या आयुष्य थबकल्यासारखं वाटत असेल. त्याला गती मिळणं गरजेचं आहे. हा एक तात्पुरता टप्पा आहे. आठवडाभरात आर्थिक घडामोडीही वेग घेतील. काही जणांना मानसिक स्वास्थ्यासाठी पाळीव प्राणी घरी आणावेसे वाटतील. नवीन मित्र-मैत्रिणी जोडण्यापेक्षा जुन्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहणं अधिक आनंददायी वाटेल.

    LUCKY SIGN - An open gate

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    तुमच्याकडे येणाऱ्या नवीन संधींचा वेळेवर आणि चांगला उपयोग करा. तुमच्या सध्याच्या कामाला हळूहळू गती मिळत आहे. तुम्ही स्वतःसाठी काही मोठी उद्दिष्टं निश्चित केली आहेत. ती पूर्ण होणार नाहीत, अशी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. घरातले प्रश्न घरातच सोडवणं योग्य ठरेल. आरोग्याच्या दृष्टीनं नवीन दिनचर्या आखून त्याचं पालन केल्यास मानसिकदृष्ट्या अधिक सक्रिय राहाल.

    LUCKY SIGN - A rose petal

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    नूतनीकरण करण्याचा विचार मनाची मोठी जागा व्यापण्याची आणि तो आकार घेण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचा नवा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी खूप वेळ आणि कमिटमेंटची गरज असेल. तुम्हाला आता ते करण्याची इच्छा असेल. नवनवीन पर्याय आजमावण्यासाठी तुम्ही तयार असाल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. भूतकाळात घडलेल्या त्रासदायक आणि नकारात्मक गोष्टी आता मागे पडतील. सकारात्मक ऊर्जा नवी दिशा देईल. व्यापारी, रिअल इस्टेट व्यावसायिक आणि छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यासाठी हा चांगला काळ आहे.

    LUCKY SIGN - A buddha statue

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    सध्या 'थांबा आणि वाट पाहा' असं धोरण स्वीकारण्याची वेळ आहे; मात्र तुम्ही कृतीवर आधारित नियोजनावर भर देणार असलात, तर थोडं थांबण्याची आवश्यकता आहे. तपासून घेतलेल्या आणि विश्वासार्ह स्रोतांवर अवलंबून राहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या लोकप्रियतेचा, प्रसिद्धीचा कोणी तरी फायदा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं कामाच्या ठिकाणी बदलणाऱ्या वातावरणापासून सावध राहा. कदाचित ते तुमच्यासाठी प्रतिकूल ठरतील. घर हीच जागा शांतता देणारी आणि अवलंबून राहता येण्याजोगी आहे.

    LUCKY SIGN - A portrait

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    एखाद्या नव्या बांधिलकीच्या दिशेनं तुमचा प्रवास सुरू होईल. मर्यादित जोखमीसह घेतलेला आक्रमक दृष्टिकोन तुमच्या प्रगतीला पूरक ठरेल. तुमच्या नैसर्गिक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा वापर करून तुमचं नेटवर्क विकसित करा. तुमचं प्रभावी व्यक्तिमत्त्व लोकांना आकर्षित करेल आणि तुमच्या मतांची आणि विचारांची दखल घेण्यास भाग पाडेल. घरगुती आघाडीवर काही किरकोळ कुरबुरी होऊ शकतात. अचानक जुळून आलेलं गेट-टुगेदर आनंदाचा शिडकावा करील, तुम्हाला नवी ऊर्जा, उत्साह देऊन जाईल.

    LUCKY SIGN - A box of sweets

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    आपल्या क्षेत्रात लोकप्रिय असलेली एखादी व्यक्ती तुमच्या तज्ज्ञतेमुळे तुम्हाला भेटू शकेल. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या एखाद्या गोष्टीवर प्रयोग करायचं ठरवाल. एखादी गोष्ट गोपनीय ठेवणं कठीण होईल; मात्र ते गुप्त ठेवणं आवश्यक असेल. सकाळी वर्कआउट करणं जमत नसेल तर काही काळाकरिता त्यासाठी थोडी उशिराची वेळ निवडा. जवळची नाती आणि बिझनेस यांची गल्लत करू नका. ते परस्परांशी जोडू नका.

    LUCKY SIGN - A name tag

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    सध्या काहीही पुढे सरकत नसल्याचं जाणवेल; पण ते चुकीचे संकेत असू शकतात. नवं काही घडत असल्याचंही तुम्ही कदाचित पाहू शकणार नाही; पण एखादा बोगदा ओलांडेपर्यंत कसा अंधार असतो, तसा हा टप्पा तात्पुरता आहे. लवकरच ही स्थिती बदलेल. तुम्ही नवीन योजना आखाल, तुमची भरभराट होईल. तुमच्या प्रमोशनबद्दलची चर्चा पुन्हा सुरू होईल.

    LUCKY SIGN - A walking stick

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    चांगल्या मनाच्या माणसांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात. तुमचा दृष्टिकोन नेहमीच चांगला असतो. त्यामुळे तुमची प्रगती होण्यास मदत होईल. तुमच्या घरी येणारी/येणारा मदतनीस आजारी पडू शकते/शकतो. शक्य असल्यास त्यांना अवश्य मदत करा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी कराल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अधिक संशोधनासाठी ही अगदी योग्य वेळ आहे.

    LUCKY SIGN - A wooden box

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    तुम्‍ही एखादी गोष्ट खरेदी करण्‍याचा तसंच मित्रमैत्रिणीसोबत मजा करण्याचा, वेळ घालवण्‍याचा बेत आखत असाल तर नशीब तुम्हाला साथ देईल. बागकाम हा एक चांगला छंद आहे. त्यातून तुम्हाला व्यवसायाची कल्पनादेखील सुचू शकेल. तुमच्या कामाची गती संथ झाली असेल तर त्याला गती देण्यासाठी काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. धावपळीच्या आयुष्यात थोडा बदल म्हणून एखाद्या सहलीला जाण्याचा योग आहे.

    LUCKY SIGN - Pink flowers

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    कुटुंबासोबत एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार मनात येऊ शकेल. या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला चांगला प्रोजेक्ट मिळण्याची किंवा डील होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याविषयी सार्वजनिकरीत्या टीका करू नका. पुढे-मागे त्यांच्या कानावर ही गोष्ट जाऊ शकते. तुमच्याकडे व्यवस्थापनाची हातोटी आहे. मोठ्या प्रमाणावर एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या क्षमतेचा वापर करा.

    LUCKY SIGN - A brand new coin

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    तुमच्या एखाद्या मित्राला तुमची गरज आहे. ते ओळखून त्याला मदत करा. काही वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकारांसारखे काही प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता आहे; पण आता तुम्हाला त्याचा आधीच अंदाज येईल. तुम्हाला प्रयोग करायला आवडतात; मात्र त्यासाठी आधी योग्य संशोधन करत नसल्यानं अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. लग्न पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. खरोखरच मनापासून तुमचं कौतुक असणारी व्यक्ती भेटेल. सध्या तरी कोणतीही भागीदारी करू नये.

    LUCKY SIGN - An aquarium

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    कामाच्या बदल्यात मिळालेला परतावा निराशाजनक वाटण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळीवर काही नवीन गोष्टी करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. एकटेपणा जाणवत असेल तर जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधल्यास तो कमी होऊ शकेल. हवामान तुमच्या प्रवासाच्या नियोजनामध्ये अडथळे आणेल. ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा. तुमच्या प्रश्नांवर, समस्यांवर तुमच्या आई-वडिलांकडे उत्तर असू शकतं. तुम्ही त्यांच्याकडे जाणं महत्त्वाचं आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पुढील आठवडा अगदी व्यग्रतेचा ठरणार आहे.

    LUCKY SIGN - Tangerine plates

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion