मराठी बातम्या /बातम्या /religion /कसा असेल 18 मार्चचा दिवस? आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागू शकेल

कसा असेल 18 मार्चचा दिवस? आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागू शकेल

कसा असेल 18 मार्चचा दिवस?

कसा असेल 18 मार्चचा दिवस?

प्रत्येक राशीचं 18 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 18 मार्च: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    एखाद्या गोष्टीला वेळ लागला, तर त्याचा अर्थ असा नव्हे, की ती गोष्ट होणारच नाही. तुम्हाला संयम बाळगायला हवा. कामाच्या ठिकाणी टीका होऊ शकते. प्रवासाचं नियोजन करत असलात, तर तो आता कदाचित पुढे ढकलला जाऊ शकतो.

    LUCKY SIGN - A solitaire

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    तुम्ही भूतकाळात अनुभवलेला किंवा कल्पना केलेला एखादा क्षण पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी आणखी काही निकषांची पूर्तता करावी लागेल. अशक्य ती गोष्ट शक्य होऊन लग्न होण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN - Two feathers

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    आजचा दिवस तुम्हाला स्वतःला शक्ती देण्याचा आणि काही तरी नवा प्रयोग करण्याचा आहे. अशा काही गोष्टी असतील, की ज्यावर तुम्हाला तातडीने लक्ष केंद्रित करावं लागेल. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागू शकेल.

    LUCKY SIGN - A wooden box

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला उपलब्ध वेळ कमी असल्याची जाणीव करून देतील. तुम्हाला तुमच्या कामाचा वेग वाढवावा लागेल. एखादी नवी कल्पना कामाला नवा उत्साह देईल. विश्रांती घेणं हीदेखील तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

    LUCKY SIGN - White slab

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    तुम्ही एखादी गोष्ट खूप ताणून धरण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते आता सोडून देण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या रागाचं दर्शन घडवलंत तर तुमची मनःशांती ढळेल. ओळखीच्या व्यक्तीची एखादी कृती तुम्हाला वेळेवर उपयोगी ठरेल.

    LUCKY SIGN - A jade plant

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    तुम्ही तुमच्यासाठी मिळवलेल्या एखाद्या गोष्टीसाठी सेलिब्रेशन होण्याचे योग आहेत. तुमच्या बिझनेसचा आढावा घेण्यासाठी योग्य काळ. तुम्ही नजीकच्या भूतकाळात घेतलेल्या निर्णयांबद्दल विचार आणि कृती करण्यासाठी काही वेळ काढा.

    LUCKY SIGN - A sticker

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    एखाद्या गोष्टीमुळे तुमचं लक्ष विचलित होत असेल, तर तुम्ही ते तसं होऊ देत असल्यामुळे होत आहे. तुमच्या सहकाऱ्याकडे अशी एक कल्पना आहे, की ज्यातून उत्पन्नाचा एखादा नवा स्रोत निर्माण होऊ शकतो. ट्रिपचं नियोजन करत असलात, तर त्यासाठी हा योग्य काळ आहे.

    LUCKY SIGN - Sunshine

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    आज तुम्हाला नशीबवान असल्यासारखं वाटेल. आजच्या दिवसात तुम्ही स्वतःसाठी ठरवलेली सगळी कामं पूर्ण कराल. स्टॉक मार्केट गुंतवणूक अनुकूल ठरेल.

    LUCKY SIGN - Yellow candles

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    एखाद्या विचारापासून तुम्ही दूर पळत असलात, तर तुम्ही त्याकडे पूर्ण लक्ष देईपर्यंत तो तुमची पाठ सोडणार नाही. एखादी महत्त्वाची गोष्ट करण्यासाठी तुम्हाला धैर्याची उणीव भासेल. आजचा दिवस हेक्टिक असेल. तुम्ही कामं लवकर संपवू शकणार नाही.

    LUCKY SIGN - A silicon mould

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    सरप्राइज वेगवेगळ्या स्वरूपात येऊ शकतं. त्यापैकी काही तुम्हाला आवडणार नाहीत. तुमच्या अ‍ॅटिट्यूडमुळे कोणी तरी दुखावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल.

    LUCKY SIGN - A crystal tumbler

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    परीक्षेचे रिझल्ट्स तुमच्या अपेक्षेप्रमाणे लागणार नाहीत. तुमचं काम करून घेण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि क्लृप्तीची गरज आहे. आजचा दिवस दमवणारा असेल; मात्र चांगल्या नोटवर संपेल. बेदरकारपणे ड्रायव्हिंग करणं टाळा.

    LUCKY SIGN - An umbrella

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    तुम्ही पाहिलेल्या एखाद्या गोष्टीतून प्रेरणा घ्याल. आज अंतर्मुख होणं उपयुक्त ठरणार नाही. कामाच्या ठिकाणी कोणी तरी तुमच्यावर आरोप करील. आजचा दिवस काहीसा अनियोजित ठरेल.

    LUCKY SIGN - A blue sky

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion