मुंबई, 18 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
काही जणांना आळसावल्यासारखं आणि काम करू नये असं वाटू शकेल. परिणामी उगाचच गोष्टी लांबणीवर पडू शकतात. तुम्ही चिंता शांत करण्यासाठी रिटेल थेरपीचा वापर करू शकता.
LUCKY SIGN – An album
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
मौल्यवान नात्यांसाठी सतत काम करावं लागतं. तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून आणखी संवादाची अपेक्षा असू शकते. प्रवाह तुमच्या विरुद्ध असेल, तर त्यापासून सुरक्षित अंतर राखणं चांगलं.
LUCKY SIGN – An old motorcycle
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमची जबाबदारी वाटून घेण्यासाठी एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते. ही तुमच्या प्रगतीसाठी चांगली बातमी आहे.
आताच तुमच्या प्रलंबित असाइनमेंट्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वेळेवर झालेल्या आठवणीमुळे अतिरिक्त काम करणं वाचेल.
LUCKY SIGN – A key chain
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्ही कितीही व्यग्र असलात तरी कुटुंबीयांच्या संपर्कात राहणं लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही जमिनीवर राहाल. एखाद्या क्रीडा प्रकारात तुम्हाला रस वाटू शकेल. नेतृत्वाची संधी लवकरच मिळू शकेल.
LUCKY SIGN – A pearl
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्ही आधी कोणाला दुखावलं असेल, तर त्यांनी तुम्हाला कदाचित अजूनही माफ केलेलं नाही. समेट करण्यासाठी हीच वेळ योग्य असू शकते. कॉलेजचे मित्र रियुनियन प्लॅन करू शकतात. अति खाणं टाळण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
LUCKY SIGN – A rainbow article
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
पुढे येणाऱ्या आव्हानांसाठी तुमचं मन तयार करा. परदेशात जाण्याची संधी तुमच्यासमोर चालून येऊ शकते. दिवसाअखेर तुम्ही काही वेळ एकांतात एन्जॉय करण्यात घालवण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – A coffee shop
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे घरातलं चांगलं वातावरण बिघडू शकतं. नियोजित नसलेलं एखादं अतिरिक्त काम तुम्हाला मिळू शकतं. मनोरंजनाचा एखादा नवा स्रोत तुमचं लक्ष वेधू शकतो.
LUCKY SIGN – A glass jug
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत सजग राहा. तुम्ही आता सहभाग घेतल्यास नंतर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शेजारी निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला प्रगती पाहायला मिळू शकते.
LUCKY SIGN – A set of batteries
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
काही वेळा काहीच बातमी न मिळणं हीदेखील चांगली बातमी असते. आजचा दिवस अनियोजित असू शकेल. प्रवाहाबरोबर जात राहा. तुम्हाला लवकर झोपायची इच्छा होऊ शकते. तुम्ही एखाद्या लांबच्या व्यक्तीशी अर्थपूर्ण संवाद साधाल.
LUCKY SIGN – Old favorite novel
दोन ग्रहांचे संक्रमण, या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
युतीसाठी नव्याने येणाऱ्या संधीसाठी तुम्ही सज्ज होऊ शकता. रस्ता मोकळा आणि सरळ वाटला, तरी तपशीलांची नीट पाहणी करा. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्ती कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे सहकार्य करणार नाहीत.
LUCKY SIGN – A copper glass
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
आज जे काही घडेल तसं स्वीकारल्यास आजचा दिवस सोपा वाटेल. एखाद्या दिवशी थकल्यासारखं वाटणं सामान्य आहे. स्वतःला विश्रांती घेण्यासाठी वेळ द्या. कोणत्याही कामाचं मूल्यांकन करण्याआधी सर्व बाबी योग्य असल्याची खात्री करा.
LUCKY SIGN – A cereal bowl
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुमच्या चांगल्या मित्राला कौटुंबिक प्रकरणात तुमच्या मदतीची गरज भासू शकते. तुमच्या सहकाऱ्यांवर जास्त टीका न करण्याचा प्रयत्न करा. पूर्वी बचत केलेले पैसे आता उपयुक्त ठरू शकतात.
LUCKY SIGN – A crystal jar
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion