मुंबई, 14 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
आजचा दिवस काहीसा मंद, संथ असेल. तुम्हाला आळसावल्यासारखं वाटेल; पण दुपारपर्यंत ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे. अचानक घडलेल्या एखाद्या गोष्टीमुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A blue stone
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुमच्या संवाद कौशल्यांसाठी आजचा दिवस अगदी सहज-सोपा असेल. नव्या कमिटमेंट्स करणं फायद्याचं ठरेल. एखादा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला तुमचं साह्य आवश्यक वाटेल. एखाद्याच्या बाजूने उभं राहणं, साह्य करणं यासाठीचा दिवस आज आहे .
LUCKY SIGN - A tiara
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमच्या सभोवती घडत असलेल्या प्रचंड नाट्यमय घडामोडींमुळे तुमची शांतता हरवून बसेल. एखादी खरंच प्रामाणिक असलेली व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. तुम्ही कोणाच्या मॅनिप्युलेशनचा भाग होणार नाही, याची काळजी घ्या. हे वगळता अन्य दिवस तुम्हाला अनुकूल आहे.
LUCKY SIGN - A moss stick
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्ही शोधत असलेलं रहस्य उलगडेल. तुमच्या मनात बराच काळ सुरू असलेल्या एखाद्या गोष्टीचे क्लूज मिळतील. ही गोष्ट तो विषय बंद होण्याच्या दिशेने महत्त्वाची ठरेल. तुम्ही गोष्टींकडे थोडं वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे. जुन्या पद्धतींना आता कदाचित काही मूल्य नसेल.
LUCKY SIGN - An angel sign
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्ही तुमचं अॅग्रेशन सोडून दिलं, तर तुम्हाला सर्वोत्तम संधी मिळतील आणि सर्वांत कमी चिंता तुमच्या वाट्याला येतील. स्वतःवरचं नियंत्रण गमावल्याची किंमत मोजत असल्याची भावना मनात येणार नाही. व्यायाम, ध्यानधारणा यांची नितांत गरज आहे.
LUCKY SIGN - A silk belt
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
पुढचं पाऊल उचलायला का-कू करू नका. ही रिस्क घेणं योग्य ठरेल. नव्या वातावरणाशी तुम्हाला लवकरच जुळवून घ्यावं लागेल. घर किंवा ऑफिस बदलण्याचा विचार करत असलात, तर लवकरच तसा योग येण्याचे संकेत आहेत.
LUCKY SIGN - A milestone
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
तुम्ही नुकतीच एक मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. आता ब्रेक घेऊन पुढचं प्लॅनिंग करण्याची वेळ आहे. अनेक कल्पना तुमच्या मनात असतील. त्यातून नेमकी योग्य कल्पना तुम्ही निवडाल, याची दक्षता घ्या. पैशांचा प्रवाह सुरळीत राहील.
LUCKY SIGN - A signature tune
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुमची मुलं आज तुमच्या मनाचा कोपरा मोठ्या प्रमाणावर व्यापतील. त्यांना तुमच्याकडून लक्ष दिलं जाण्याची, तुम्ही वेळ देण्याची अपेक्षा आहे. भूतकाळात केलेली एखादी गुंतवणूक आता उपयोगाला येईल. तुम्ही लवकरच एखादं गेट-टुगेदर प्लॅन करण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A red ribbon
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
बऱ्याच काळापूर्वी कोणी तुमच्याकडून काही उधार घेतलं असेल, तर ती व्यक्ती आता ते परत करील किंवा निदान तसा विचार तरी त्या व्यक्तीच्या मनात येण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला अगदी जवळून फॉलो करत आहात. आता व्यक्त करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकेल.
LUCKY SIGN - A hat
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आज तुम्ही भूतकाळात रमण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुम्ही प्राप्त केलेलं उत्तुंग यश आठवेल. दिवसाची सुरुवात संथ होईल; मात्र नंतर तुम्हाला ऊर्जा मिळेल. दिवसभरात फार काही घडामोडी घडणार नाहीत.
LUCKY SIGN - A trolley
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुम्ही काही महिन्यांपूर्वी ज्याची कल्पना केली होती, अशा कालखंडाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करत आहात. परदेशातून आलेली व्यक्ती तुमच्यासाठी एखादी संधी घेऊन येण्याची शक्यता आहे. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली असेल, तर आता त्याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे.
LUCKY SIGN - A star
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
आजचा दिवस असा आहे, की ज्यात तुम्हाला तुमच्या प्रगतीची आतून जाणीव होईल. तुम्ही याची नोंद घ्याल, की काही गोष्टी तुमच्यासाठी एकत्र येत आहेत. आयुष्यातल्या घडामोडी चांगल्या दिसतात. ब्रेक घेण्याचं प्लॅनिंग करत असलात, तर ते आणखी काही काळ टाळा.
LUCKY SIGN - A perfume bottle
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion