मराठी बातम्या /बातम्या /religion /या राशीच्या करिअरच्या मार्गात लवकरच वृद्धी होण्याचे संकेत आहेत !

या राशीच्या करिअरच्या मार्गात लवकरच वृद्धी होण्याचे संकेत आहेत !

प्रत्येक राशीचं 13 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 13 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 13 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 13 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 13 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  आज तुमच्या भीतीला सामोरं जाण्याचा दिवस आहे, खासकरून तुम्हाला सार्वजनिक कार्यक्रमात बोलायला किंवा मोठ्या श्रोतृवर्गासमोर बोलायला भीती वाटत असेल तर... तुमच्या आतल्या आवाजावर तुम्हाला आणखी विश्वास ठेवायला हवा. तुमच्यातली छुपी सर्जनशीलता मोकळी करा.

  LUCKY SIGN - A magnet

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  जुन्या मित्राची भेट घेऊन तुम्ही आज तुमचे भावनिक लाड करू शकता आणि गतकाळाच्या स्मृतींमध्ये रमू शकता. करिअरच्या मार्गात लवकरच वृद्धी होण्याचे संकेत आहेत. फोकस्ड राहा.

  LUCKY SIGN -A turtle

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  आजचा दिवस सत्य बोलण्याचा आणि कोणतीही सत्य बाब न लपवण्याचा आहे. तुम्हाला तसं करण्यास पूर्वी भाग पाडलं गेलं असेल; मात्र आता तसं नाही. तुम्ही कोणत्या व्यापारात असलात, तर तुम्हाला मिळणं अपेक्षित असलेल्या परवानग्या काही काळ रखडू शकतील.

  LUCKY SIGN - A fengshui camel

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  तुम्ही काही नवं करण्याचा प्रयत्न करत असलात, तर प्रॅक्टिस करा. तसं नसेल, तर त्याची सत्यता तुम्हाला लवकरच कळेल. तुमच्या प्रगतिशील दृष्टिकोनाचं तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाकडून कौतुक केलं जाईलच असं नाही.

  LUCKY SIGN - A diamond

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांना नवे मार्ग दिसू शकतील. ज्या पर्यायांबद्दल तुम्हाला याआधी काही माहिती नसेल, तेही समोर येतील. सांगोवांगीच्या गोष्टींवरचं तुमचं अवलंबित्व कमी करा आणि गोष्टींची सत्यता तुम्ही स्वतः पडताळून घ्या.

  LUCKY SIGN - Painted glass

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  एखादी संधी अचानक समोर येईल आणि त्यातून चांगलं मानधनही मिळेल. ती संधी स्वीकारण्यापूर्वी अतिविचार करू नका. एखादा जवळच्या मित्राला असूया वाटत असल्याचे संकेत उघडपणे दिसू शकतील.

  LUCKY SIGN - Riverside pebbles

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्याचा आणि चांगल्या कारणांसाठी दखल घेतली जाण्याचा आहे. तुम्ही कोणाच्या तरी अप्रूव्हलची वाट पाहत असलात, तर ते तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या समर्पण भावनेमुळे तुमचं कौतुकही होईल.

  LUCKY SIGN - A crossword

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  भूतकाळातल्या एखाद्या गोष्टीची सुटका होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती येऊ शकते, जिथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या दोन गोष्टींमधून एका गोष्टीची निवड करावी लागू शकेल. आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - An aquarium

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  तुम्ही अवघड परिस्थितीचं व्यवस्थापन नेहमीचं चांगल्या पद्धतीने केलं आहे; मात्र इतरांनी तुमचं ते कौशल्य गृहीत धरलं आहे. आताची वेळ दोन पावलं मागे घेण्याची आणि फक्त निरीक्षण करण्याची आहे. तुम्हाला ज्या मदतीची गरज आहे, ती कदाचित वेळेवर न मिळण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - A ruby

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  तुमचं भावंड किंवा जवळच्या मित्राची काही समस्या सोडवण्यात आजचा दिवस व्यतीत होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रोफेशनल फ्रंटला सध्या कमी प्राधान्यक्रम असू शकेल. वीकेंडला पैशांचा प्रवाह वाढू शकेल.

  LUCKY SIGN - A round table

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  अलीकडच्या एखाद्या हालचालीमुळे तुम्ही अस्वस्थ झाला असाल; मात्र लवकरच त्या परिस्थितीचे काही फायदे समोर येतील. तुम्ही सध्या ज्या परिस्थितीत आहात, त्या परिस्थितीत एखादी नवी कल्पना उत्क्रांती घडवून आणू शकेल. स्वतःला चांगल्या पद्धतीने व्यक्त करा आणि अधिक चांगल्या प्रकारे निरीक्षण करा.

  LUCKY SIGN - A guitar

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  तुमच्यापैकी काही जण जे शिक्षण क्षेत्रात असतील, त्यांना वातावरणात अचानक काही गोंधळ निर्माण झाल्यासारखा वाटेल. कोणताही नवा दृष्टिकोन सादर करण्यापूर्वी चांगल्या पद्धतीने संशोधन करा. तुम्ही एखादी बाब टाळली असेल, तर त्या संदर्भात तुमचे आई-वडील तुमच्याशी पुन्हा जोडले जाऊ शकतात.

  LUCKY SIGN - Rose gold watch

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion