मराठी बातम्या /बातम्या /religion /तुमचा/तुमची एक्स पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो/शकते.

तुमचा/तुमची एक्स पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो/शकते.

प्रत्येक राशीचं 7 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 7 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 7 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 7 जानेवारी:  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 7 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    आजचा दिवस मनात असलेली अढी दूर करण्यासाठी चांगला आहे. तुम्ही तुमचं रूटीन सुधारण्यासाठी चांगली सुरुवात केली आहे. जवळच्या मित्राकडून मिळालेल्या बातमीने तुम्हाला उत्साह वाटेल. स्वतःसाठी काही क्वालिटी टाइम व्यतीत करा.

    LUCKY SIGN – A parrot

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    मनात दडपलेल्या भावना पूर्णपणे स्थिर होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. कोणाला कमिटमेंट दिली असेल, तर ती पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला थोडं त्रासदायक वाटेल; पण ते काही वेळापुरतं असेल.

    LUCKY SIGN – A feather

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    प्रलंबित निर्णयात काही हालचाली दिसू शकतात. महत्त्वाच्या गोष्टींमध्ये उशीर होत असल्याचा अनुभव घेत असाल. कामातून घेतलेला छोटासा ब्रेकही तुम्हाला दिलासादायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सतर्क राहा.

    LUCKY SIGN – A patchwork

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    तुमच्या प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यातच काही अडथळे येऊ शकतात. एखाद्या अनपेक्षित स्रोताकडून तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो. तुम्हाला चिंतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. ब्रेकचं नियोजन करा.

    LUCKY SIGN – Cardamoms

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    आज एखाद्याचं नुकसान तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. तुमचा ओल्ड चार्म तुम्हाला पुन्हा तयार होत असल्यासारखं वाटू शकतं. एखाद्या चांगल्या शिफारशीमुळे आज तुमचा दिवस सत्कारणी लागेल. तुमच्या गरजा साध्या-सोप्या ठेवा.

    LUCKY SIGN – Sunset

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    तुम्हाला आर्थिक बाबतीत अनुकूल हालचाल होईल असं वाटत असल्यास ती होऊ शकते. दूर राहणारा एखादा मित्र तुमच्याशी संपर्क साधू शकतो. आजचा दिवस शांत राहणं आणि आव्हानात्मक स्थितीशी जुळवून घेण्याचा आहे.

    LUCKY SIGN – A white board

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    तुमच्यापर्यंत नवीन संधी चालून येतील; पण त्या प्रत्यक्षात येण्यासाठी अजून काही कालावधी जावा लागू शकतो. प्रत्येक वेळी गोष्टी मनाला न लावून घेणंच चांगलं ठरेल. शांततेसाठी सोपे उपाय केल्यास उपयुक्त ठरू शकतात.

    LUCKY SIGN – Cobalt blue

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    थेट निष्कर्षांपर्यंत पोहोचणं या टप्प्यासाठी योग्य ठरू शकणार नाही. तुमच्यासमोर बऱ्याच गोष्टी असल्याने तुम्हाला थोडं विचित्र वाटू शकतं; पण काही गोष्टींकडे सध्या दुर्लक्ष केलेलंच बरं.

    LUCKY SIGN – A tray

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    नव्या गोष्टी समोर आल्यामुळे रूटीनचं काम मागे पडू शकतं. जुन्या आणि नव्यामध्ये दुरावा/फरक जाणवू शकतो. एखादी ट्रीट किंवा गिफ्ट मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही निकालाच्या चिंतेत असाल, तर तो तुमच्या बाजूने असू शकेल.

    LUCKY SIGN – A group of birds

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    काही दिवस प्रत्येक बाबतीत अनुकूल असतात आणि आजचा दिवस त्यातलाच आहे. तुम्ही आज जिथे आहात तिथे पोहोचल्याबद्दल देवाचे आभार मानाल. तुमच्या प्रसंगावधानामुळे संकट टाळू शकाल.

    LUCKY SIGN – An indoor plant

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    रागीटपणाच्या समस्येमुळे वाद होण्याची शक्यता आहे. आधी थांबवलेला प्लॅन आता पुढे नेऊ शकता. तुमचा/तुमची एक्स पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो/शकते. क्षमतेबाहेरची वचनं देऊ नका.

    LUCKY SIGN – A note for you

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    एखादी गोष्ट सध्या योग्य वाटत नसेल, तर ती भविष्यातही योग्य न वाटण्याची शक्यता आहे. युनिव्हर्सचा इशारा समजून घेण्याचा प्रयत्न कराल. काही काळासाठी तुम्हाला भीती वाटू शकते. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN – An old photograph

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion