मराठी बातम्या /बातम्या /religion /आज तुमचे बॉस किंवा वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात

आज तुमचे बॉस किंवा वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात

प्रत्येक राशीचं 6 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 6 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 6 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 6 फेब्रुवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  नवीन संधीचा स्वीकार करताना तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. नकारात्मक भावनांना चालना देणारा अनुभव सोडून देणं चांगलं ठरेल. गोष्टी अधिक चांगल्या बनवण्यासाठी एक नवीन संधी म्हणून आजच्या दिवसाकडे बघा.

  LUCKY SIGN from above – A Novel

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  तुमचे स्टार्स एखाद्या विजयाचे संकेत देत आहेत. तुमच्या सभोवतालच्या गोंधळापासून दूर रहा. तुमची दैनंदिन कामं सुलभ करा. तुमच्याकडे काम करण्याचा अधिक सुसंघटित दृष्टीकोन असेल.

  LUCKY SIGN from above – A Vibrant Bag

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  तुम्‍ही तुमचा संवाद स्‍पष्‍ट ठेवल्‍याचा आनंद वाटेल. यामुळे तुम्हाला इतरांकडून योग्य आदर आणि विश्वास मिळेल. व्यावसायिक आणि सार्वजनिक सेवांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती व्यस्त राहू शकतात.

  LUCKY SIGN from above – An indoor plant

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  तुम्ही कंटाळवाणे दिवस अनुभवत असल्‍यास आज मित्र-मैत्रिणींत मिसळा. त्यामुळे तुमच्यातलं चैतन्य जागृत होईल. नियोजित कामं करण्याची इच्छा तुम्हाला आनंद देईल. तुमचा जोडीदार कदाचित शांत बसलेला असेल आणि आज तुम्ही त्याची विचारपूस करू शकता.

  LUCKY SIGN from above – A glass table

  शिवलिंगावर अर्पण कराव्यात या 5 गोष्टी, तुमच्या अनंत अडचणी होतील दूर

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  आज तुम्ही उदार होऊ शकता आणि इतरांसाठी मदतीचा हात पुढे करू शकता. सुरुवातीला निराशा व्यक्त केलेले पालक आता तुमच्या दृष्टिकोनाशी सहमत असतील. हळूहळू प्रगती होणं हे एक चांगलं लक्षण आहे.

  LUCKY SIGN from above – A rooftop

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  अलीकडील घडामोडींबद्दल तुम्ही शांत राहिल्यास इतरांना चुकीचा संदेश मिळू शकतो. आजचा दिवस कृती करण्याचा आणि अंमलबजावणीचा आहे. तुम्ही जे नियोजन केले असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कॉसमॉसकडून पुरेसा पाठिंबा मिळेल.

  LUCKY SIGN from above – A pet shop

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  एनर्जीज उत्सवाकडे निर्देशित केल्या जात आहेत. तुम्हाला एखादी अनपेक्षित संधी मिळू शकते. कौटुंबिक मेळावे किंवा गेट-टूगेदर होण्याचे योग आहेत. आरोग्याची किरकोळ समस्या तुम्हाला व्यग्र ठेवू शकते.

  LUCKY SIGN from above – Silverware

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  एखादी निराशाजनक गोष्ट तुम्हाला खिन्न करू शकते. पण, तुम्ही त्यातून लगेच पुढे गेलं पाहिजे. तुम्हाला दिलेल्या पर्यायांबद्दल जास्त विचार करत बसू नका. वेळ लवकरच त्याची भरपाई करेल. नवीन स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी तुम्हाला आकर्षित करू शकतात.

  LUCKY SIGN from above – A Bouquet

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  आज नशीब तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे प्रलंबित कामांमध्ये हालचाल दिसून येईल. ज्येष्ठ व्यक्ती चांगला सल्ला देऊ शकते. वर्क-लाइफ बॅलन्स साधल्याने तुमचा दिवस आणखी व्यवस्थित होऊ शकतो.

  LUCKY SIGN from above – A newspaper

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  जवळचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस किंवा वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. सध्या तुम्ही त्याला नकार देऊ शकता. तुमचा जोडीदार लहान ब्रेकची अपेक्षा करत असेल.

  LUCKY SIGN from above – A yellow sapphire

  विज्ञानही झाले चकित दर्ग्यातील हा चमत्कार पाहून! मुंबईत कोठे आहे हे ठिकाण

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  कोणत्याही नवीन भूमिकेसाठी थोडे अधिक प्रयत्न आणि संयमाची गरज असेल. तुमचे मूल कदाचित तुम्हाला आणि तुमच्या जीवनशैलीला आदर्श मानेल. एखाद्याचं सिक्रेट गुप्त ठेवणं तुम्हाला आव्हानात्मक वाटेल.

  LUCKY SIGN from above – Almond Cake

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  काही तातडीच्या कागदपत्रांसाठी तुमचा अर्धा दिवस खर्च होऊ शकतो. तुम्हाला सर्वात अनपेक्षित व्यक्तीचा कॉल येऊ शकतो. जवळच्या मित्रांच्या सहवासात संध्याकाळ अधिक मनोरंजक होईल. आर्थिक स्थिती सुरळीत राहील.

  LUCKY SIGN from above – A diary

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion