मुंबई, 05 मार्च: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 5 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुमची एनर्जी गोंधळात टाकणारी असू शकते. आज तुम्ही जे साध्य करू इच्छिता त्याला तुमच्या कृतींची जोड मिळणार नाही. एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधावे लागतील. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी काळजीपूर्वक संवाद साधला पाहिजे, नाहीतर त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. आज नवीन कौशल्यं शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. तुम्ही त्याचं बारकाईने पालन केल्यास व्यवसायाच्या कल्पना निर्माण होऊ शकतात.
LUCKY SIGN – A Trunk
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
ज्यांच्यावर इतरांचं वर्चस्व आहे ते आता भूमिका उलट करण्याचा सक्रियपणे विचार करू शकतात. तुमचे एक्सप्रेशन्स तुमच्या भावनांवर वरचढ ठरू शकतात पण, तुमच्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीला कळवणं महत्त्वाचं आहे. नवीन नोकरी शोधत असाल तर आता आवडीच्या संधी मिळतील. नातेसंबंधांमध्येदेखील एक नवीन कमिटमेंट दिसेल आणि त्यात सुधारणा झाल्यासारखं वाटेल. अनेक दिवसांपासून असलेल्या भीतीबाबत लवकरच मार्ग निघू शकेल.
LUCKY SIGN – A neon sign
Shanisathi upay :काळ्या मिरीच्या या उपायाने शनिदेवाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती, नशीब होईल बलवान
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा पाठपुरावा करण्याचा किंवा प्रगतीसाठी संधी मिळवण्याचा विचार करत असाल तर आता खरोखर प्रयत्न करणं गरजेचं आहे. येणारा काळ, तुमचं काम अधिक कार्यक्षम पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी पर्याय सादर करू शकतो. तुम्हाला अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वाटू शकतं. गेल्या काही दिवसांपासून होणारी सौम्य चिडचिड आता जाणवणार नाही. तुमच्या जोडीदाराकडून विचार करण्यासारखा एखादा सल्ला मिळू शकतो.
LUCKY SIGN – A New Bracelet
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
नवीन विचारांची संख्या जास्त दिसत असली तरी ते दिशाहीन वाटू शकतात. तुम्ही इंडस्ट्रीतील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला भेटू शकाल जिचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त असेल. जर तुम्ही रोमँटिक रिलेशनशीपमध्ये असाल तर त्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला क्वालिटी टाईमची गरज भासेल. तसेच, तुमच्या जोडीदाराचे काही गैरसमज आहेत, त्यांचं निराकरण करणं गरजेचं आहे. परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण न मिळवल्यास वाद होऊ शकतो.
LUCKY SIGN – Antique Article
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमचे दबावाचे डावपेच आता इतरांवर काम करणार नाहीत. तुमच्या आजूबाजूच्या काही लोकांना तुमच्याकडून त्रास होण्याची शक्यता आहे. तुमचा हेतू स्पष्ट असला तरी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. तुम्ही अधिकारपदावर असल्यास, तुम्ही इतरांवर छाप पाडू शकता. गेल्या काही महिन्यांपासून संकटात असलेल्या व्यवसायात सुधारणा दिसू शकते. धातूंचे व्यवहार करणाऱ्यांना चांगला नफा होऊ शकतो.
LUCKY SIGN – A Silver Coin
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
भूतकाळातील काही मजबूत आठवणींचा तुमच्या नवीन दृष्टिकोणावर परिणाम होऊ शकतो. त्याच चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही चिंताजनक गोष्टींवर तत्काळ निर्णय घेण्यास सक्षम नसाल तर इतरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. चांगली आर्थिक प्रगती तुम्हाला पुन्हा रुळावर आणू शकते. तुम्ही सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर अगोदर नियोजन केलं पाहिजे. आता तुम्ही उघडपणे स्वत:वर टीका करू शकता.
LUCKY SIGN – A glass-top table
घरात या ठिकाणी ठेवू नका चप्पल, धनदेवता होते रुष्ट : वास्तूचा महत्त्वाचा नियम
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
तुमच्या भावंडाकडून किंवा तुमच्या जवळच्या मित्राकडून तुमच्या कौशल्याचा उत्तम वापर करून घेतला जाऊ शकतो. तुमचं कंटाळवाणं रुटीन लवकरच काही आठवड्यांमध्ये व्यस्त होऊ शकतं. तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी एक नवीन संधी शोधत आहात आणि कोणीतरी जवळची व्यक्ती तुमचं निरीक्षण करत आहे. तुम्हाला आता त्यांच्याकडून प्रतिक्रिया ऐकायला मिळू शकते. व्यक्तिमत्त्वात एखादा लहान बदल घडू शकतो. हा बदल चांगल्यासाठी आणि मुख्यतः सेल्फ अवेअरनेसमुळे झालेला असेल.
LUCKY SIGN from above – A Red Car
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
घाईत घेतलेले सर्व निर्णय वाईट परिणाम करत नाहीत, हे तुम्ही कधीना-कधी मान्य कराल. काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबात एका विशिष्ट दिशेनं चालणं लिहिलेलं असतं. तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल विश्वास वाटतो आणि लवकरच इतरही त्यासाठी सहमती देतील. ऑफिसमध्ये काहीकाळ अशांतता असू शकते. तुमच्या मनातील वाईट विचार तुमचं लक्ष विचलित करू शकतात. तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. एका सरळ रेषेत वाटचाल करण्याची वेळ आली आहे.
LUCKY SIGN – Your Favorite sweet
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्ही भूतकाळात केलेल्या छोट्या गोष्टी संकटात तुमच्या नात्यासाठी महत्त्वाचे तारणहार ठरू शकतील. काम आटोक्यात येईल पण तुम्ही त्यात व्यस्त राहाल. एकाहून अधिक डेडलाइन्सवर काम केल्यानं तुमची दमछाक होऊ शकते. जर तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात गुंतलेले असाल तर तुमच्याकडील पुरावे सुरक्षित राहतील याची खात्री करा. तुमच्या सभोवतालच्या व्यक्ती तुमची गोपनीय माहिती इतरांना पुरवू शकतात.
LUCKY SIGN – An indoor plant
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
तुम्ही योजना आखत असलेली झेप मारण्यासाठी ही चांगली वेळ असू शकते. बिझनेस आयडिया सुरुवातीच्या काळात चांगले परिणाम देऊ शकतात. भागीदारीमुळे तुमच्या मनातील चिंता मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकतात. कठोर परिश्रम करताना भागीदारीचा तुम्हाला आधार वाटेल. औपचारिकपणे आलेला विवाहाचा प्रस्ताव फलदायी ठरू शकतो. तुमच्या मनातील विचार स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत तयार केलेला एखादा रँडम प्लॅन फायद्याचा ठरू शकतो.
LUCKY SIGN – A Candle stand
Holi 2023: होळीला जागरणाचे महत्त्व, होलिका दहनाच्या रात्री जप व ध्यानाची परंपरा
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
उच्च शिक्षणाचं नियोजन करताना तुम्हाला कदाचित काही परीक्षांचा सामना करावा लागेल. सध्याची वेळ प्रगतीसाठी अनुकूल आहे. तुम्हाला अनुदान किंवा मदत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही घरापासून लांब राहत असाल, तर तुम्हाला घरची आठवण येईल. पण, ही एक तात्पुरती भावना असेल. व्यायामाचा चांगला दिनक्रम तयार होऊ शकतो. आईच्या तब्येतीत बिघाड झाल्यामुळे तिची चिडचिड होऊ शकते आणि तिला पटकन राग येई शकतो.
LUCKY SIGN – A yellow stone
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
जवळच्या कौटुंबिक मित्राकडून नवीन कामासाठी सल्ला मिळू शकतो. नेमून दिलेल्या कामावर तुमचे लक्ष केंद्रित केल्यानं तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतो. सध्या तुम्ही विचलित होऊ शकता. परिसरातील काही नवीन लोक तुमच्याबद्दल विशिष्ट मत बनवू शकतात ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. लहान सहलीमुळे दिलासा मिळेल. एखाद्या आउटस्टेशन अनुभवाचा दीर्घकाळ प्रभाव पडू शकतो.
LUCKY SIGN – A napkin holder
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion