मुंबई, 4 मार्च: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुम्ही सदा सर्वकाळ संरक्षित राहू नये. निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला सुरुवात करायला हवी. एके काळी मूल्यवान असलेली एखादी गोष्ट सोडून देताना गिल्टी न वाटणं ठीक आहे. गोष्टी अधिक चांगल्या करण्यासाठीची संधी आजचा दिवस देईल.
LUCKY SIGN - Strawberries
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
असे संकेत मिळत आहेत, की तुम्ही बऱ्याच काळापासून ज्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, तो मिळवू शकाल. त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक कणखर व्हाल. अनेकदा तुम्ही भावनेच्या भरात वाहवत जाता. त्यावर नियंत्रण मिळवायला हवं. तुमच्या गरजा सोप्या करा आणि तुमचा दृष्टिकोन अधिक ऑर्गनाइज्ड करू शकता.
LUCKY SIGN - A gel
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
आपण पूर्वीचा संवाद स्पष्ट ठेवल्याचा आता तुम्हाला आनंद होईल. त्यामुळे तुम्हाला इतरांकडून चांगला आदर मिळेल, तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल. प्रोफेशनल्स, तसंच स्टार्टअपमधल्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी चांगल्या घडामोडींची अपेक्षा करू शकतात. पालकांकडे शेअर करण्यासारखं काही तरी महत्त्वाचं असू शकतं.
LUCKY SIGN - A rose plant
सौख्यासाठी वाहनांची जागाही असते महत्त्वाची, वास्तूमध्ये पार्किंगचे खास नियम
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुमचे काही दिवस कार्यक्रमाशिवाय गेले असतील, तर आजचा दिवस तुमचा उत्साह पुन्हा ऊर्जितावस्थेत आणू शकतो. सादरीकरण आणि सहभागाच्या इच्छेमुळे तुमचं कौशल्य तुम्ही आणखी वरच्या पातळीवर नेऊ शकता. तुमचा जोडीदार काय विचार करतो ते सगळंच तुमच्याकडे व्यक्त करत असेल असं नाही. त्याचा तुम्ही आढावा घेऊ शकता, तपासू शकता.
LUCKY SIGN - A glass tumbler
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्हाला कोणाला तरी मदतीचा हात पुढे करावासा वाटेल. तुमच्या आई-वडिलांनी आधी तुमच्या दृष्टिकोनाशी सहमती दर्शवली होती, ते आता असहमत असू शकतात. हळूहळू होणाऱ्या प्रगतीला काही क्विक आयडियाजच्या साह्याने वेग देता येऊ शकतो.
LUCKY SIGN - A sunroof
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
अलीकडच्या घडामोडींबद्दल दीर्घ काळ मौन बाळगल्यामुळे इतरांना तर्कवितर्क करायला संधी मिळू शकते. आजचा दिवस कृती करण्याचा आणि पुढे जाण्याचा आहे. तुम्ही जे काही नियोजन केलं आहे, त्याला विश्वाकडून अतिरिक्त सपोर्ट मिळेल.
LUCKY SIGN - A flower vase
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
फॅमिली सेलिब्रेशनचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत कमी अपेक्षित असलेली संधी मिळू शकते. फॅमिली गेटटुगेदरची शक्यता आहे. कुटुंबात नव्या सदस्य येण्याची शक्यता आहे. प्रकृतीचा किरकोळ मुद्दा उपस्थित होईल; मात्र तो सहज हाताळता येईल.
LUCKY SIGN - Silverware
Holi 2023: होळीला जागरणाचे महत्त्व, होलिका दहनाच्या रात्री जप व ध्यानाची परंपरा
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
काही कारणामुळे निराश व्हाल, मन खट्टू होईल; पण ते सोडून देऊन लगेच पुढे चला. तुम्हाला दिलेल्या पर्यायांमध्ये खूप सिलेक्टिव्ह होऊ नका. त्यासाठी वेळ लवकरच येईल. एखादी वेलनेस अॅक्टिव्हिटी आकर्षित करून घेईल.
LUCKY SIGN - A flower bouquet
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
आज नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होईल. जुन्या मित्राकडून काही चांगला सल्ला मिळू शकेल. वर्क-लाइफ बॅलन्स साधाल.
LUCKY SIGN - A newspaper bundle
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
छोट्या अंतरावरचा प्रवास होऊ शकेल. तुमचा बॉस किंवा वरिष्ठ तुमच्या खांद्यावर एखादी मोठी जबाबदारी देऊ शकतात. तुम्ही ती आत्ता नाकारू शकता. तुमचा जोडीदार तुमच्याकडून काही व्हेकेशन आयडियाजच्या अपेक्षेत आहे.
LUCKY SIGN - A yellow sapphire
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
नव्या भूमिकेसाठी अधिक कष्ट आणि पेशन्सची गरज लागू शकेल. तुमचं मूल तुमची लाइफस्टाइल आणि तुम्हाला आदर्श मानेल. एखाद्याचं गुपित गुप्त राखणं उत्तम. द्विधा मनःस्थिती होऊ देऊ नका.
LUCKY SIGN - Walnut
होळी, धुळवड आणि धूलिवंदन यामध्ये काय आहे फरक? कोणत्या दिवशी खेळावा रंग
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
एखाद्या महत्त्वाच्या, अर्जंट पेपरवर्कमध्ये तुमचा अर्धा दिवस जाऊ शकतो. एखाद्या जवळपास विस्मृतीत गेलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला कॉल येऊ शकतो. काही सोशल फ्रेंड्सच्या सोबतीने संध्याकाळ इंटरेस्टिंग ठरेल. आर्थिक प्रवाह सुरळीत राहील.
LUCKY SIGN - A duck
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion