मराठी बातम्या /बातम्या /religion /खास आहे आजचा दिवस या राशीसाठी, भूतकाळात केलेली मेहनत उपयोगी ठरेल

खास आहे आजचा दिवस या राशीसाठी, भूतकाळात केलेली मेहनत उपयोगी ठरेल

प्रत्येक राशीचं 4 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 4 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 4 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 4 फेब्रुवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    दिवसाची सुरुवात चिंताग्रस्ततेत झाल्यामुळे तुम्हाला थोडीशी निराशा वाटू शकते; पण कामांना सुरुवात झाल्यावर आशा वृद्धिंगत होईल. कौटुंबिक मुद्द्यांबाबत तुमच्याकडे कोणी तरी मदत मागू शकेल. वर्क-लाइफ बॅलन्स हेल्दी राहील, असा प्रयत्न करा.

    LUCKY SIGN – A parrot

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    मनाचं ऐकत असल्यास सध्या जीवनाबाबत नवीन निवड करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. तुमची अंतःप्रेरणा सध्या खूप चांगल्या स्थितीत आहे. खासकरून, जे तुमच्याबाबत काळजी करत नाहीत, त्यांच्यासमोर भावनांचं प्रदर्शन करणं टाळा.

    LUCKY SIGN – A rose shrub

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    व्हेकेशनबाबत मनात विचार असल्यास आत्ताची वेळ नियोजनासाठी चांगली आहे. गंभीर चर्चेत आज काही साध्य होणार नाही. त्यामुळे या चर्चा नंतरच करा. एखादा प्रस्ताव तुम्हाला आवडू शकतो. तुमच्या मनात काही कल्पना असल्यास त्या बाहेर येऊ द्या.

    LUCKY SIGN – A sunrise

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    तुमच्या दृष्टिकोनाला आत्ता किंमत दिली जात नसेल, तर तो नंतरसाठी जपून ठेवा. टीकेचा अतिरेक केल्यास तिला वेगळं रूप मिळू शकतं. सामाजिक कार्य नियोजनाप्रमाणे न घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे माघार घेण्याची तयारी ठेवा.

    LUCKY SIGN – A milk bucket

    पितळी सिंह घरात ठेवल्याने वाढतो आत्मविश्वास त्याचसोबत आपण बनतो निडर.

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    भूतकाळात केलेली मेहनत आता उपयोगी ठरू शकते. सध्याचा काळ तुमच्या मुलांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये मदत करण्याचा आहे. पचनासंबंधीच्या समस्यांमुळे घरच्या जेवणावरच समाधान मानावं लागू शकतं.

    LUCKY SIGN – A diamond

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    आजचा दिवस हलक्याफुलक्या आणि गंभीर अशा संमिश्र क्षणांचा असू शकतो. तुमच्या चलाखीची आज परीक्षा होऊ शकते. तुमच्या वाटाघाटीच्या कौशल्याचं कौतुक होऊ शकतं. गुंतवणुकीच्या बाबतीत जोखीम घेऊ नका.

    LUCKY SIGN – A sharp instrument

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    आजच्या दिवसाची ऊर्जा ही कोचिंगचं काम करणाऱ्यांकडे जास्त असेल. सातत्य राखलं तर चांगली प्रगती होऊ शकते. रागामुळे लक्ष विचलित होईल; पण ते जास्त काळ टिकणार नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ आल्याचं तुम्हाला जाणवू शकतं.

    LUCKY SIGN – A horse image

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    पालक आणि जोडीदार यांच्यात गोंधळाची स्थिती उद्भवू शकेल. तुमची मुत्सद्देगिरी आणि अनुभव कामास येतील. नव्या उद्योगासंबंधीच्या नियोजनाला आता आकार मिळू लागेल. जवळच्या मित्राकडून सल्ला मिळत असल्यास त्याचं स्वागत करा.

    LUCKY SIGN – A poster

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    इतरांना नाट्यमय परिस्थितीत अडकलेलं पाहता तुम्ही नशीबनवान असल्याचं आज तुम्हाला जाणवू शकतं. तुम्हाला थोडं चिडचिडल्यासारखं वाटू शकतं. संध्याकाळी बाहेर पडण्याचा योग दिसत आहे. सकारात्मक बदल लवकरच घडू शकतो.

    LUCKY SIGN – A bright light

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    काही जुने मित्र तुम्हाला आज सरप्राइज देऊ शकतात; पण तुम्ही मात्र त्या मनःस्थितीत नसाल. तुम्ही आज तुमच्यातच मग्न असाल किंवा स्वतःसाठी वेळ काढाल. सौम्य डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

    LUCKY SIGN – A firefly

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    आजचा दिवस हा मनोरंजनात गुंग होण्याचा किंवा आवडता शो पाहण्याचा आहे. आज तुम्हाला ब्रेक घ्यावासा वाटू शकतो. पैशांसंबंधीची प्रकरणं लवकरच मार्गी लागणार असल्यामुळे तुमची गती वाढवा.

    LUCKY SIGN – A canvas

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    तुमचा गौरवशाली भूतकाळ आज तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. खरेदी करताना हात आखडता ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा जोडीदार तुम्ही लक्ष देण्याच्या प्रतीक्षेत असू शकतो. तुम्हीही पुढाकार घेऊ शकता.

    LUCKY SIGN – A neon slipper

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion