मराठी बातम्या /बातम्या /religion /वृश्चिक राशीचे इतरांवर दबाव आणण्याचे डावपेच आता अयशस्वी ठरतील

वृश्चिक राशीचे इतरांवर दबाव आणण्याचे डावपेच आता अयशस्वी ठरतील

प्रत्येक राशीचं 3 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 3 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 3 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई,  3 फेब्रुवारी:  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 3 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    जवळचा फॅमिली फ्रेंड नव्या कामाची संधी सुचवू शकेल. काही जुने मित्र तुमच्याबद्दल विशिष्ट मत तयार करतील. एखादी छोटी ट्रिप दिलासा देणारी ठरेल.

    LUCKY SIGN - A butterfly

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    उच्च शिक्षणाच्या नियोजनामध्ये अग्निपरीक्षा द्यावी लागू शकेल. तुम्हाला ग्रँट किंवा मदत मिळू शकते. घरापासून दूर राहत असल्यास होमसिकनेस वाटू शकेल. व्यायामाचं चांगलं रूटीन आता प्रत्यक्षात येऊ शकेल.

    LUCKY SIGN - A neon sign

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    तुमच्या नियोजनानुसार झेप घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यवसायाची कल्पना सुरुवातीला चांगले रिझल्ट्स देईल. भागीदारी केल्यास चिंता मोठ्या प्रमाणात कमी होईल. खूप कष्ट करताना आवश्यक असलेलं कुशनिंग त्यामुळे मिळेल.

    LUCKY SIGN – A Salon

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    नातं टिकवण्यासाठी भूतकाळात उचललेली छोटी पावलं आता निराशेच्या काळात महत्त्वाची ठरतील. काम आवाक्यातलं, पण व्यग्र ठेवणारं असेल. लीगल केसमध्ये सहभाग असेल, तर तुमचे पुरावे सुरक्षित राहतील याची काळजी घ्या.

    LUCKY SIGN – Antique article

    देवाची आरती करताना दिवा तेलाचा लावावा की तूपाचा ?

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    घाईघाईने घेतलेले सर्व निर्णय वाईट ठरत नाहीत, हे तुम्हाला पटेल. काही वेळा एखाद्या विशिष्ट दिशेनेच जायला लागणं हे नियतीनंच ठरवलेलं असतं. तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल विश्‍वास वाटत असेल, तर आता इतरांचीही त्याला सहमती मिळेल.

    LUCKY SIGN - A silver coin

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    तुमच्या कौशल्याचा उत्तम उपयोग तुमची भावंडं किंवा जवळच्या मित्रांना होईल. तुमच्या आवडीच्या नव्या संधीचा शोध तुम्ही घेत आहात. तुमच्या जवळची कोणी तरी व्यक्ती त्याचं निरीक्षण करत आहे. व्यक्तिमत्त्वात थोडासा बदल करावा लागू शकतो.

    LUCKY SIGN - A kite

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    भूतकाळातल्या काही तीव्र आठवणी तुमचा नवा दृष्टिकोन ठरवतील. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत तुम्ही दक्ष राहाल. थोड्या चांगल्या आर्थिक प्रगतीमुळे तुमची गाडी पुन्हा रुळावर येईल.

    LUCKY SIGN - A blue car

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    इतरांवर दबाव आणण्याचे तुमचे डावपेच आता अयशस्वी ठरतील. तुमचा हेतू स्पष्ट असला, तरी तुमची संवाद साधण्याची पद्धत सुधारण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत असलेल्या बिझनेसमध्ये सुधारणा दिसू शकेल.

    LUCKY SIGN – Your favourite sweet

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    नव्या विचारांच्या गर्दीने मन भरकटेल, दिशाहीन झाल्यासारखं वाटेल. कार्यक्षेत्रातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती भेटेल, जिचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. रोमँटिक नात्याला क्वालिटी टाइम देण्याची गरज आहे.

    LUCKY SIGN - An indoor plant

    या मंदिरात विडी दान केल्याने होतात सर्व इच्छा होते पूर्ण

    मकर (Capricorn) ( 22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    तुम्ही एखाद्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा किंवा एखादी प्रगतीची संधी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी मनापासून कसून प्रयत्न करणं आवश्यक आहे. येणाऱ्या काळात तुमचं काम पूर्ण करण्यासाठी काही पर्याय मिळू शकतात. तुम्हाला अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि कॉन्फिडंट वाटेल.

    LUCKY SIGN - A candle stand

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    आतापर्यंत ज्यांनी इतरांचं वर्चस्व सहन केलं आहे ते आता आपली भूमिका बरोबर उलट करण्यासाठी सक्रियपणे विचार करू शकतात. क्वचितप्रसंगी तुम्ही भावनाविवश व्हाल; मात्र तुमच्या मनात नेमकं काय आहे, हे समोरच्या व्यक्तीला कळू द्या. नव्या जॉबच्या शोधात असाल तर आता चांगल्या संधी दिसायला सुरुवात होऊ शकेल.

    LUCKY SIGN – A yellow stone

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    ऊर्जेची साथ नसल्यासारखं वाटेल. आज तुम्ही जे काम करू इच्छिता, त्या इच्छेला कृतीचं पाठबळ मिळणार नाही. संवादाच्या क्षेत्रात व्यवहार करणाऱ्यांनी गैरसमजूत टाळण्यासाठी सावधगिरीने संवाद साधण्याची गरज आहे.

    LUCKY SIGN - A cup holder

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion