मराठी बातम्या /बातम्या /religion /कुंभ राशीच्या लोकांना कामाची नवी संधी समोर येईल, आज कोणत्या राशी असतील खास

कुंभ राशीच्या लोकांना कामाची नवी संधी समोर येईल, आज कोणत्या राशी असतील खास

 प्रत्येक राशीचं 1 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 1 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 1 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

   मुंबई, 1 फेब्रुवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 1 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  तुम्ही आधीच घेतलेल्या एखाद्या निर्णयाबद्दल फेरविचार कराल. तुम्हाला इतरांना निःस्वार्थीपणे मदत करण्याची अचानक इच्छा होईल. तुम्ही मदत केलेली एखादी व्यक्ती तुमच्या उपयोगी पडेल.

  LUCKY SIGN - An apricot tree

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  तुम्हाला अगदी आतून वाटणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला अशी संधी याआधी कधीही मिळाली नसेल. तुमचं मन मोकळं करा. कारण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेणारं कोणी तरी सापडेल.

  LUCKY SIGN - Black obsidian

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  एरव्ही अत्यंत कठीण असलेलं काम तुमच्या प्रगल्भतेमुळे सोपं होईल. तुमच्या दृष्टिकोनात आलेली व्यापकता आणि सुधारणा यांची दखल घेतली जाईल. येत्या आठवड्यात प्रकृतीच्या काही किरकोळ तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - A jute basket

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  तुमच्या मते तुम्ही एखाद्या कामात अत्यंत निपुण झाला आहात; मात्र त्याला कदाचित स्वीकारार्हता मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी एखादी सकारात्मक घडामोड घडण्याची शक्यता आहे; मात्र नेहमीपेक्षा मंद गतीने. कोणी तरी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.

  LUCKY SIGN - A magazine

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  आजचा दिवस सखोल आणि अर्थपूर्ण संवादांसाठी उत्तम आहे. त्याचा चांगला उपयोग होण्यासाठी तुम्हालाही त्यात तितक्याच चांगल्या प्रकारे सहभाग घ्यावा लागेल. स्वतःला व्यवस्थित, शिस्तबद्ध राखण्याचे फायदे लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील. नवं आणि प्रभावी रूटीन लवकरच दृष्टिपथात येईल.

  LUCKY SIGN - A peacock feather

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  दुसऱ्या व्यक्तींच्या जुन्या चुकांचे व्रण अद्याप शिल्लक आहेत; मात्र आताचा काळ सर्व विसरून जाण्याचा आणि माफ करण्याचा आहे. खासकरून जुन्या मित्राकडून आज तुम्हाला अचानक एखादं सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच तुमच्या मनाची जागा काही गोंधळाने व्यापली होती. तो गोंधळ आता दूर होईल.

  LUCKY SIGN - A yellow sapphire

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  तुमच्याविषयीची बातमी बरीच पसरली आणि तुम्ही ज्या व्यक्तीला कधीही भेटलेला नाहीत, अशी व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी प्रयत्न करील. ज्या व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यासाठी काही वेळ काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही टूल्स आणि स्पेअर पार्ट्सच्या बिझनेसमध्ये असलात, तर तुम्हाला कदाचित मनुष्यबळाची चिंता भेडसावेल.

  LUCKY SIGN - A pyramid

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  सध्याच्या एकसुरी अशा जीवनात एखादा नवा पॅटर्न येईल. तुमच्या कामासाठी तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. एखादी छोटी ट्रिप होण्याचे संकेत आहेत. तुम्ही रोमँटिकली ज्या व्यक्तीमध्ये गुंतला आहात, त्या व्यक्तीसोबत तुम्हाला अधिक वेळ व्यतीत करता येईल.

  LUCKY SIGN - Blue tourmaline

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  एखादं प्रकरण तुम्ही सोडवू शकत नसाल किंवा ते विसरू शकत नसाल, तर ते सोडून द्या. काही गोष्टी वेळेवर सोडून देणं हाच त्या सुटण्याचा उपाय असतो. रोमँटिकदृष्ट्या इंटरेस्टिंग वाटेल अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होईल. तुमच्या मनात सध्या बऱ्याच नावीन्यपूर्ण कल्पना आहेत.

  LUCKY SIGN - A trunk

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  बऱ्याच काळानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि स्वतःसाठी वेळ काढत असल्यासारखं वाटेल. लवकरच कामाच्या नव्या संधी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्ष राहा. तुमचा जवळचा मित्र/मैत्रीण आर्थिक ताणाखाली असण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - A silk thread

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  कामाची नवी संधी अखेर समोर येईल. तुम्ही तिचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आई-वडिलांना तुमच्याशी एखाद्या विषयावर बोलायचं असण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना तुमचा वेळ हवा आहे. येत्या काही दिवसांत पाहुणे येण्याची शक्यता आहे. पैशांचा प्रवाह सुधारेल.

  LUCKY SIGN - A designer watch

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  साधेपणा आणि गुंतागुंत नसलेला दृष्टिकोन यांमुळे तुमचं काम सोपं होईल. लोकांकडून खूप जास्त अपेक्षा केल्यास कठोर भावनांची निर्मिती होऊ शकते. एखाद्या छोट्या पार्टीची तुम्ही अपेक्षा करू शकता. तिथे तुम्हीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असाल.

  LUCKY SIGN - A pigeon

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion