मराठी बातम्या /बातम्या /religion /कसा असेल 1 एप्रिलचा दिवस? लवकरच तुमची एखादी छोटी सहल घडेल

कसा असेल 1 एप्रिलचा दिवस? लवकरच तुमची एखादी छोटी सहल घडेल

प्रत्येक राशीचं 1 एप्रिल 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 1 एप्रिल 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 1 एप्रिल 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 एप्रिल:  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 1 एप्रिल 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

काही गोष्टी आणि प्रकरणं कायम धरून न ठेवणं हे चांगलंच असतं. बिझनेसमध्ये लवकरच नवी पार्टनरशिप होण्याची शक्यता आहे. स्पर्धात्मक होण्याकडे दुर्लक्ष करा आणि सध्याच्या आणि नव्या संधींवर लक्ष केंद्रित करा.

LUCKY SIGN - A lake

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

परफॉर्मन्स विचलित झाल्यास काही काळ, तुम्ही पुन्हा पाहत नाही तोपर्यंत चिंता वाटेल, ताण येईल. कामात पुढे येणारी आव्हानं लक्षात घेऊन आतापासूनच तयारीला सुरुवात करण्याची गरज आहे. आरोग्याच्या परिस्थितीत सुधारणा व्हायला सुरुवात होऊ शकते.

LUCKY SIGN - A honeybee

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही स्पष्टपणे व्यक्त केलंच पाहिजे. दक्षपणे तुम्ही तुमच्या संभाषणावर लक्ष ठेवायला हवं. तुमचा सहकारी त्याच्या फायद्यासाठी तुमच्या सार्वजनिक प्रतिमेशी खेळण्याचा प्रयत्न करू शकेल.

LUCKY SIGN - A bronze wallet

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुम्ही सकारात्मक व्हाइब्ज घेऊन फिरणाऱ्या व्यक्ती ठरू शकता आणि त्याची खूप गरजही आहे. तुम्हाला सत्य आहे तसं स्वीकारण्याची इच्छा नसू शकेल. तुम्ही ज्या माणसांवर विश्वास ठेवत आहात, त्यांचा आढावा घेण्याची किंवा त्यांच्याशी नियमितपणे बोलण्याची गरज आहे.

LUCKY SIGN - A tumbler

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

टीम स्पिरिट आणि सतत कुतुहलाची भावना जागृत असलेलं विद्यार्थीपण हे गुण स्वतःमध्ये बाणवून घ्या. तुमच्या अ‍ॅटिट्यूडसाठी तुमच्यावर घरात टीका होत आहे. पैशांच्या प्रवाहाचं बारकाईने व्यवस्थापन करण्याची गरज आहे.

LUCKY SIGN - A walking stick

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

काही वेळा दोन व्यक्तींच्या भेटीतून खरंच काही स्पार्क पडू शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. येत्या काही दिवसांत तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला अगदी अनियोजितपणे भेटणार आहात. लवकरच तुमची एखादी छोटी सहल घडेल.

LUCKY SIGN - A black crystal

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

सध्या तुम्हाला काही बाबींबद्दल खात्री नसेल, तर आत्तापुरत्या त्या पुढे ढकला. तुमच्या कुटुंबाला तुमच्यासोबत काही क्वालिटी टाइम व्यतीत करण्याची इच्छा आहे. नवा प्रोजेक्ट किंवा असाइनमेंटमध्ये काही दिवस बिझी राहाल.

LUCKY SIGN - Teak wood

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

कामाच्या ठिकाणी दीर्घ काळ प्रलंबित असलेली बढती तुम्हाला मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. लवकरच गेट-टुगेदर किंवा छोटी ट्रिप होण्याची शक्यता असून, त्यामुळे तुम्हाला रिफ्रेश व्हायला मदत होणार आहे. नंतर खर्च करण्यासाठी आता बचत करा.

LUCKY SIGN - A bamboo plant

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

जेव्हा तुम्ही समस्यांवर उपाय शोधत असता, तेव्हा कधीच राग हे उत्तर असू शकत नाही. राग नियंत्रणातच ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. जुगारासारख्या जोखमीच्या गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहा. नवं वाहन खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A clear quartz

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

कुटुंबातल्या कोणाची तरी प्रकृती हे सध्या काळजीचं कारण बनू शकतं. अनपेक्षित समस्येशी दोन हात करण्यासाठी कोणाची तरी छोटी मदत किंवा कर्ज उपयोगी ठरू शकेल. काही कालावधीसाठी आर्थिक तणाव असेल. जोडीदाराशी चर्चा केल्यास काही शंका दूर होण्यास उपयोग होईल.

LUCKY SIGN - A climber

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुम्हाला मिळणारी वागणूक तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेलच असं नाही. छोट्या प्रवासाचे योग असून, त्यात तुम्ही घराबाहेर काही क्वालिटी टाइम व्यतीत कराल. तुम्ही परत याल, तेव्हा तुमचे ताण मागे सोडून या.

LUCKY SIGN - Blue sapphire

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुम्ही प्रलंबित ठेवलेली कामं होतील. एकंदरीत आजचा दिवस कमी ताणाचा असेल. कौटुंबिक पातळीवर तुम्हाला बरीच मदत मिळेल. सध्याच्या काळात नवी गुंतवणूक करण्याची शिफारस केली जात आहे.

LUCKY SIGN - A peacock's feather

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion