मुंबई, 24 मे: मंगळाचे महत्त्व
वास्तविक, मंगळाला भूमिपुत्र म्हणतात, कारण मंगळ हादेखील पृथ्वीसारखा लाल रंगाचा ग्रह आहे. चंद्र, शुक्र आणि मंगळ यांच्या संयोगाला ज्योतिषशास्त्रात सर्वोत्तम मानले जाते. असे म्हटले जाते की जो व्यक्ती मालमत्ता, घर इत्यादी खरेदी करण्यास इच्छुक आहे, त्यांच्या कुंडलीत यावेळी चांगले योग तयार होऊ लागतात. तसेच त्यांच्या भविष्यातील जमिनीसंबंधीच्या चिंता दूर होतील. नवीन जोडप्यांमध्ये प्रेमाची भावना वाढेल. प्रेम आणि समर्पणाची भावनादेखील असेल.
भरभराटीचे योग
जमिनीचे भाव वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. जे लोक कला किंवा संगीत, नाटक, साहित्य, त्या सर्व क्षेत्रातील कलाकारांशी संबंधित आहेत, त्यांना या ग्रहांच्या भेटीमुळे पुढील 1 महिना बरेच शुभ योग पाहायला मिळत आहेत. या योगामुळे त्या कलाकारांची कीर्ती वाढेल. हा योग घशाच्या काही जुनाट आजारांवरही फायदेशीर आहे.
सौंदर्यासाठी महिलांना का महत्त्वाचे आहेत 16 श्रृंगार, जाणून घ्या धार्मिक कारणे
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra