मुंबई, 04 फेब्रुवारी : हिंदू धर्मात रंगांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्याच्या सात दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचा स्वतःचा रंग असतो. त्यानुसार जर तुम्ही कपडे परिधान केले तर तो दिवस तुमच्यासाठी खूप लकी ठरू शकतो, कारण असे केल्याने त्याकाळात त्रास देणाऱ्या ग्रहांचा प्रभाव कमी होतो. ज्याचा परिणाम थेट आपल्या जीवनावर दिसून येतो. श्रीमजगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांच्याकडून जाणून घेऊया की, कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे शुभ आहे.
सोमवार : सोमवार हा भगवान शिव आणि चंद्र देवतेला समर्पित आहे, यामुळे सोमवारी पांढर्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते. पांढरा रंग साधेपणा, शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो.
मंगळवार: मंगळवार हा पवनपुत्र हनुमानाला समर्पित आहे आणि या दिवसाची देवता मंगळ आहे, यामुळे या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे फायदेशीर आहे. लाल रंग हा शुभ आणि लकी कार्याचा सूचक मानला जातो.
बुधवार : बुधवार हा शंकराचा पुत्र श्री गणेशाला समर्पित आहे आणि या दिवसाची देवता बुध आहे, त्यामुळे या दिवशी हिरवा रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि जीवनात समृद्धी येते.
गुरुवार: हा दिवस भगवान श्री हरी यांना समर्पित आहे आणि या दिवसाचा स्वामी स्वतः गुरू ग्रह आहे. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे फायदेशीर आहे, या दिवशी पिवळा टिळा किंवा चंदन लावून आपले भाग्य चमकवू शकता.
शुक्रवार: शुक्रवार हा जगाची माता जगदंबेला समर्पित आहे आणि या दिवसाची देवता शुक्र आहे, यामुळे या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालण्याचे विशेष फळ आणि महत्त्व आहे. असे केल्याने व्यक्तीचा सर्व आघाड्यांवर विजय प्राप्त होतो.
शनिवार: आपल्या सर्वांना माहीत आहे की, शनिवार हा कर्मफल दाता शनिदेव महाराजांना समर्पित आहे, ज्यांचे वर्ण श्याम किंवा काळा असं आहे, या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यानं शनिदेवाच्या दर्शनाचा भक्तांना फायदा होतो. शनिवारी हनुमानाचीही पूजा करण्याची परंपरा आहे.
रविवार: रविवार हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक शुभ गोष्टी घडू लागतात. या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे.
हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.