रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवणं देतं अनेक समस्यांना आमंत्रण, काय सांगतं शास्त्र?

रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवणं देतं अनेक समस्यांना आमंत्रण, काय सांगतं शास्त्र?

खरकटी भांडी रात्रभर का ठेवू नयेत याबद्दल धर्मशास्त्रात काय कारणं सांगितली आहेत. याबद्दल नारद संचारचे ज्योतिषी अनिल जैन यांनी HerZindagi.Com वर महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई 09 ऑगस्ट : आपल्याकडे बहुतेकदा रात्रीची जेवणं झाल्यानंतर अनेक घरांमध्ये लगेचच सगळी भांडी घासून, स्वच्छ करून ठेवायची पद्धत आहे. पण हल्ली बहुतेक महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात किंवा कामाच्या घाईत रात्रीच सगळी भांडी घासून ठेवणं जमत नाही. पण शक्यतो घरातल्या सदस्यांनी तरी रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवू नयेत. यामागे काही शास्त्र आहे, असं सांगितलं जातं. यामागे काही शास्त्रीय, धार्मिक कारणं आहेत. Her Zindagi.com या वेबसाईटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार (Hindu Religion) सकाळी लवकर उठणं, देवपूजा करणं, ताटात अन्न न टाकणं, अन्न वाया न घालवणं, सूर्यास्तानंतर केर न काढणं अशा अनेक गोष्टी आवर्जून करायला सांगितल्या गेल्या आहेत. या नियमांमुळे आपल्या जीवनाला शिस्त लागते आणि दैनंदिन कार्यही सुरळीत सुरू राहतात. रात्रीच्या वेळेस खरकटी भांडी (Dirty Dishes) ठेवली जाऊ नयेत असंही म्हटलं जातं. त्यामागे काही कारणं आहेत ती आता आपण जाणून घेऊया. खरकटी भांडी रात्रभर का ठेवू नयेत याबद्दल धर्मशास्त्रात काय कारणं सांगितली आहेत. याबद्दल नारद संचारचे ज्योतिषी अनिल जैन यांनी HerZindagi.Com वर महत्त्वाची माहिती दिली आहे.

Locket Tips : लॉकेटचे असे तोटे पण असतात; गळ्यात घालताना हे नियम एकदा समजून घ्या

धर्मशास्त्रांत काय सांगितलं आहे?

खरं तर जेवण झाल्यानंतर लगेचच भांडी घासून, स्वच्छ करून ठेवली पाहिजेत असं शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. पण लगेचच तुम्हाला जरी हे करणं शक्य नसेल तरीही शक्यतो रात्रभर उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवू नका. अशा खरकट्या भांड्यांमुळे ग्रह नाराज होतात आणि तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो, असं शास्त्रांत म्हटलं आहे.

खरकटी भांडी रात्री तशीच न ठेवण्याचं धार्मिक कारण

शास्त्रांमध्ये अनेकदा घराची स्वच्छता आणि साफसफाईबद्दल बोललं जातं. ज्या घरात स्वच्छता राखली जाते तिथं पावित्र्य नांदतं असं म्हणतात. जर घरात शुद्धता, स्वच्छता, पावित्र्य ठेवलं गेलं नाही तर त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. रात्रीच्या जेवणानंतर खरकटी भांडी तशीच ठेवल्याने लक्ष्मी देवी नाराज होते असं म्हटलं जातं. अशा घराची कधीही भरभराट होत नाही. तसंच पैसा अनाठायी कारणांसाठी खर्च होतो. तशीच राहिलेली उष्टी खरकटी भांडी घरात नकारात्मक उर्जा निर्माण करतात असा समज आहे.

Vastu Tips : बाथरूममध्ये चुकूनही ठेऊ नका रिकामी बादली, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान

ज्योतिष काय सांगतं

ज्योतिषशास्त्रानुसार भांड्याचा अधिपती ग्रह म्हणजे मंगळ आहे. जर खरकटी भांडी रात्री तशीच ठेवली गेली तर मंगळ ग्रह नाराज होतो आणि त्यामुळे घरातील सुखशांती कमी होते. दु:ख वाढतं असं मानलं जातं. तसंच रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवल्याने चंद्र आणि शनी ग्रहही नाराज होतात असं सांगण्यात येतं. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तसंच घरातील व्यक्तींचा मानसिक ताणही वाढतो.

शास्त्रीय कारण

रात्रीची जेवणं झाल्यानंतर खरकटी भांडी जर तशीच ठेवली गेली तर त्यात उरलेल्या अन्नकणांमध्ये बॅक्टेरिया म्हणजे जंतू निर्माण होतात. रात्रभरात बॅक्टेरियांची (Bacteria) ही संख्या अनेक पटींनी वाढते. रात्रभर ही भांडी तशीच खरकटी ठेवून सकाळी ती घासली तर त्यात अनेक जीवजंतू तसेच राहतात जे अन्नावाटे आपल्या शरीरात जातात. अर्थातच यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्या घरांमध्ये रात्रभर खरकटी भांडी न धुता तशीच ठेवली जातात त्या घरांमध्ये आजारांचं प्रमाण जास्त असतं.

आजकाल अनेक कुटुंबांमध्ये स्त्री-पुरुष दोघेही रात्री उशिरापर्यंत काम करतात. अशा परिस्थितीत भांडी रात्री स्वच्छ करणं ही फक्त स्त्रीची जबाबदारी आहे असं न समजता तिला कुटुंबातील सदस्यांनी मदत केली तर खूप फरक पडू शकेल. त्यामुळे रात्रीची भांडी त्याचवेळेस स्वच्छ होऊ शकतील.

First published: August 9, 2022, 10:00 PM IST
Tags: vastu

ताज्या बातम्या