मराठी बातम्या /बातम्या /religion /चित्रकूटमधल्या मंदाकिनी नदीत वाहतोय दुधाचा प्रवाह; स्नान, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

चित्रकूटमधल्या मंदाकिनी नदीत वाहतोय दुधाचा प्रवाह; स्नान, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

चित्रकूट

चित्रकूट

मकर संक्रांतीच्या दिवशी भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. तिथे त्यांना अद्भुत रहस्यं आणि कला पाहायला मिळतात.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    चित्रकूट,28 जानेवारी : : चित्रकूट हे भगवान श्रीरामाच्या वास्तव्याचं पवित्रस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. अमावास्या, वसंत पंचमी, तसंच विविध सणावारांना लाखो भाविक तिथल्या मंदाकिनी नदीत स्नान करून भगवान कामतानाथांचे दर्शन घेतात. मकर संक्रांतीच्या दिवशी भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. तिथे त्यांना अद्भुत रहस्यं आणि कला पाहायला मिळतात. या गोष्टी पाहून भाविक आश्चर्यचकित होत असतात.

    यंदादेखील भाविकांना अशाच प्रकारची एक आश्चर्यकारक घटना तिथे पाहायला मिळाली. वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी (27 जानेवारी) भाविकांना मंदाकिनी नदीत दूध वाहताना दिसलं. असं मानलं जातं, की प्राचीन काळापासून मंदाकिनी नदीला पयस्विनी नदी असं म्हणतात. पय म्हणजे दूध अर्थात दुधाचा प्रवाह असलेली नदी. सध्या सुरू असलेला हा पवित्र दुधाचा प्रवाह न्यूज 18 च्या कॅमेऱ्यात टिपला गेला आहे. तुम्हीदेखील व्हिडिओच्या माध्यमातून या पवित्र प्रवाहाचं दर्शन घेऊ शकता.

    हेही वाचा- Dhirendra Shastriच्या 'जादू'चं सत्य काय? देवघरचे पुरोहित म्हणतात, सर्वात मोठा चमत्कारी बाबा इथे

    माँ मंदाकिनी नदीचं प्राचीन नाव पयस्विनी आहे. कारण प्राचीन काळी तिच्यामध्ये दुधाचा प्रवाह वाहत असे, असं मानलं जातं. कालापरत्वे त्यात बदल होत गेला; पण आजही त्यात कधी कधी दुधाच्या धारा दिसतात. हा दुधाचा प्रवाह फार कमी काळासाठी दिसून येतो आणि नंतर अदृश्य होतो. या वेळी चित्रकूटमध्ये वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी मंदाकिनी नदीत दुधाचा प्रवाह पाहायला मिळाला. हा प्रवाह पाहून भक्तांना आनंद झाला आणि त्यांनी नदीत स्नानदेखील केलं. हा दुधाचा प्रवाह पाहण्यासाठी भाविक वाट पाहत असतात; पण भक्तांना ही संधी क्वचितच मिळते.

    मंदाकिनी नदीत स्नान केल्याने भक्तांची पापं नष्ट होतात आणि दुधाच्या प्रवाहात स्नान केल्याने दुःखं आणि रोग दूर होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे मंदाकिनी नदीला छोटी गंगा असंही संबोधलं जातं. नदीच्या मधोमध पांढऱ्या रंगाचा प्रवाह कसा वाहतो आणि तो किती अप्रतिम आणि अद्वितीय आहे हे आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.

    दुधाच्या प्रवाहामागे कोणती श्रद्धा आहे?

    तोतामुखी हनुमान मंदिराचे महंत मोहित दास यांनी या दुग्ध प्रवाहाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, `जे भक्त रोगांनी ग्रस्त आहेत ते चित्रकूट या धार्मिक नगरीत येतात आणि माता अनसूयेच्या आशीर्वादाने मंदाकिनी नदीत स्नान करतात. यामुळे त्यांची दुःख, आजार दूर होतात, असं मानलं जातं. दुधाचा प्रवाह वाहत असताना त्यात माणसाला त्याची सावली दिसली तर त्याचा त्रास दूर होतो. यंदा वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुधाचा प्रवाह दिसला आहे. भक्त दुःखापासून मुक्त व्हावेत यासाठी माँ मंदाकिनीचा हा आशीर्वाद आहे.`

    सहसा, जेव्हा भक्त येथे येतात तेव्हा त्यांना पयस्विनी म्हणजे माता मंदाकिनी नदीतला दुधाचा प्रवाह पाहायला मिळावा आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं; पण काही मोजकेच भक्त असतात, ज्यांना दुधाची धारा पाहण्याची शुभ संधी मिळते. प्राचीन काळापासून हा दुधाचा प्रवाह वेगवेगळ्या वेळी दिसून येतो.

    First published:

    Tags: Local18