मराठी बातम्या /बातम्या /religion /

Chankyaniti : घाणीत पडल्या तरी 'या' गोष्टींची किंमत होत नाही कमी, त्या उचलणं फायदेशीरच ठरेल

Chankyaniti : घाणीत पडल्या तरी 'या' गोष्टींची किंमत होत नाही कमी, त्या उचलणं फायदेशीरच ठरेल

आचार्य चाणक्य हे भारतातले महान विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथात त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांबाबत लिहलं आहे.

आचार्य चाणक्य हे भारतातले महान विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथात त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांबाबत लिहलं आहे.

आचार्य चाणक्य हे भारतातले महान विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथात त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांबाबत लिहलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 डिसेंबर :     समाजात वावरताना काही नीतिमूल्यं आणि काही आदर्श डोळ्यांसमोर ठेवले, तर माणसाचं आयुष्य सफल होतं. काही वेळेला यशस्वी होण्यासाठी चाणक्यनीती वापरावी लागते. काही वेळा त्यासाठी घाणीत हातही घालावा लागतो. उदाहरणार्थ, चिखलात फुललेलं कमळ सुंदर असतं; मात्र त्यासाठी चिखलात हात घालूनच ते खुडावं लागतं, तसंच काही वेळा चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाईट गोष्टी काही काळ सहन कराव्या लागतात, असं चाणक्यनीती सांगते.

आचार्य चाणक्य हे भारतातले महान विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथात त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांबाबत लिहलं आहे. त्या नीतीनुसार आचरण करणाऱ्या व्यक्ती नेहमी यशस्वी होतात. या चाणक्यनीतीमुळे अनेक संकटांपासून सुटका होऊ शकते. चाणक्यनीतीमध्ये अशा काही गोष्टींविषयी लिहिलं आहे, की ज्या घाणीत पडल्या असूनही उचलल्या पाहिजेत. त्या घेतल्यामुळे काहीही नुकसान होत नाही, उलट फायदाच होऊ शकतो. थोडक्यात काही वेळेला वाईट गोष्टींमधूनही चांगलं शोधण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे.

हेही वाचा -  मुठ पकडण्याच्या पद्धतीवरूनही कळतो माणसाचा स्वभाव; पटत नसेल तर पाहा

चाणक्य त्यांच्या ग्रंथात म्हणतात, की एखादी मौल्यवान गोष्ट घाणीत पडली असेल, तरी तिला त्यातून उचलावं. उदाहरणार्थ, सोन्याची एखादी वस्तू चिखलात पडली असेल, तर ती उचलावी. कारण चिखलात पडली असली, तरी तिचं मूल्य कमी होत नाही. यामागचं तत्त्वज्ञान लक्षात घेतलं तर असं लक्षात येतं, की एखादी व्यक्ती मनानं चांगली असेल, पण वाईट व्यक्तींच्या सहवासात असेल, तर त्या व्यक्तीची साथ सोडून चालणार नाही. कारण वाईट व्यक्तींच्या बरोबर राहिल्यानं तिचा चांगुलपणा कमी होत नाही.

वाईट गोष्टींमधूनही चांगलं शोधण्याचा प्रयत्न करावा, असं चाणक्य सांगतात. अशाच व्यक्ती जीवनात यशस्वी होतात. तसंच चांगल्या गोष्टींचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. अशी विचारसरणी असेल तर नक्कीच यश मिळतं.

हेही वाचा -  Datta Jayanti : कोल्हापूरातील मंदिरात 126 वर्षांपासून अखंड सुरु आहे वीणावादन, Video

एखाद्या गुणी मुलीला तुमची सून करताना तिच्या घरचे वाईट असले, तरी त्याचा फारसा विचार करू नका. कारण मुलीच्या कुटुंबीयांकडे न पाहता तिचे गुण आणि तिचा स्वभाव पाहा. अशी सुस्वभावी मुलगी तुमच्या घराला नक्कीच स्वर्ग बनवेल.

जीवनात दुष्ट व्यक्ती आणि साप यांच्यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली, तर सापाची निवड करा. कारण आपण त्रास दिल्याशिवाय किंवा त्याच्या जिवाला धोका असल्याशिवाय साप आपल्याला काहीच करत नाही; पण दुष्ट व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला त्रास देऊ शकते.

चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टींचं आचरण केलं, तर संकटांमधून मार्ग तर सापडतोच, शिवाय आयुष्यात यशस्वीही होता येतं.

First published:

Tags: Astrology and horoscope