मुंबई, 03 फेब्रुवारी : ज्योतिष हे एक असे शास्त्र आहे, ज्याद्वारे व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्य याबाबत बऱ्याच गोष्टी जाणून घेता येतात. हा चमत्कार ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगामुळे होऊ शकतो, ज्याचा माणसाच्या जीवनावर खूप परिणाम होतो. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू या ग्रहांमध्ये अफाट शक्ती आहे, ज्यामुळे मानवी जीवन प्रभावित होते. यापैकी चंद्र देखील खूप शक्तिशाली आहे. कुंडलीत चंद्राचे बल मिळवायचे असेल तर काय करायला हवे, याविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी सांगितलेले उपाय पाहुया. जाणून घ्या कोणत्या उपायाने तुम्हाला कुंडलीतील चंद्राची कृपा मिळते.
कुंडलीतील चंद्र मजबूत करण्यासाठी उपाय -
- रत्नशास्त्रामधील उपाय पाहिल्यास, यासाठी तुम्ही शुद्ध मोती धारण करू शकता.
- वटवृक्षाला (वड) पाणी अर्पण केल्याने चंद्राची कृपाही मिळते.
- भगवान शिव आपल्या डोक्यावर चंद्र धारण करतात, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराला तांदळाची खीर किंवा रबडी अर्पण करणे देखील चंद्रबलासाठी चांगला मार्ग आहे.
- चांदीचे दागिने परिधान केल्याने देखील इच्छित परिणाम मिळतात.
- सोमवारी नऊ मुलींना खीर खाऊ घालून चंद्रबल मिळवता येते.
- लवकर झोपणे हा देखील एक चांगला उपाय आहे. चंद्र बलवान बनवायचा असेल तर रात्री उशिरापर्यंत जागू नका.
- घराचा पाया घालताना चांदीचा छोटा तुकडा मातीत घातला पाहिजे, असं केल्यानंही चंद्र मजबूत होतो.
- दुसरा उपाय म्हणजे तुमच्या नातेवाईकांकडून म्हणजे आई, मामा यांच्याकडून चांदीची भांडी भेट म्हणून मिळवूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो.
- चंद्र कमजोर असताना पाणी, दूध, तांदूळ यासारख्या पांढर्या वस्तूंचे दान करा, यामुळे चंद्राचे दुष्परिणाम संपतात.
- रात्री दूध आणि खीर खाल्ल्याने या सर्व गोष्टींचा परिणाम उलटा होऊ शकतो, त्यामुळे चंद्र कमजोर असताना रात्री या गोष्टींचे सेवन करू नका.
हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.