मुंबई, 15 मार्च : आचार्य चाणक्य यांनी आपल्या निती ग्रंथात जीवन शांततेने जगण्यासाठी शेकडो धोरणांचा उल्लेख केला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील पाच गोष्टी जन्मापूर्वीच कशा ठरवल्या जातात, हे त्यांनी त्यांच्या निती ग्रंथात स्पष्ट केलं आहे. यासोबतच त्यात कर्म कसे बदलता येईल हेही सांगितले. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी ज्या जन्मापूर्वी ठरवल्या जातात. आचार्य चाणक्य त्यांच्या निती ग्रंथाच्या चौथ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात म्हणतात-
आयुः कर्म च विद्या च वित्तं निधनमेव च .
पञ्चैतानि विलिख्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः ॥
चाणक्याच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, वय, कर्म, धन-संपत्ती, ज्ञान आणि मृत्यू या पाच गोष्टी व्यक्ती गर्भात आल्यावर एकाच वेळी ठरतात. साधारणपणे त्यात कोणताही बदल होत नाही.
कर्म नाकारता येत नाही -
चाणक्य पुढे म्हणतात की, कर्म म्हणजे पुरुषार्थ हा नाकारता येत नाही. हे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी आहे. ज्याला प्रारब्ध म्हणतात. कर्म करणे हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे, असे शास्त्रात सांगितले आहे. ते म्हणतात, जिद्द ठेवून काम केलं तर या सगळ्यातही बदल करता येतो.
याच्यावर चाणक्य आणखी एक श्लोक सांगतात-
धर्मार्थकाममोक्षेषु यस्यैकोऽपि न विद्यते.
जन्म-जन्मनि मत्र्येषु मरणं तस्य केवलम्..
म्हणजे मनुष्याचे जीवन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार मुख्य उद्देशांसाठी निर्माण झाले आहे. ज्याला या चार गोष्टींपैकी एकही मिळत नाही, तो केवळ मरण्यासाठीच जन्माला येतो. आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने काम करूनच संपत्ती मिळवली पाहिजे.
हे वाचा - लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Acharya chanakya, Chanakya niti, Religion