मराठी बातम्या /बातम्या /religion /

Champa Shashti 2022: आज चंपाषष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, कथा; महादेवाच्या खंडोबा रुपाची केली जाते पूजा

Champa Shashti 2022: आज चंपाषष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, कथा; महादेवाच्या खंडोबा रुपाची केली जाते पूजा

चंपाषष्ठी पूजा

चंपाषष्ठी पूजा

Champa Shashti 2022: या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटकात हे व्रत पाळले जाते. शेतकरी खंडोबाला भगवान शंकराचे रूप मानतात, खंडोबाची पूजा शेतकऱ्यांचे दैवत म्हणून केली जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 29 नोव्हेंबर : आज मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठी व्रत आहे. दरवर्षी हे व्रत मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथीला केलं जातं. याला उत्तर भारतात बैंगन छठ असेही म्हणतात. चंपाषष्ठी व्रत दोन शब्दांनी बनलेले आहे. एक चंपा आणि दुसरी षष्टी. या दिवशी भगवान कार्तिकेयाला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठीतिथीमुळे या व्रताला चंपा षष्ठी असे नाव देण्यात आले आहे. आजच्या पूजेत वांगी अर्पण करण्याचीही परंपरा आहे, म्हणून या व्रताला बैगन छठ म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटकात हे व्रत पाळले जाते. शेतकरी खंडोबाला भगवान शंकराचे रूप मानतात, खंडोबाची पूजा शेतकऱ्यांचे दैवत म्हणून केली जाते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी चंपा षष्ठीचा शुभ मुहूर्त, व्रत कथा आणि पूजेची पद्धत सांगितली आहे.

चंपाषष्ठी 2022 मुहूर्त

मंगळ शुक्ल पक्ष षष्ठी तिथीचा प्रारंभ: 28 नोव्हेंबर, सोमवार, दुपारी 01.35 वा.

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी तिथी समाप्त: आज, मंगळवार, सकाळी 11.04 वा.

सकाळी पूजेची वेळ: 06:45 ते 08:05

दुपारची पूजा वेळ: 12.06 ते 02.46

ध्रुव योग: आज सकाळपासून दुपारी 02.53 पर्यंत

रवि योग : सकाळी 06.55 ते 08.38 पर्यंत

द्विपुष्कर योग : सकाळी 11.04 ते उद्या सकाळी 06.55 पर्यंत

चंपा षष्ठीचे व्रत व उपासना पद्धत -

आज शुभ मुहूर्तावर खंडोबाची पूजा करावी. या दरम्यान शिवलिंगाला गंगेच्या पाण्याने आणि गाईच्या दुधाने अभिषेक केला जातो. त्यानंतर त्यावर बेलपत्र, फुले, गुलाल, वांगी, बाजरी, साखर इत्यादी अर्पण केले जातात. धार्मिक मान्यतांनुसार, प्रार्थना पाठ केल्याने दुःख दूर होते आणि इच्छा पूर्ण होतात. भगवान शिव आपल्या भक्तांचे रक्षण करतात. पूजेनंतर बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत प्रसाद म्हणून वाटले जाते.

तर भगवान कार्तिकेयच्या पूजेमध्ये चंपा फुले विशेष अर्पण केली जातात. तो आपल्या भक्तांना सुख, समृद्धी आणि मोक्ष देतो. भविष्य पुराणानुसार भगवान कार्तिकेय चंपा षष्ठीला देवतांच्या सैन्याचे सेनापती झाले. या तिथीलाच कुटुंबावर रागावून त्यांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगावर मुक्काम केला.

बैंगन छठाची कहाणी

पौराणिक कथेनुसार, महादेव आपल्या भक्तांचे मणि-मल्हा नावाच्या दोन राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी प्रकट झाले. मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी खंडोबा नावाच्या ठिकाणी महादेवाने भैरवाचे रूप धारण करून मणि-मल्हाचा वध केला. त्यामुळे त्यांना खंडोबा म्हटले जाऊ लागले. दरवर्षी या तिथीला बैंगन छठ साजरी केली जाते आणि भगवान शिवाची पूजा केली जाते.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion