वाराणसी, 23 मार्च : शक्तीच्या उपासनेचा सण नवरात्रीला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे दर्शन घेण्याचा विधी असतो. काशीमध्ये शैलपुत्री देवीचे प्राचीन मंदिर आहे. देवीच्या दर्शनाने भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. त्यामुळेच नवरात्रीच्या काळात येथे भाविकांची गर्दी होते.काशीच्या या ऐतिहासिक मंदिराशी संबंधित कथाही रंजक आहे.
धार्मिक कथांनुसार, देवी शैलपुत्री ही शैलराज हिमालयाची कन्या आणि देवी पार्वतीचे रूप आहे. असे म्हणतात की, एकदा भगवान भोलेनाथ यांच्यावर रागावून माता काशीला गेली होती. त्यानंतर भगवान भोलेनाथ त्यांच्या शोधात काशीला आले. पण, देवीला हे शहर इतकं आवडलं की त्यांनी वरुणाच्या तीरावर आपला निवास केला आणि इथेच स्थायिक झाल्या.
शतकानुशतकांचा जुना इतिहास -
मंदिराचे महंत गजेंद्र गोस्वामी यांनी सांगितले की, देवीची हे पीठ शतकानुशतके जुने आहे आणि संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये शैलपुत्री देवीचे एकमेव मंदिर काशीच्या अलईपूरमध्ये आहे. स्कंद पुराणातील काशी खंडातही देवीच्या या प्राचीन मंदिराचा उल्लेख आहे. येथे भक्तीभावाने येणाऱ्या भक्ताच्या सर्व मनोकामना देवी पूर्ण करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
नवरात्रीत भाविकांची गर्दी -
नवरात्रीच्या काळात वाराणसीच्या या मंदिरात भाविकांची गर्दी असते. याशिवाय शनिवारी आणि मंगळवारीही येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात. शैलपुत्री देवीला जास्वंदी आणि पांढऱ्या फुलांच्या माळा खूप प्रिय मानल्या जातात. यामुळेच भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे नारळ आणि जास्वंदीच्या माळा घेऊन येतात. देवीच्या दर्शनाने अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळेही दूर होतात, असा लोकांचा धार्मिक विश्वास आहे.
दिवसातून तीन वेळा आरती -
दररोज पहाटे 3 वाजता देवीच्या आरतीनंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात. याशिवाय दुपारी नैवेद्यारती आणि रात्री 10 वाजता देवीची शयन आरती होते. यानंतर मंदिराचा दरवाजा बंद होतो.
हे वाचा - बापरे..! शुक्र आणि राहू आलेत एकत्र, या राशीच्या लोकांचा ऐन पाडव्याला शिमगा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.