नवी दिल्ली, 23 मार्च : आज चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस आणि चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आहे. आज देवी दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी माता म्हणून पूजले जाते. ब्रह्मचारिणी माता ही साधी, सौम्य आणि शांत मानली जाते. ती तिच्या दृढ इच्छाशक्ती, तप, त्याग यासाठी ओळखली जाते. तिचे रूप पाहिले तर, ती पांढरी वस्त्रे परिधान करते, हातात जपमाळ आणि कमंडल धारण करते. तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ.कृष्णकुमार भार्गव सांगतात की, ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्यानं मंगळ दोष नाहीसा होतो. नवरात्रीत 9 देवींची पूजा केल्यानं नवग्रह दोष दूर होतात, सर्व ग्रह अनुकूल परिणाम देतात, संकटांपासून संरक्षण मिळते. जाणून घेऊया देवी ब्रह्मचारिणी मातेचे माहात्म्य आणि तिच्या पूजेचे फायदे.
कोण आहे देवी ब्रह्मचारिणी?
पौराणिक कथेनुसार, सतीने आत्महत्या केल्यानंतर माता पार्वतीचा जन्म झाला. महादेवाशी विवाह करण्यासाठी माता पार्वतीने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्या काळात ती ब्रह्मचर्य, त्याग, तपश्चर्या आणि दृढनिश्चयाची देवी होती. तिचे ते रूप देवी ब्रह्मचारिणी या नावानं ओळखले जाते. तिला तपश्चारिणी असेही म्हणतात.
ब्रह्मचारिणी मातेच्या पूजेचे फायदे-
1. माता ब्रह्मचारिणीची पूजा-उपासना केल्यानं माणूस कठीण परिस्थितीतही घाबरत नाही. त्याची इच्छाशक्ती प्रबळ राहते.
2. कामांमध्ये यश मिळते, त्यासाठी भले भरपूर कष्ट करावे लागले. व्यक्ती त्याच्या कार्य मार्गापासून विचलित होत नाही.
3. देवी ब्रह्मचारिणीची उपासना केल्यानं व्यक्तीमध्ये त्याग, तपश्चर्या, आत्मसंयम, ब्रह्मचर्य, सद्गुण इत्यादी गुण विकसित होतात.
4. देवी ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादाने माणसाच्या अनेत समस्या संपतात. दु:ख दूर होतात.
5. जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळदोष असेल तर ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने तो दूर होईल.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हजारो वर्षांची तपश्चर्या -
पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीच्या वडिलांना तिचा विवाह भगवान विष्णूशी करायचा होता. तेव्हा नारदजींनी माता पार्वतीला भगवान शंकराची आराधना करण्यास सांगितले आणि त्यांच्या जन्माचा उद्देश सांगितला. मग पार्वती घनदाट जंगलाच्या मध्यभागी जाऊन तपश्चर्या करू लागली. तिला भगवान शंकरालाच पती म्हणून मिळवायचे होते.
मुसळधार पाऊस, कडक सूर्यप्रकाश, वादळ अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी तपश्चर्या सोडली नाही. ती निश्चयाने तपश्चर्या करत राहिली. या दरम्यान त्यांनी ब्रह्मचर्याचे कठोर नियम पाळले. अनेक वर्षे तिने फळे, भाज्या आणि बेलपत्र खाऊन तपश्चर्या केली. व्रत, जप आणि तपस्या यांमुळे त्यांचे शरीर अत्यंत दुर्बल झाले होते. त्यानंतरही शिवजींना मिळवण्याची इच्छा कमी झाली नाही.
शेवटी माता ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्या मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद दिला. त्यानंतर शिव आणि पार्वतीचा विवाह झाला.
हे वाचा - बापरे..! शुक्र आणि राहू आलेत एकत्र, या राशीच्या लोकांचा ऐन पाडव्याला शिमगा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gudi Padwa 2023, Navratri, Religion