मुंबई, 30 मार्च : आज महानवमी आहे, ज्याला दुर्गा नवमी असेही म्हणतात. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात, आणि आज रामनवमीही आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही नवरात्रीची नववी तिथी आहे. महानवमीच्या दिवशी दुर्गेच्या नवव्या रूपाची सिद्धिदात्री म्हणून पूजा केली जाते. देवी सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते. या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केल्यानंतर हवन करून नंतर कन्यापूजा केली जाते. भगवान शिव स्वतः माता सिद्धिदात्रीची पूजा करतात, कारण त्यांच्या कृपेने शिवाला आठ सिद्धी प्राप्त झाल्या, असे सांगितले जाते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून सिद्धिदात्रीच्या उपासनेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि योग जाणून घेऊ.
महानवमी 2023 सिद्धिदात्री पूजेची वेळ -
पंचांगानुसार, चैत्र शुक्ल नवमी तिथी 29 मार्च बुधवारी रात्री 09.07 पासून सुरू झाली असून आज 30 मार्च रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत नवमी तिथी आहे. आज दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग आहे. या दोन्ही योगांमध्ये महानवमीची पूजा करणे शुभ आणि फलदायी आहे.
सिद्धिदात्रीची उपासना पद्धत -
सकाळी स्नान केल्यानंतर सिद्धिदात्रीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर त्यांना गंगाजलाने स्नान घालून वस्त्र अर्पण करावे. सिंदूर, अक्षत, फुले, हार, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करा. सिद्धिदात्रीला प्रसन्न करण्यासाठी तीळ आणि कमळ अर्पण करा. या दरम्यान तुम्ही ओम देवी सिद्धिदात्र्यै नमः मंत्राचा जप करावा. यानंतर सिद्धिदात्रीची आरती करावी. या पूजेनंतर हवन करून कन्येची पूजा करावी. कन्यापूजेनंतर प्रसाद घेऊन उपवास सोडावा.
देवी भागवत पुराणातील पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने 8 सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्धिदात्रीची पूजा केली. त्यांच्या प्रभावामुळे शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले. तेव्हा भगवान शंकराच्या त्या रूपाला अर्धनारीश्वर म्हटले गेले. लाल वस्त्र परिधान करणारी माता सिद्धिदात्री कमळावर विराजमान आहे. तिने चार हातात शंख, चक्र, गदा आणि कमळाचे फूल धारण केले आहे.
सिद्धिदात्रीच्या उपासनेचे लाभ -
1. सिद्धिदात्रीची आराधना केल्यानं व्यक्तीला 8 सिद्धी आणि 9 प्रकारचे धन मिळू शकते.
2. सिद्धिदात्रीच्या कृपेने माणसाला मोक्ष प्राप्त होतो. तो मानवी जीवनाच्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो.
3. सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने रोग, ग्रह दोष इत्यादी दूर होतात. कोणत्याही व्यक्तीसोबत काहीही अनुचित घडत नाही.
हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Navratri, Ram Navami 2023, Religion