मुंबई, 26 मार्च : आज 26 मार्च हा चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. आज आपण दुर्गेचे पाचवे रूप म्हणून स्कंदमातेची पूजा करतो. सिंहावर स्वार झालेली देवी स्कंदमाता ही चार हात असलेली देवी आहे. तिच्या हातात कमळाचे फूल आहे आणि तिचा मुलगा स्कंदकुमार तिच्या मांडीवर आहे. स्कंदकुमारची आई असल्याने देवीचे नाव स्कंदमाता, असे आहे. स्कंदकुमारला भगवान कार्तिकेय म्हणतात. पौराणिक कथेनुसार, तारकासुराच्या वधासाठी देवीने स्कंदकुमारला 6 मुखांनी जन्म दिला, नंतर स्कंदकुमारने तारकासुराचा वध करून धर्माची स्थापना केली. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून स्कंदमातेची उपासना पद्धत, मंत्र, शुभ काळ आणि महत्त्व याविषयी जाणून घेऊ.
स्कंदमातेच्या पूजेचा मुहूर्त -
पंचांगानुसार आज 26 मार्च रोजी दुपारी 04.32 वाजता चैत्र मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. आज सकाळपासून प्रीति योग तयार झाला असून तो रात्री 11.33 पर्यंत राहील. त्यानंतर आयुष्मान योग सुरू होईल. आज रवि योग दुपारी 02:01 ते उद्या सकाळी 06:18 पर्यंत आहे.
स्कंदमातेचे मंत्र -
बीज मंत्र: ह्रीं क्लीं स्वमिन्यै नम:
पूजा मंत्र: ओम देवी स्कन्दमातायै नमः
महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी। त्राहिमाम स्कन्दमाते शत्रुनाम भयवर्धिनि।।
स्कंदमातेची उपासना पद्धत -
सकाळी स्नान करून देवी स्कंदमातेची पूजा करावी. स्कंदमातेला जास्वंदी, गुलाब, अक्षत, हळदी-कुंकू, धूप, दीप, नैवेद्य, गंध इत्यादी लाल फुले अर्पण करा. या दरम्यान स्कंदमातेच्या मंत्रांचा जप करा. त्यानंतर देवीला केळी आणि बताशे अर्पण करा. त्यानंतर स्कंदमातेच्या बीज मंत्राचा जप करावा. नंतर कापूर किंवा तुपाच्या दिव्याने स्कंदमातेची आरती करावी. त्यानंतर देवीकडे तुमची इच्छा व्यक्त करा.
स्कंदमातेच्या उपासनेचे फायदे -
जे निपुत्रिक आहेत, त्यांनी स्कंदमातेची पूजा करावी. स्कंदमातेची उपासना केल्यानं मुल होतं, असं मानलं जातं. देवी स्कंदमाता ही दु:ख दूर करणारी आहे. कुटुंबाच्या समृद्धी आणि आनंदी जीवनासाठी स्कंदमातेचीही पूजा केली जाते. कामात यश आणि मोक्ष मिळण्यासाठी स्कंदमातेचीही पूजा केली जाते. स्कंदमातेच्या कृपेने पापही नाहीसे होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
हे वाचा - सीतेच्या नावावरून ठेवा मुलीचं छानसं नाव; या 10 नावांपैकी तुम्हाला एक नक्की आवडेल
स्कंदमातेची आरती -
जय तेरी हो स्कंदमाता,
पांचवां नाम तुम्हारा आता।
सब के मन की जानन हारी,
जग जननी सब की महतारी।
तेरी ज्योत जलाता रहूं मैं,
हर दम तुम्हें ध्याता रहूं मैं।
कई नामों से तुझे पुकारा,
मुझे एक है तेरा सहारा।
कहीं पहाड़ों पर है डेरा,
कई शहरों में तेरा बसेरा।
हर मंदिर में तेरे नजारे,
गुण गाए तेरे भक्त प्यारे।
भक्ति अपनी मुझे दिला दो,
शक्ति मेरी बिगड़ी बना दो।
इंद्र आदि देवता मिल सारे,
करें पुकार तुम्हारे द्वारे।
दुष्ट दैत्य जब चढ़ कर आए,
तुम ही खंडा हाथ उठाएं।
दास को सदा बचाने आईं,
चमन की आस पुराने आई।
हे वाचा - चैत्र नवरात्रीत स्वप्नात अशा गोष्टी दिसणं भाग्यशाली! देवीची कृपा असण्याचे संकेत
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.