मुंबई, 24 मार्च : आज 24 मार्च शुक्रवारी चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. या दिवशी देवी दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा म्हणून पूजले जाते. 10 हात असलेली चंद्रघंटा माता हातात चक्र, गदा, धनुष्य, तलवार, त्रिशूळ, कमळ, माळ, कमंडल इ. घेऊन सिंहावर स्वार असते. तिच्या कपाळावर घंट्याच्या आकारातील चंद्र आहे, म्हणून तिचे नाव देवी चंद्रघंटा आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून चंद्रघंटा मातेची पूजा पद्धत, मंत्र, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊ.
चंद्रघंटा पूजेची वेळ 2023
पंचांगानुसार, चैत्र शुक्ल तृतीया तिथी गुरुवार, 23 मार्च रोजी संध्याकाळी 06:20 वाजता सुरू झाली आहे आणि ही तिथी आज, 24 मार्च, शुक्रवार संध्याकाळी 04:59 वाजेपर्यंत आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 06.21 ते दुपारी 01.22 पर्यंत आहे. रवि योग दुपारी 01:22 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:20 पर्यंत आहे.
चंद्रघंटा पूजेचे महत्व
1. देवी चंद्रघंटाच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवन सुखी होते. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
2. ज्यांच्या लग्नाला कोणत्याही कारणाने उशीर होत असेल त्यांनी माता चंद्रघंटाची पूजा करावी. लवकरच लग्न होण्याची शक्यता निर्माण होते.
3. देवी चंद्रघंटाच्या कृपेने पापांचा नाश होतो. धैर्य आणि शक्ती वाढते. शत्रूंवर विजय प्राप्त होतो.
4. मान, पद आणि प्रतिष्ठा वाढीसाठी चंद्रघंटाची पूजा करा. ही देवी मोक्षही देते.
चंद्रघंटाची पूजा पद्धत -
सकाळी स्नान करून देवी चंद्रघंटाची योग्य प्रकारे पूजा करावी. सर्व प्रथम त्यांना अक्षत, हळद-कुंकू, फुले, हार, धूप, दिवा, नैवेद्य, फळे इत्यादी अर्पण करा. या दरम्यान पूजा मंत्राचा जप करा. त्यानंतर चंद्रघंटाला दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खीरही देऊ शकता. देवी चंद्रघंटाची पूजा केल्यानं शुक्र दोष दूर होतो.
चंद्रघंटा मातेचे मंत्र -
बीज मंत्र: ऐं श्रीं शक्तयै नमः
पूजा मंत्र: ओम देवी चन्द्रघण्टायै नमः
स्तुति मंत्र: या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
चंद्रघंटा आरती -
जय मां चंद्रघंटा सुख धाम। पूर्ण कीजो मेरे सभी काम।
चंद्र समान तुम शीतल दाती। चंद्र तेज किरणों में समाती।
क्रोध को शांत करने वाली। मीठे बोल सिखाने वाली।
मन की मालिक मन भाती हो। चंद्र घंटा तुम वरदाती हो।
सुंदर भाव को लाने वाली। हर संकट मे बचाने वाली।
हर बुधवार जो तुझे ध्याये। श्रद्धा सहित जो विनय सुनाए।
मूर्ति चंद्र आकार बनाए। सन्मुख घी की ज्योति जलाएं।
शीश झुका कहे मन की बात। पूर्ण आस करो जगदाता।
कांचीपुर स्थान तुम्हारा। करनाटिका में मान तुम्हारा।
नाम तेरा रटूं महारानी। भक्त की रक्षा करो भवानी।
हे वाचा - बापरे..! शुक्र आणि राहू आलेत एकत्र, या राशीच्या लोकांचा ऐन पाडव्याला शिमगा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.