पुणे, 1 जुलै : जुलै महिन्याला आता सुरूवात झालीय. त्यामुळे आपल्या भविष्यात काय दडलंय हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. जुलैमध्ये बुधादित्य योग आहे. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग अत्यंत शुभ मानला जातो. मात्र बुधादित्य योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. पुण्यातील ज्योतिष शास्त्र अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी याबद्दल माहिती सांगितली आहे. बुधादित्य योग म्हणजे काय? ज्या वेळी एका राशींमध्ये रवी आणि बुध एकत्र असतील रवीच्या पुढे बुध असेल त्याला बुधादित्य योग असे म्हणतात. ज्या लोकांच्या पत्रिकेत योग असतो तो कुठल्या ही स्थानात येऊ शकतो. बुध ग्रहाचे जे महत्व आहे. ह्या ग्रहाचे गुणधर्म वृद्धिंगात होताना दिसतात. ज्यावेळेस बुधादित्य योग होतो त्यावेळेला ती व्यक्ती वाघचतुर असते. बुद्धिमान असते संशोधन लेखन या कार्यामध्ये यशस्वी होते. तसेच वक्तृत्व चांगल असतं. 24 जूनला बुध हा मिथुन राशीत प्रवेश करतो त्याने प्रवेश केला आहे. सध्या जुलैमध्ये रवी हा बुधपासून पास होणार आहे. यामध्ये तांत्रिक दृष्ट्या 5 ते 7 डिग्रीच्या पुढे गेल्या वर त्याची फळे मिळतात.
रवीच्या पुढे बुध गेल्याने हा अनेक अर्थाने चांगला योग समजला जातो. जुलैमध्ये पर्जन्यवृष्टी चांगली होऊ शकते. बुध जेव्हा कर्क राशींमध्ये जातो. तेव्हा तो पर्जन्यवृष्टीसाठी चांगला काळ असतो. कर्क राशीं कडून मिथुन राशींतून जाणाऱ्या रवी बुधमुळे हा अनेक अर्थाने चांगला ठरणार आहे. या महिन्यामध्ये पर्जन्यवृष्टी चांगली असल्यामुळे हा काळ शेतकऱ्यांसाठी चांगला असणार आहे, असं सिद्धेश्वर मारटकर सांगतात.
Pisces Horoscope July 2023 : 15 जुलैपर्यंत थांबा, पुन्हा उघडतील नशिबाचे दरवाजे
हा कुठल्या राशीला चांगले फळ देईल मिथुन राशींला चांगले फळ मिळेल. कर्क राशीला सुद्धा चांगले फळ मिळणार आहे. तसेच सिहं राशीतील लहान मुलांना चांगल सुख मिळेल. व्यक्तींची मानसिकता चांगली राहील शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. बुध हा मार्केटचा कारग्रह असल्यामुळे चांगला फायदा होईल. तसेच मेष राशींच्या लोकांकडून उत्तम साहित्य लिखाण होऊ शिकते. लिखाणाला प्रसिद्धी मिळू शकते. मीन राशी घरात आनंद मिळून देईल. पाहुण्यांच आगमन सुखवाह ठरू शकेल. कन्या राशींमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होतील, असं सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







