मराठी बातम्या /बातम्या /religion /हिंदू वर्षातील शेवटची फाल्गुन अमावस्या असते भूतडी; भूत-आत्म्याशी काय असतो संबंध?

हिंदू वर्षातील शेवटची फाल्गुन अमावस्या असते भूतडी; भूत-आत्म्याशी काय असतो संबंध?

अमावस्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

अमावस्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

फाल्गुन महिन्यात येणार्‍या अमावस्येला भूतडी अमावस्या म्हणतात. फाल्गुन महिना हा हिंदू कॅलेंडर किंवा पंचांगाचा शेवटचा महिना आहे. जो इंग्रजी कॅलेंडरच्या मार्च-एप्रिल महिन्यात येतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 मार्च : सनातन हिंदू धर्मात असे अनेक दिवस आहेत, जे खूप महत्त्वाचे मानले जातात. हिंदू धर्मात अमावस्या तिथीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी दान केल्यानं देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. ज्यामुळे व्यक्तीला शुभ परिणाम प्राप्त होतात. फाल्गुन महिन्यात येणार्‍या अमावस्येला भूतडी अमावस्या म्हणतात. फाल्गुन महिना हा हिंदू कॅलेंडर किंवा पंचांगाचा शेवटचा महिना आहे. जो इंग्रजी कॅलेंडरच्या मार्च-एप्रिल महिन्यात येतो. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा भूतडी अमावस्येचे काय महत्त्व आहे, याबद्दल अधिक माहिती देत आहेत.

भूतडी अमावस्या तिथी, मुहूर्त आणि शुभ योग -

फाल्गुन अमावस्या सुरू होते: 20 मार्च 2023, दुपारी 01:47

फाल्गुन अमावस्या संपते: 21 मार्च 2023, रात्री 10:53

यंदा फाल्गुन महिन्यात येणारी अमावस्या मंगळवारी येत आहे. या अमावस्येला भूतडी अमावस्येशिवाय भौमवती अमावस्या असंही म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार या अमावस्येला अनेक शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे या अमावस्येचे महत्त्व आणखी वाढणार आहे. या दिवशी शुभ, शुक्ल आणि सिद्धी योग तयार होत आहेत.

- भूतडी अमावस्या का म्हणतात?

हिंदू धर्मग्रंथानुसार, अमावस्या प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तारखेला येते. वेगवेगळ्या महिन्यांत आणि विशेष दिवसांमध्ये पडल्यामुळे अमावस्येला वेगवेगळी नावे आहेत. फाल्गुन महिन्यात आलेल्या अमावस्येचे नाव भूतडी अमावस्या असं आहे. हे नाव ऐकल्यावर लोकांच्या मनात प्रश्न येतो की, ही भूतांची अमावस्या आहे की या अमावास्येचा भूतांशी संबंध आहे? धार्मिक शास्त्रानुसार ही समस्या भूतांशी संबंधित नसून नकारात्मक शक्तींशी निश्चितपणे संबंधित मानली जाते. या अमावस्येविषयी असे मानले जाते की, नकारात्मक शक्ती किंवा अतृप्त आत्मा लोकांच्या शरीराला त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी लक्ष्य करतात. या अमावस्येदरम्यान आत्मा आणि नकारात्मक शक्ती अधिक उग्र होतात. आत्म्यांच्या या उग्रपणाला शांत करण्यासाठी भूतडी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे-दानधर्म करणे महत्त्वाचे आहे.

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu