मराठी बातम्या /बातम्या /religion /आज भीष्म द्वादशी, लक्ष्मी-नारायणाच्या पूजेने मिळतं योग्य अपत्य; रोग-पितृदोष नाहीत उरत

आज भीष्म द्वादशी, लक्ष्मी-नारायणाच्या पूजेने मिळतं योग्य अपत्य; रोग-पितृदोष नाहीत उरत

भीष्म द्वादशी

भीष्म द्वादशी

धार्मिक मान्यतेनुसार उत्तरायणाच्या दिवशी पितामह भीष्म यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार अष्टमीला आणि माघ शुक्ल द्वादशीला करण्यात आले. त्यामुळे याला भीष्म द्वादशी म्हणतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 फेब्रुवारी : आज गुरुवार 02 फेब्रुवारीला भीष्म द्वादशी आहे, ती गोविंद द्वादशी म्हणूनही ओळखली जाते. पंचांगानुसार भीष्म द्वादशी ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला येते. या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार उत्तरायणाच्या दिवशी पितामह भीष्म यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार अष्टमीला आणि माघ शुक्ल द्वादशीला करण्यात आले. त्यामुळे याला भीष्म द्वादशी म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करून पूर्वजांची पूजा केल्यानं रोग आणि पितृदोष दूर होतात.

भीष्म द्वादशी 2023

हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी बुधवार, 01 फेब्रुवारी, दुपारी 02:01 वाजता सुरू झाली आहे आणि आज, 02 फेब्रुवारी, गुरुवार, दुपारी 04:26 पर्यंत द्वादशी तिथी असेल. उदयतिथीच्या आधारे आज भीष्म द्वादशी आहे.

भीष्म द्वादशी 2023 पूजा मुहूर्त

तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगतात की आज सकाळी 07:09 पासून शुभ मुहूर्त आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चालेल. यावेळी भगवान कृष्ण आणि भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा करा. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

भीष्म द्वादशी पूजा पद्धत

आज सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजागृहाची स्वच्छता करावी. त्यानंतर शुभ मुहूर्तावर भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मी नारायण यांना पंचामृताने स्नान करावे. त्यांना फुले, अक्षत, धूप, दीप, गंध, नैवेद्य, तुळशीची पाने इत्यादी अर्पण करा. श्री विष्णु चालीसा, विष्णु सहस्रनामाचे पठण करा. आरतीने पूजेची सांगता करावी. कापूर किंवा तुपाच्या दिव्याने आरती करावी.

भीष्म द्वादशीचे महत्त्व

जे खऱ्या भक्तीने भगवान लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात, त्यांना योग्य संतान प्राप्त होते. जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते. या दिवशी पितामह भीष्मांना जलासह तर्पण अर्पण करण्याचा विधी आहे.

हे वाचा - Shiv Mantras: महादेवाची पूजा करताना या मंत्रांचा करा जप; पूर्ण होतील सर्व मनोकामना

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion