Ghee Sankranti 2022: सूर्यदेवांची स्वारी निघालीय सिंह राशीत, आज तूप खाण्याचे विशेष फायदे

Ghee Sankranti 2022: सूर्यदेवांची स्वारी निघालीय सिंह राशीत, आज तूप खाण्याचे विशेष फायदे

सिंह संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यदेव आणि श्री हरी विष्णूच्या पूजेचे महत्त्व आहे. यासोबतच या दिवशी तुपाचे सेवन करणेही आवश्यक आहे. आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून सूर्य संक्रांती आणि या दिवशी तूप सेवन करण्याचे महत्त्व जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : भाद्रपद महिन्यातील सिंह संक्रांती आज बुधवार 17 ऑगस्ट 2022 रोजी आहे. या दिवशी सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करतील. सूर्यदेव दर महिन्याला 12 राशींपैकी एक किंवा दोन राशीत संक्रमण करतात. सूर्य ज्या राशीत भ्रमण करत आहे त्या राशीला संक्रांती (Singh Sankranti) असे म्हणतात. 17 ऑगस्ट रोजी म्हणजे आज सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. म्हणूनच याला सिंह संक्रांत म्हणतात. सिंह संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यदेव आणि श्री हरी विष्णूच्या पूजेचे महत्त्व आहे. यासोबतच या दिवशी तुपाचे सेवन करणेही आवश्यक आहे. आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून सूर्य संक्रांती आणि या दिवशी तूप सेवन करण्याचे महत्त्व जाणून घेऊया.

सिंह सूर्य संक्रांती -

ज्योतिषशास्त्रानुसार सध्या सूर्य कर्क राशीत आहे. 17 ऑगस्ट 2022 रोजी सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करेल. 17 ऑगस्ट रोजी सूर्य कर्क राशीतून सकाळी 07:37 वाजता सिंह राशीत प्रवेश करेल आणि पुढील महिन्यापर्यंत म्हणजेच 17 सप्टेंबर 2022 पर्यंत या राशीत राहील.

सिंह सूर्य संक्रांतीचे महत्त्व -

भाद्रपद महिना आणि चातुर्मासातील दुसरा महिना असल्याने सिंह संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. सिंह संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे गुणवत्तेचे परिणाम प्राप्त होतात. या दिवशी सूर्यदेव, भगवान विष्णू आणि नरसिंह यांची पूजा केली जाते.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

सिंह संक्रांतीला तूप सेवन करणे का आवश्यक आहे?

सिंह संक्रांतीच्या दिवशी व्यक्तीने गायीच्या तुपाचे सेवन केले पाहिजे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. चरक संहितेनुसार सिंह संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन केल्याने व्यक्तीची स्मरणशक्ती वाढते, ऊर्जा वाढते आणि एकाग्रता येते. तसेच या दिवशी तूप खाल्ल्याने कुंडलीतील राहू-केतू दोषापासूनही मुक्ती मिळते.

हे वाचा - Janmashtami 2022: म्हणून पंचामृत सर्व महत्त्वाच्या पूजेमध्ये वापरतात, श्रीकृष्णाशी आहे असा संबंध

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 17, 2022, 10:07 AM IST

ताज्या बातम्या