Bhadrakal: शनिदेवाची बहीण आहे भद्रा; अशी कामे भद्रकाळात अजिबात करायची नसतात

Bhadrakal: शनिदेवाची बहीण आहे भद्रा; अशी कामे भद्रकाळात अजिबात करायची नसतात

या काळात कोणतेही शुभ कार्य केल्यास अशुभ परिणाम मिळतात. पंचांगानुसार, रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) दिवशी गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:38 ते रात्री 08:50 पर्यंत भद्रकाळाची वेळ आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : हिंदू धर्मात कोणतेही काम करण्यापूर्वी शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ वेळ पाहिली जाते. हिंदू धर्मात असे अनेक दिवस सांगितल आहेत ज्यात शुभ कार्य केले जात नाही. ज्या दिवशी भद्रकाळ (Bhadra) असतो, त्या दिवशी शुभ कार्य होत नाही. भद्रा ही शनिदेवाची सख्खी बहीण आहे. हिंदू धर्मात भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करू नये अशी धारणा आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य केल्यास अशुभ परिणाम मिळतात. पंचांगानुसार, रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) दिवशी गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:38 ते रात्री 08:50 पर्यंत भद्रकाळाची वेळ आहे. खरंतर या वेळात बहिणींनी भावाला राखीही बांधू नये. याशिवाय अशी अनेक कामे आहेत जी भद्रा काळात करू नयेत. याविषयी जाणून घेऊया पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून.

ही कामे करू नयेत -

पुराणानुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. शनीप्रमाणेच त्यांचाही स्वभाव देखील खूप रागीट आहे. भद्राच्या स्वभाव आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने तिला पंचांगातील प्रमुख भाग असलेल्या व्यष्टी करणात स्थान दिलं आहे.

हे वाचा - Rakshabandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश

मुंडन, गृहप्रवेश, संस्कार, विवाह सोहळा, रक्षाबंधन यांसारखी शुभ कार्ये भद्रकाळात करू नयेत, असे मानले जाते. भद्रकाळात कोणतेही शुभ काम केल्यास त्याचा अशुभ प्रभाव पडतो, असे म्हटले जाते.

हे वाचा -  Rakshabandhan 2022: यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रकाल; वाचा कधी आणि कसं साजरं करावं रक्षाबंधन

भद्राचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी 12 नामांचा जप -

या भद्राच्या काळाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी भद्राच्या 12 नावांचे रोज सकाळी उठल्यावर नियमितपणे स्मरण करावे, धन, दधिमुखी, भद्रा, महामारी, खरणना, कालरात्री, महारुद्र, व्यष्टी, कुलपुत्रिका, भैरवी, महाकाली आणि असुरक्षयकारी. या मंत्रामुळे कोणत्याही वाईच गोष्टींची भीती राहत नाही. रोगी रोगमुक्त होऊन सर्व ग्रह अनुकूल होतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 10, 2022, 11:02 AM IST

ताज्या बातम्या