मराठी बातम्या /बातम्या /religion /..म्हणून घरात श्रीकृष्णाची मूर्ती असावी; या रुपांमध्ये चित्र असण्याचा होतो विशेष फायदा

..म्हणून घरात श्रीकृष्णाची मूर्ती असावी; या रुपांमध्ये चित्र असण्याचा होतो विशेष फायदा

श्रीकृष्णाची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे

श्रीकृष्णाची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे

Lord Krishna Idol : भगवान विष्णूचा आठवा अवतार मानल्या जाणार्‍या कृष्णाच्या लीला अतुलनीय आहेत. धार्मिक मान्यतांनुसार, आपल्या घरात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्याचे अनेक फायदे आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी : सनातन धर्मात सर्व देवी-देवतांचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. यापैकी एक असलेले भगवान कृष्ण खूप लोकप्रिय आहे. भगवान श्रीकृष्णाची प्रत्येक रूपात, प्रत्येक अवतारात पूजा केली जाते आणि त्यांचे भक्तांना आशीर्वाद प्राप्त होतात. भगवान विष्णूचा आठवा अवतार मानल्या जाणार्‍या कृष्णाच्या लीला अतुलनीय आहेत. धार्मिक मान्यतांनुसार, आपल्या घरात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

संतती सुख- ज्योतिष शास्त्रानुसार संतानसुख मिळवायचे असेल तर घराच्या पूर्व दिशेला बाळ गोपाळाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. असे केल्याने मुलांचे सुख प्राप्त होते असे मानले जाते.

नात्यात मधुरता येते- असे मानले जाते की घरात राधा-कृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यानं पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो, तणाव दूर होतो आणि प्रेम वाढते. राधा-कृष्ण प्रेमाचे प्रतीकही मानले जातात. पती-पत्नीचे नाते अधिक सुधारण्यासाठी घरात राधा-कृष्णाची मूर्ती ठेवू शकता.

घरात शांती येते- असे मानले जाते की बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवल्यानं घरात सुख-शांती राहते. तणावपूर्ण वातावरण संपते. सभोवताली सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

आत्मविश्वास वाढतो- धार्मिक मान्यतेनुसार अर्जुनाला गीतेचे ज्ञान देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे चित्र किंवा मूर्ती लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये कामात आत्मविश्वास वाढतो. परस्पर स्नेह आणि विश्वास निर्माण होतो, असे मानले जाते.

संरक्षणाचे प्रतीक- गोवर्धन पर्वत घेऊन जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवणे हे संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. यामुळे अज्ञात घटनेच्या भीतीपासून किंवा अज्ञात संकटापासून संरक्षण मिळते, असे मानले जाते.

हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu