मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Rudraksha : तुमच्या मुलांना जरूर घाला गणेश रुद्राक्ष; होतात 'हे' फायदे

Ganesh Rudraksha : तुमच्या मुलांना जरूर घाला गणेश रुद्राक्ष; होतात 'हे' फायदे

गणेश रूद्राक्षाचे फायदे

गणेश रूद्राक्षाचे फायदे

गणेश रुद्राक्षामुळे मुलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

मुंबई, 19 ऑगस्ट : लहान मुलं मन लावून अभ्यास (Study) करत नाहीत, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, अशी तक्रार पालक (Parents) करताना दिसतात. खरं तर मुलांशी निगडीत या समस्येमुळे पालक हैराण झालेले असतात. अशावेळी ते वैद्यकीय उपचार, समुपदेशनासारखे पर्याय शोधतात. काही पालक मुलांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी जाणून घेण्यासाठी ज्योतिष अभ्यासकांचा सल्ला घेतात. मुलांची शैक्षणिकदृष्ट्या प्रगती व्हावी, यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये (Jyotish Shastra) अनेक उपाय सांगितले गेले आहेत. रुद्राक्ष परिधान करणं हा त्यापैकीच एक उपाय होय. रुद्राक्षाचे (Rudraksha) अनेक प्रकार आहेत. ज्योतिष अभ्यासक मुलांची नेमकी समस्या जाणून घेत योग्य रुद्राक्ष सुचवतात. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, मुलांच्या बौद्धिक, मानसिक विकासासाठी गणेश रुद्राक्ष (Ganesh Rudraksha) सर्वोत्तम मानला जातो. या रुद्राक्षाचे अनेक फायदे आहेत. मुलांचं अभ्यासात मन लागत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, एकाग्रतेचा अभाव आहे, अशा विविध तक्रारी पालक नेहमीच करतात. मानसिक, बौद्धिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांना गणेश रुद्राक्ष घालणं फायदेशीर ठरतं. या रुद्राक्षामुळे मुलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. हिंदू धर्मानुसार, श्री गणपती (Shri Ganesh) संकटनाशक मानला जातो. तसेच गणपती हा रिद्धी-सिद्धींचा स्वामी आहे. त्यामुळे जे लोक गणेश रुद्राक्ष परिधान करतात, त्यांना जीवनात सकारात्मक परिणाम दिसू लागतात. गणेश रुद्राक्ष हा श्री गणपतीसारखा दिसतो. या रुद्राक्षाचा आकार गणपतीच्या सोंडेसारखा असतो. तसंच श्री गणेश हा बुद्धी आणि विवेकाची देवता आहे. त्यामुळे कुंडलीतला बुध (Mercury) ग्रह बलवान होतो. हा रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीची विवेकबुद्धी तल्लख होते, अशी माहिती ज्योतिर्विद प्रीतिका मुजुमदार यांनी दिली. हे वाचा - महादेवाच्या अश्रूंपासून अशी झाली रुद्राक्षाची उत्पत्ती; धारण करण्याचे नियम समजून घ्या प्रीतिका मुजुमदार यांनी सांगितलं, की गणेश रुद्राक्ष यश, सुख-समृद्धीचं प्रतीक मानला जातो. हा रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला रिद्धी-सिद्धी प्राप्त होतात. शारीरिक तसंच मानसिक शांती लाभते. जर तुमची किंवा तुमच्या मुलांची स्मरणशक्ती कमी असेल तर गणेश रुद्राक्ष अवश्य धारण करावा म्हणजे गळ्यात घालावा किंवा जवळ बाळगावा. यामुळे स्मरणशक्ती वाढते तसेच प्रत्येक काम एकाग्रतेनं पूर्ण करण्याकडे कल वाढतो. जर तुमच्या मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल किंवा शैक्षणिकदृष्ट्या काही अडचणी जाणवत असतील तर मुलांना हा रुद्राक्ष धारण करण्यास द्यावा. या रुद्राक्षामुळे मानसिक ताण आणि मानसिक समस्यादेखील दूर होऊ शकतात. हे वाचा - Gemstone: ही 4 रत्न धारण करण्याचे आहेत विशेष फायदे; नशीब बदलण्यास वेळ नाही लागत व्यापाऱ्यांसाठी गणेश रुद्राक्ष फायदेशीर ठरतो. व्यापार (Business) मंदावला असेल किंवा व्यापारासंबंधी काही अडचणी असतील तर संबंधित व्यक्तीनं हा रुद्राक्ष धारण करावा. यामुळे व्यापारात चांगला लाभ होऊ शकतो तसंच जीवनात यशाचे मार्ग खुले होतात. हा रुद्राक्ष धारण केल्याने जीवनातले कष्ट, समस्या दूर होतात. मोक्षप्राप्तीसाठीदेखील गणेश रुद्राक्ष धारण करणं फायदेशीर मानलं जातं, असं मुजुमदार यांनी सांगितलं.
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या