मराठी बातम्या /बातम्या /religion /

महादेवाला का अर्पण केली जातात बेलाची पानं? असं आहे त्यामागील धार्मिक महत्त्व

महादेवाला का अर्पण केली जातात बेलाची पानं? असं आहे त्यामागील धार्मिक महत्त्व

बेलाच्या पानांचे महत्त्व

बेलाच्या पानांचे महत्त्व

शिवपुराणानुसार समुद्रमंथनातून निघणाऱ्या विषामुळे जगावर संकट आलं होतं. तेव्हा भगवान शंकराने विश्वाचं रक्षण करण्यासाठी ते विषप्राशन केलं होतं. त्यावेळी...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 नोव्हेंबर : हिंदू धर्मात भगवान शंकराला अर्थात महादेवाला दया आणि करुणेचा देव म्हणूनदेखील ओळखलं जातं. महादेवाला भोलेनाथ असंही म्हणतात. जो भक्त भक्तीभावानं भगवान शंकरांची आराधना करतो, त्याला निश्चितच चांगलं फळ मिळतं, अशी धार्मिक मान्यता आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी सांगितलं की, श्रद्धा आणि शुद्ध मनानं पूजा केल्यानेच महादेव प्रसन्न होतात. पण भगवान शंकराला बेलाचं पान अतिशय प्रिय असून ते अर्पण केल्यानं मनोकामना पूर्ण होते. कारण बेलाचं पान भगवान शंकराला अतिशय प्रिय असून, ते अर्पण केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात, आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, अशीही धार्मिक मान्यता आहे.

बेलाच्या पानाचं काय आहे महत्त्व?

शिवपुराणानुसार समुद्रमंथनातून निघणाऱ्या विषामुळे जगावर संकट आलं होतं. तेव्हा भगवान शंकराने विश्वाचं रक्षण करण्यासाठी ते विषप्राशन केलं होतं. पण त्यामुळे भगवान शंकरांच्या शरीराचं तापमान वाढू लागलं, आणि संपूर्ण जगातील तापमान वाढू लागलं. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचं जीवन संकटात आलं. अखेर सृष्टीच्या हितासाठी विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवांनी भगवान शंकराला बेलाची पानं खायला दिली. ही पानं खाल्ल्याने विषाचा प्रभाव कमी झाला, तेव्हापासून भगवान शंकराला बेलाची पानं अर्पण करण्याची प्रथा आहे.

असं करा बेलाचं पान अर्पण

धार्मिक ग्रंथांमध्ये सर्व देवतांची पूजा करण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. शास्त्रात भगवान शंकराला बेलाचं पान अर्पण करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार, भगवान शंकराला 3 पेक्षा कमी पानं असलेला बेल अर्पण करू नये. कापलेली बेलाची पानं भगवान शंकराला अर्पण करू नयेत. तसंच केवळ 3, 5, 7 सारख्या विषम संख्या असलेलं बेलाचं पान अर्पण करावं. 3 पानं असलेलं बेलपत्र हे त्रिदेव आणि शिव यांच्या त्रिशूलाचं रूप आहे, अशी मान्यता आहे.

हे लक्षात ठेवा

बेलाचं पान नेहमी मध्यभागी, अनामिका आणि अंगठ्याने पकडून ते भगवान शंकराला अर्पण करावं. बेलाचं पान हे कधीही अपवित्र नसतं, अशी मान्यता आहे. त्यामुळेच पूर्वी अर्पण केलेलं बेलाचे पान धुऊन पुन्हा भगवान शंकराला अर्पण केलं जाऊ शकतं. बेलाचं पान अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला नेहमी पाण्यानं अभिषेक करावा. या नियमांनुसार बेलाचं पान अर्पण केल्यानं भगवान शिव लवकर प्रसन्न होतात, आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी मान्यता आहे.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion