मुंबई, 25 मार्च : हिंदू धर्मातील देवी-देवता अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. प्राचीन काळापासून लोक या देवतांच्या नावावरून मुला-मुलींची नावे ठेवत आहेत. देवी-देवतांच्या नावावरून आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाव ठेवल्याने त्या देवी-देवतांचे गुणही त्यांच्यात येतात, असे मानले जाते. माता सीतेची नावे मुलींच्या नावासाठी प्राचीन काळापासून वापरली जात आहेत. प्रभु श्रीरामाची पत्नी सीता हिला हिंदू धर्मात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. आपण मुलीचे नाव ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तिला देवी सीतेचे कोणतेही नाव देऊ शकता. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितलेली देवी सीतेची काही नावे पाहु. ज्याचा तुम्ही मुलीचे नाव ठेवण्यासाठी विचार करू शकता.
1. भूमी: हिंदू पुराणात असे सांगितले आहे की, माता सीतेचा जन्म आणि मृत्यू भूमीतूनच झाला. म्हणूनच त्यांना भूमी म्हणूनही ओळखले जाते. या नावाची खास गोष्ट म्हणजे हे नाव कधीही जुन्या पद्धतीचे वाटत नाही.
2. जानकी: जानकी हे माता सीतेच्या अनेक नावांपैकी एक आहे. राजा जनकाची कन्या असल्याने आई-वडीलही जानकी या नावानेच हाक मारत.
3. सिया: सिया हे माता सीतेचे एक नाव आहे. या नावाचा अर्थ देवी सीता आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाचे नाव छोटे-साधे ठेवायचे असेल तर हे नाव त्यासाठी योग्य आहे.
4. मृण्मयी: माता सीतेच्या या नावाचा अर्थ मातीपासून बनवलेली असा आहे. धर्म पुराणानुसार माता सीतेचा जन्म शेतातील मातीपासून झाला. म्हणूनच तिला मृण्मयी म्हणतात.
5. लक्षाकी: हे देखील माता सीतेच्या अनेक नावांपैकी एक आहे. आजच्या युगात हे नाव अगदी अनोखे आणि आधुनिक वाटते. सीतेच्या या नावावरून तुम्ही तुमच्या मुलीचे नाव ठेवू शकता.
हे वाचा - हनुमानाला का म्हटलं जातं 'अष्टसिद्धी के दाता'; कोणत्या आहेत त्या आठ सिद्धी?
6. क्षितिजा: माता सीतेचे प्रत्येक नाव खूप सुंदर आहे, परंतु हे नाव थोडे वेगळे आहे. जर तुम्हाला मुलीचे नाव पृथ्वी मातेच्या नावावरून ठेवायचे असेल. मग हे त्यासाठी योग्य नाव आहे.
7. वैदेही: देवी सीतेचे वडील राजा जनक यांना विदेदचा राजा म्हटले जायचे. या कारणास्तव सीतेचे एक नाव वैदेही आहे.
8. मैथिली: देवी सीतेचे हे नाव भारतातील काही राज्यांमध्ये खूप आवडीचे आहे. राजा जनकाला मिथिलानरेश म्हणत, आणि त्यांची कन्या असल्यामुळे देवी सीता मैथिली म्हणून ओळखली जाते.
हे वाचा - श्रीरामावरून बाळाचं नाव ठेवायचं आहे का? या 6 पैकी एक तुम्हाला नक्की आवडेल
9. सीताशी: हे देखील देवी सीतेच्या अनेक नावांपैकी एक आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाचे नाव "S" अक्षराने ठेवायचे असेल. तर हे नाव निवडू शकता. या नावाचा अर्थ देवी सीता असाच आहे.
10. या नावांव्यतिरिक्त तुम्ही सीता, मिथिलेश, जनकनंदिनी, पार्थवी, सितेश, रमिथा, सियांशी या नावांचा देखील विचार करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.