मराठी बातम्या /बातम्या /religion /

Gold Shopping : सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

Gold Shopping : सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

सोन्यात गुंतवलेला पैसा इतर गुंतवणुकीप्रमाणे वाढला नाही तरी तो सुरक्षित पर्याया मनला जातो. सोन्याचा संबंध कुबेराच्या खजिन्याशी जोडला जातो. त्यामुळे तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते शुभ मुहूर्तावरच खरेदी करावे.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 13 ऑगस्ट : सोन्याची किंमत कितीही वाढली तरी लोक सोनं खरेदी करण्यासाठी मागेपूढे पाहत नाही. भारतात सोन्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे देशात सण आणि उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते. सोन्याकडे एकप्रकारच्या गुंतवणूसारखे पाहिले जाते. सोन्यात गुंतवलेला पैसा इतर गुंतवणुकीप्रमाणे वाढला नाही तरी तो सुरक्षित पर्याया मनला जातो. सोन्याचा संबंध कुबेराच्या खजिन्याशी जोडला जातो. त्यामुळे तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते शुभ मुहूर्तावरच खरेदी करावे. अन्यथा घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि घरातील बरकत निघून जाऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते आणि कोणत्या दिवशी सोनं खरेदी करू नये. सोनं कधी खरेदी करावं? झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केले जाते. हे दोन्ही मुहूर्त सोनं खरेदी करण्यासाठी शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते आणि घरामध्ये लक्ष्मीचा वावर सुरू होतो अशी मान्यता आहे. मात्र तुम्ही दिवस, वार आणि शुभ मुहूर्त लक्षात घेऊन कधीही सोने खरेदी करू शकता.

Locket Tips : लॉकेटचे असे तोटे पण असतात; गळ्यात घालताना हे नियम एकदा समजून घ्या

सोनं कोणत्या वारी खरेदी करावं? आठवड्यातील वारांनुसार सोनं खरेदी करायचे असेल तर तुम्ही रविवार आणि गुरुवारी सोने खरेदी करू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार हे दोन्ही वार सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने माता लक्ष्मीसोबत सूर्याची कृपा होते आणि घरात समृद्धी येते अशी मान्यता आहे. श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत सोनं कधी खरेदी करू नये? सोन्याला सूर्यदेवाचा कारक मानले जाते. तसेच सूर्य आणि शनि यांच्यात वैर आहे अशी धार्मिक मान्यत आहे. शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. त्यामुळे शनिवारी चुकूनही सोनं खरेदी करू नये असे सांगितले जाते. शनिवारी सोनं खरेदी केल्याने तुमचे खूप नुकसान होऊ शकते आणि घरची आर्थिक परिस्थितीही बिघडू शकते असे मानले जाते.
First published:

Tags: Gold, Lifestyle, Religion

पुढील बातम्या