मराठी बातम्या /बातम्या /religion /मिथुन राशीच्या लोकांना हे 7 प्रश्न कधी विचारू नयेत; उगाच तोंडघशी पडाल

मिथुन राशीच्या लोकांना हे 7 प्रश्न कधी विचारू नयेत; उगाच तोंडघशी पडाल

मिथुन राशीच्या लोकांना काय विचारू नये

मिथुन राशीच्या लोकांना काय विचारू नये

मिथुन राशीच्या थोड्या अनोख्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांना अनेक गोष्टी खटकत असतात. यामुळे त्यांना हे 7 प्रश्न कधी विचारू नयेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 जानेवारी: मिथुन राशीचे चिन्ह जुळे आहे. मिथुन हा वायुशी संबंधित आहे, त्याची गुणवत्ता बदलण्यायोग्य आहे आणि त्यांची वृत्ती सकारात्मक असते. त्याचा अधिपती बुध आहे आणि गुरू त्यात उच्च आहे. मिथुनचे बोधवाक्य आहे: "मला वाटते." ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रह मिथुन राशीवर राज्य करतो. प्राचीन ग्रीक लोकांनी बुध ग्रहाला दोन नावे दिली होती. मिथुन राशीच्या थोड्या अनोख्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांना अनेक गोष्टी खटकत असतात. यामुळे त्यांना हे 7 प्रश्न कधी विचारू नये.

1. तुम्ही इतके का बोलत आहात?

मिथुन राशीच्या व्यक्तींना इतरांशी बोलणे आवडते आणि यामध्ये दूषणे देणेदेखील समाविष्ट आहे, मिथुन व्यक्ती लोकांबद्दल नवनवीन गप्पाटप्पा ऐकण्यासाठी कान टवकारलेले ठेवतात. त्यांना तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दलचा किस्सा विचारताच ते आडपडदा न ठेवता सगळं काही सांगत राहतात. अशा वेळी तुम्हाला ते ऐकण्यात स्वारस्य नसले तरी ऐकत राहावे लागेल. कारण जर तुम्ही त्यांना बोलण्यावरून टोकले तर तुमच्याबद्दल लगेच मत तयार करतील.

2. तुम्ही कधीच गंभीर का नसता?

बहुतेकांना वायफळ गप्पा आवडतात. मिथुन व्यक्ती त्यांच्या आकर्षक स्मित आणि विनोदाने बहुतेक लोकांना गुंतवून ठेवतात. त्यांना मनमुराद हसणे आवडते. त्यांच्या क्षुल्लक विनोदाला जे हसत नाहीत त्यांच्यासाठी मात्र ते सहानुभूती ठेवत नाहीत. मिथुन त्यांच्या रोमँटिक जोडीदारासारखे बुद्धिमान असतात. जर तुम्ही त्यांना हसवले, तर ते तुमच्याशी मैत्र जुळवतात.

3. तुम्ही ओंगळ का आहात?

मिथुन राशीच्या लोकांकडे बुद्धिमत्तेसह संवेदनशील मन आणि तिखट जीभ असते, जी तुम्हाला एका झटक्यात अपमानित करू शकते. मिथुन व्यक्तीला तुम्ही अडचणीचा प्रश्न विचारलात की, लगेच ते तिखट उत्तर देतात.

4. तुम्ही एकाच कामावर लक्ष का देत नाहीत?

मिथुनला एकाच वेळी विविध गोष्टी करायला आवडते. त्यांना वाटते की ते सर्वोत्कृष्ट मल्टीटास्क आहेत. दुर्दैवाने, सत्य हे आहे की त्यांना खूप लवकर कंटाळा येतो आणि एकही काम धड न करता ते चटकन दुसरे काम हातात घेतात. तथापि, मिथुन व्यक्तींना आयुष्याची सकारात्मक बाजू जास्त आवडते.

5. तुम्हाला खात्री आहे की तुम्ही हे हाताळू शकता?

मिथुन राशीतील सर्वोत्कृष्ट गुणांपैकी एक म्हणजे सर्वात वाईट आघातातून परत येण्याची त्यांची क्षमता. ते मजबूत मनाचे आहेत आणि आघातातून ते सावरून शकतात. अगदी हृदय भंग झालेली मिथुन व्यक्तीदेखील इतरांशी व्यवस्थित संवाद साधते आणि जीवनात पुढे जाते.

6. तुम्ही खोटे बोलत आहात का?

मिथुन व्यक्तींना कोणतीही हानी न पोहोचवणारे खोटे बोलणे योग्य वाटते. हे लोक साधारणपणे चटकन विचार करणारे, जुळवून घेणारे असतात आणि बर्‍याचदा त्यांच्याकडे बोलणे हे एकच कसब असते. संवादासाठी त्यांची प्रतिभा लक्षात घेता, त्यांना कथा सांगणे आणि इतरांना त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सोपे वाटते.

हे वाचा - मिळालेली संधी सोडायची नसेल तर कामाला लागा; कुंभ राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष?

7. तुम्ही तुमचा विचार पुन्हा बदलला आहे का?

मिथुन राशींच्या व्यक्तींना त्यांच्या वारंवार निर्णय बदलण्याबद्दल विचारले गेले तर ते नाराज होतात. त्यांच्यात दुहेरी स्वभाव असल्याचे म्हटले जात असल्याने, ते परस्परसंवाददेखील दर्शवते. मिथुन राशीचे चिन्ह खूप अनुकूल आणि लवचिक मानले जाते, कधीकधी दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे "असणे" हेदेखील यांचे वैशिष्ट्य ठरते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion