मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastushastra: गृहप्रवेशासाठी 'हा' मुहूर्त असतो सर्वोत्तम, घरात नांदते सुखशांती

Vastushastra: गृहप्रवेशासाठी 'हा' मुहूर्त असतो सर्वोत्तम, घरात नांदते सुखशांती

Vastushastra: गृहप्रवेशासाठी 'हा' मुहूर्त असतो सर्वोत्तम, घरात नांदते सुखशांती

Vastushastra: गृहप्रवेशासाठी 'हा' मुहूर्त असतो सर्वोत्तम, घरात नांदते सुखशांती

गृहप्रवेश करतानाही योग्य वार व तिथी कोणती असावी याचा ज्योतिषांकडून योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. या धारणेमुळेच पंचांगात मुहूर्त पाहिला जातो.

मुंबई, 9 ऑगस्ट:  कुठलंही कार्य व्यवस्थित पार पडावं म्हणून हिंदू धर्मात कुठलंही शुभ कार्य करताना दिवस आणि तिथीचा विचार आवर्जून केला जातो. महत्त्वाचं कार्य शुभ तिथीला करण्यावर सर्वांचा ठाम विश्वास असतो. शुभ मुहूर्तावर एखाद्या कामाची सुरूवात केली की, त्यात कुठलाही अडथळा येत नाही आणि सर्वकाही सुरळीत पार पडतं, अशी भावना अनेकांची असते. गृहप्रवेश करतानाही योग्य वार व तिथी कोणती असावी याचा ज्योतिषांकडून योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. या धारणेमुळेच पंचांगात मुहूर्त पाहिला जातो. गृहप्रवेश करताना ज्योतिषांच्या सल्लाशिवाय पुढे जाऊ नये, अस मानलं जातं. कारण गृहप्रवेशासाठी काही तिथी महत्त्वाच्या ठरतात तर काही तिथींना हे कार्य करायला नको, असं मानतात. ज्योतिषशास्त्रानुसार, माघ, फाल्गुन, वैशाख आणि ज्येष्ठ महिना गृहप्रवेशासाठी उत्तम असतो. नवीन घरात प्रवेश करताना यातील कुठल्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी या तिथी चांगल्या असतात. या तिथींना टाळा गृहप्रवेश- ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक कार्यासाठी शुभ वेळ आणि तिथी लक्षात घ्यायला हवी. ग्रह-नक्षत्र आदी बाबींचा विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. रविवार, मंगळवार आणि शनिवारचा दिवस गृहप्रवेशासाठी शुभ मानला जातो. तर, पौर्णिमा आणि अमावास्येला गृहप्रवेश करू नये, असं मानण्यात येतं. ज्योतिषशास्त्रानुसार, या तिथी गृहप्रवेशासाठी वर्ज्य आहेत. धार्मिक ग्रंथांनुसार, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि पौष महिन्यांत गृहप्रवेश करू नये. हेही वाचा: Daily Horoscope : नवीन वस्त्र, दागिना खरेदी करण्याची संधी; कसा जाईल आठवड्याचा पहिला दिवस! गृहप्रवेशाची तिथी ज्याप्रमाणे महत्त्वाची असते, तसंच गृहप्रवेशाच्या वेळी केल्या जाणाऱ्या पूजेचा प्रारंभ आणि शेवट होणं अत्यंत आवश्यक असतं. गृहप्रवेश करताना घराला फुलांच्या माळांनी सजवायला हवं. मुख्य दरवाजावर आंब्यांच्या पानांचं तोरण बांधावं. घरातील ईशान्य कोपऱ्यात आवश्यकतेनुसार चौकोनी जागेत नवग्रह, ग्रामदेवता, स्थान देवता यांना विधिवत स्थान देवून पूजा करायला हवी. शिवाय मुख्य दरवाजावर पाण्याने भरलेला कलश आणि दिवा लावायला हवा. याचदिवशी स्वयंपाकघरात सर्वप्रथम दूध उतू जाऊ द्यावं. हे शुभसंकेत मानले जातात. कुटुंबातील एखादं शुभ कार्य करताना शुभ मुहूर्त, शुभ दिवस व तिथी या सर्वांचा विचार करण्यात येतो. कार्य निर्विघ्न पूर्ण करता यावं म्हणून या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. हिंदू धर्मात गृहप्रवेशासह बारसं, जावळ, लग्न समारंभ अशा सर्व कार्यांसाठी शुभ मुहूर्त अत्यंत आवश्यक असतो. घराचं स्वप्न पूर्ण होत असताना योग्य तिथीला गृहप्रवेश झाला नाही तर कुटुंबातील लोकांचं आरोग्य, संपत्ती, वैवाहिक जीवनावरही वाईट परिणाम पडू शकतो, असा समज आहे.
First published:

Tags: Vastu

पुढील बातम्या