स्वप्नातलं घर साकारण्यात येत आहेत अनंत अडचणी; या 5 उपायांनी होईल इच्छा पूर्ण

स्वप्नातलं घर साकारण्यात येत आहेत अनंत अडचणी; या 5 उपायांनी होईल इच्छा पूर्ण

तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचे असेल आणि तुम्हाला अडचणी येत असतील तर आपण ज्योतिषशास्त्राच्या टिप्स वापरून पाहू शकता. त्याविषयी जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : स्वतःचे एक घर असावे, ज्यामध्ये आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने व शांततेने राहू, हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. आपले घर विकत घेण्याच्या किंवा बांधण्याच्या स्वप्नासाठी, एखादी व्यक्ती आयुष्यभराची पुंजी गुंतवते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण घर घेण्याचे स्वप्न इतक्या सहजासहजी पूर्ण होत नाही. कधी-कधी सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे येत राहतात. त्यामुळे कधी-कधी परिस्थिती आपल्याला साथ देत नाही. तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचे असेल आणि तुम्हाला अडचणी येत असतील तर आपण ज्योतिषशास्त्राच्या टिप्स वापरून पाहू शकता. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही (Astrology Tips) सोपे उपाय.

या उपायांमुळे आपले घराचे स्वप्न पूर्ण होईल -

1. सलग पाच मंगळवार गणपतीच्या मंदिरात जा आणि गणेशाला गूळ आणि गहू अर्पण करा. यामुळे तुम्हाला हळूहळू शुभ परिणाम मिळू लागतील आणि घर बांधण्यात किंवा खरेदी करण्यात येणारे अडथळे दूर होऊ लागतील.

2. विघ्नहर्त्या श्रीगणेशाची पूजा केल्याने घर खरेदीची समस्या दूर होतील. श्रीगणेशाच्या पूजेत दररोज लाल फुले अर्पण करा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा.

3. घर खरेदी करताना येणारे अडथळेही लाल पुस्तकाच्या उपायाने दूर होतात. यासाठी एका लाल रंगाच्या कपड्यात 6 चिमूटभर कुंकू, 6 लवंगा, नऊ बिंदी, 6 कवड्या आणि नऊ मुठभर माती घ्या. या सर्व वस्तू एका कपड्यात बांधून त्याची थैली बनवून वाहत्या पाण्यात विसर्जित करा.

4. अनेक प्रयत्न करूनही स्वप्नातील घर साकार होण्यात अडथळे निर्माण होत असतील तर यासाठी आपण कडुलिंबाच्या लाकडाचे एक छोटेसे घर बांधून ते एखाद्या गरीब मुलाला दाखवावे किंवा मंदिरात ठेवावे. असे केल्याने समस्याही दूर होतात.

हे वाचा - Locket Tips : लॉकेटचे असे तोटे पण असतात; गळ्यात घालताना हे नियम एकदा समजून घ्या

5. कधी-कधी असे होते की, कुंडलीत असलेल्या ग्रह दोषांमुळे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. यासाठी कुंडलीतील दोष घालवणे गरजेचे आहे, यासाठी एखाद्या अनुभवी ज्योतिषाची मदत घेऊ शकता.

हे वाचा -  महादेवाच्या अश्रूंपासून अशी झाली रुद्राक्षाची उत्पत्ती; धारण करण्याचे नियम समजून घ्या

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 11, 2022, 7:00 PM IST

ताज्या बातम्या