शनिची साडेसाती म्हणजे काय? कोणत्या राशींवर आहे सुरू, त्रास टाळण्याचे उपाय जाणून घ्या

शनिची साडेसाती म्हणजे काय? कोणत्या राशींवर आहे सुरू, त्रास टाळण्याचे उपाय जाणून घ्या

शनीच्या साडेसातीचे प्रत्येक चरण अडीच वर्षांचे असते आणि पहिल्या चरणात शनि पीडित व्यक्तीला मानसिक त्रास देतो. शनिच्या साडेसातीविषयी माहिती (Shani Sade Sati) आणि उपाय जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट:  ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा न्यायाचा ग्रह मानला जातो. शनीचे नाव ऐकल्यावरच अनेकजण घाबरतात, पण शनि सर्वांना त्रास देतो ही धारणा चुकीची आहे. चांगल्या कर्माचे चांगले फळ आणि वाईट कर्मांचे वाईट फळ देण्याचे काम शनी करतो. शनीच्या साडेसातीचे प्रत्येक चरण अडीच वर्षांचे असते आणि पहिल्या चरणात शनि पीडित व्यक्तीला मानसिक त्रास देतो. भोपाळचे ज्योतिषी आणि हस्तरेखा अभ्यासक विनोद सोनी पोद्दार सांगत आहेत शनिच्या साढेसातीविषयी माहिती (Shani Sade Sati) आणि उपाय सांगत आहेत.

शनीची साडेसाती सध्या तीन राशींमध्ये चालू आहे -

कुंभ राशीवर पहिलं चरण चालू आहे, जे पुढील साडेसहा वर्षे राहील. मकर राशीतील साडेसाती दुसर्‍या चरणात आहे, जी साडेतीन वर्षे टिकेल आणि धनु राशीतील साडेसाती शेवटच्या चरणात असून पुढील एक वर्ष राहील.

शनिच्या साडेसातीचे उपाय -

1. शनिदेव कर्मानुसार फळ देतात. दान करणे पुण्यकारक मानले जाते, त्यामुळे शनिवारी लोखंड, काळी उडीद डाळ, काळे तीळ किंवा काळे कपडे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.

2. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि शनि स्तोत्राचे पठण करा. यामुळेही शनिदेव प्रसन्न होतात.

3. शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलात काळे तीळ आणि लोखंडाचा खिळा मिसळून शनिदेवाला अर्पण करा.

4. हनुमानजींची पूजा करणे, हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनिदेवाकडून शांती मिळते आणि अशुभ परिणाम कमी होतात.

5. शनिवारी मासे, पक्षी आणि प्राण्यांना खायला दिल्याने शनीचा प्रभाव कमी होतो.

6. दररोज आपल्या क्षमतेनुसार असहाय्य आणि दुर्बल लोकांना दान केल्यास शनिदेवही शांत होतात.

7. दररोज सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी द्या.

8. तुम्ही मुंग्यांना पीठ आणि साखर देखील देऊ शकता.

9. रोज सूर्याला पाणी द्यावे. चुकीची किंवा अयोग्य कृती टाळा.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

10. शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळे मीठ आणि काळी मिरी वापरा.

11. शक्य असल्यास दर शनिवारी भाजलेले हरभरे माकडांना खायला द्यावे.

12. याशिवाय गोड चपाची/रोटीवर तेल लावून काळ्या कुत्र्यालाही खाऊ घालू शकता.

13. मांस आणि अल्कोहोलचे सेवन सोडा.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 1, 2022, 6:45 AM IST

ताज्या बातम्या