मराठी बातम्या /बातम्या /religion /या 5 राशीचे लोक खोट बोलण्यात असतात निपुण, सहजपणे जिंकतात एखाद्याचा विश्वास

या 5 राशीचे लोक खोट बोलण्यात असतात निपुण, सहजपणे जिंकतात एखाद्याचा विश्वास

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा राशीच्‍या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे खोट बोलण्‍यात माहीर असतात.

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा राशीच्‍या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे खोट बोलण्‍यात माहीर असतात.

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा राशीच्‍या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे खोट बोलण्‍यात माहीर असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 फेब्रुवारी: सहसा आपण आपल्या दैनंदिन जीवनात काहीतरी मोठे किंवा लहान खोटे बोलतो. पण खोटे बोलून कोणाचेही नुकसान होऊ नये, हेही आपण लक्षात ठेवतो. तथापि, असे काही लोक असतात जे नेहमी प्रत्येक गोष्टीत खोटे बोलतात आणि त्यांच्यात खोटे बोलण्याची अशी कला असते की लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा राशीच्‍या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे खोटे बोलण्‍यात माहीर असतात.

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीचे लोक त्यांच्या खोटेपणाने आणि बोलण्याने कोणालाही सहज हाताळण्यात पटाईत असतात. त्यांच्या दुटप्पी व्यक्तिमत्त्वामुळे हे लोक सत्याला अशा रीतीने फिरवून मांडतात की, प्रत्येक जण त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतो. त्यांच्यात बोलण्याची अशी कला आहे की, त्यांचे खोटे कोणीही पकडू शकत नाही.

तूळ

तूळ राशीचे लोक त्यांच्या वागण्यात खूप उदार असतात. त्यांच्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार असेल तर हे लोक खरे बोलण्याऐवजी खोटे बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. कारण या राशीच्या लोकांना कोणाचेही मन दुखावणे आवडत नाही. कोणी नाराज असेल तर खोटे बोलून हे लोक आपला दिवस खराब होऊ देत नाहीत.

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक खोटे बोलण्यातही निष्णात असतात आणि ते कुणालाही त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू शकतात. हे लोक कहाणी बनवण्यात इतके निष्णात असतात की समोरची व्यक्ती त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवते. असत्याला सत्य म्हणून मांडण्याची त्यांच्याकडे जबरदस्त कला आहे.

देवाची आरती करताना दिवा तेलाचा लावावा की तूपाचा ?

सिंह

सिंह राशीच्या लोकांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला आवडते आणि जर कोणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते थोडं खोटं बोलायलाही कमी पडत नाहीत. लोकांचे लक्ष त्यांच्याकडे राहावे म्हणून हे लोक खोटे बोलतात. जरी अनेक वेळा त्यांचे खोटे पकडले गेले तरीही ते आपला मुद्दा रेटतच राहतात.

कर्क

कर्क राशीच्या लोकांमध्ये खोटे बोलण्याची कलादेखील असते. या राशीचे लोक अशा प्रकारे खोटे बोलतात की समोरच्या व्यक्तीचा त्यांच्या बोलण्यावर सहज विश्वास बसतो. जरी ते सहसा खोटे बोलत नाहीत, परंतु जेव्हा ते असे करतात तेव्हा त्यांना पकडणे फार कठीण असते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion