मराठी बातम्या /बातम्या /religion /

Videsh Yatra : परदेशात जाण्याचा योग येण्यासाठी कुंडलीत पण या गोष्टी असाव्या लागतात

Videsh Yatra : परदेशात जाण्याचा योग येण्यासाठी कुंडलीत पण या गोष्टी असाव्या लागतात

परदेश प्रवासाचे रहस्य माणसाच्या जन्मपत्रिकेत- कुंडलीतही दडलेले असते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर सविस्तर सांगत आहेत, जाणून (Videsh Yatra) घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 09 ऑगस्ट : आपल्यापैकी अनेकजण परदेशात जाण्याची, परदेशात स्थायिक होण्याची, परदेशात फिरण्याची स्वप्ने पाहतात, पण ती स्वप्ने स्वप्नच असतात. नशिबात असेल तर आपल्याला परदेशात जाण्याची संधी नक्कीच मिळेल, असे आपण अनेकांकडून ऐकले असेल. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणारे अनेकजण असतात, पण त्यातच त्यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. मात्र, काही लोक असतात जे अनेक वेळा परदेशात जातात. असे का होते माहीत आहे का? परदेश प्रवासाचे रहस्य माणसाच्या जन्मपत्रिकेत- कुंडलीतही दडलेले असते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर सविस्तर सांगत आहेत, जाणून (Videsh Yatra) घेऊया. कुंडलीत परदेश प्रवासाचे योग - ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य उगवत्या स्थितीत असेल तर परदेश प्रवास होण्याची शक्यता असते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध आठव्या गृहात असेल किंवा शनी बाराव्या गृहात आला असेल. तरीही त्या व्यक्तीच्या परदेश प्रवासाची शक्यता वाढते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत लग्नेश बाराव्या गृहात असेल तर परदेश प्रवासाचे योगही तयार होतात. जर जन्मपत्रिकेत दशमेश आणि नवमांश हे दोन्ही चर परिवर्तनीय चिन्हे असतील तर ती व्यक्ती परदेशात प्रवास करू शकते. ज्योतिष शास्त्रामध्ये असेही मानले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अकराव्या किंवा बाराव्या भावात चंद्र असला तर त्या व्यक्तीला परदेश प्रवास होण्याची शक्यता असते. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत जन्म राशीच्या सहाव्या, सातव्या किंवा आठव्या घरात शुक्र ग्रह असला तरीही तुम्ही परदेशात प्रवास करू शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या, 7व्या किंवा 8व्या भावात राहु असेल तर त्या व्यक्तीचे परदेश प्रवास होण्याची शक्यता असते. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे कुंडलीच्या सहाव्या घराचा स्वामी जरी कुंडलीच्या बाराव्या गृहात स्थित असला तरी परदेश प्रवासाचे योग होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या