राशी आणि ग्रहांच्या स्थितीवरून कळतं आपले कोणते आजार वाढू शकतात; सर्व ग्रहांची माहिती

राशी आणि ग्रहांच्या स्थितीवरून कळतं आपले कोणते आजार वाढू शकतात; सर्व ग्रहांची माहिती

आपल्याला माहीत असेल की, शरीराच्या कोणत्या भागावर कोणत्या ग्रहाचा परिणाम होतो, तर आपण त्या ग्रहाशी संबंधित उपाय करून त्याचे वाईट परिणाम टाळू शकतो. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : आपल्या सूर्यमालेत 9 ग्रह आहेत आणि ज्योतिष शास्त्रानुसार या 9 ग्रहांचा आपल्या जीवनावर काही ना काही प्रभाव असतो. हे ग्रह केवळ मानवांवरच नव्हे तर पृथ्वीवर आढळणाऱ्या विविध प्रजाती, खनिजे आणि वनस्पतींवरही परिणाम करतात. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचा मानवी शरीराच्या काही भागांवर परिणाम होतो.

जर आपल्याला माहीत असेल की, शरीराच्या कोणत्या भागावर कोणत्या ग्रहाचा परिणाम होतो, तर आपण त्या ग्रहाशी संबंधित उपाय करून त्याचे वाईट परिणाम टाळू शकतो. ज्योतिषशास्त्र आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया कोणता ग्रह शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो.

कोणता ग्रह शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो?

सूर्य -

ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की सूर्याचे स्थान मानवी शरीराच्या मेंदूमध्ये आहे. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार सूर्य हा मेंदूवर राज्य करणारा ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मेष राशीमध्ये सूर्य उच्चस्थानी असेल तर तो व्यक्तीला शुभ फळ देतो, परंतु जर तूळ राशीमध्ये सूर्य दुर्बळ स्थितीत असेल तर ते अशुभ परिणाम होतात.

चंद्र -

चंद्राचा मानवी शरीरावर मन आणि इच्छाशक्तीवर प्रभाव पडतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चस्थानी असेल तर ते शुभ परिणाम मिळतात आणि वृश्चिक राशीमध्ये दुर्बळ स्थानी असेल तर ते अशुभ परिणाम देऊ लागते.

मंगळ -

मंगळाचा परिणाम डोळ्यांवर आणि शरीरातील रक्तावर होतो. जर आपल्या राशीमध्ये मंगळ शुभ नसेल तर तुम्हाला डोळे, रक्त आणि घसा संबंधित समस्या त्रास देऊ शकतात.

बुध -

बुध ग्रहाचा प्रभाव मानवी शरीराची पचनसंस्था, वायु व्यवस्था, दात आणि आवाज यावर पडतो. बुद्ध ग्रह मिथुन आणि कन्या राशीचा अधिपती ग्रह आहे. कन्या राशीमध्ये उच्च असेल तर तो शुभ असतो आणि मीनमध्ये दुर्बऴ स्थानी असल्यास वाईट परिणाम दिसतात.

गुरू -

या ग्रहाचा प्रभाव मानवी शरीरातील नाक आणि वायु प्रणालीवर होतो. याच्या प्रभावामुळे पित्त आणि चरबीशी संबंधित आजार वाढू शकतात. कर्क राशीत उच्च स्थानी असेल तर शुभ परिणाम मिळतात, पण मकर राशीत दुर्बळ स्थानी असल्यास वाईट परिणाम दिसू लागतात.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

शुक्र -

शुक्र ग्रह मानवी शरीराच्या जननेंद्रियांवर आणि त्वचेवर परिणाम करतो. जेव्हा हा ग्रह शुभ असतो तेव्हा तो आपल्या मूळ राशीला समाजात प्रसिद्ध आणि चांगले व्यक्तिमत्व बनवतो. मीन राशीत तो दुर्बळ असल्यामुळे शुभ फळ मिळते, पण कन्या राशीत दुर्बळ असल्यामुळे अशुभ फळ मिळते.

शनि

शनि ग्रहाचा प्रभाव मानवी शरीराच्या हाडांवर आणि नाभीवर पडतो. याशिवाय गुडघे, टाच, कफ आणि मज्जासंस्थेवरही शनिचा परिणाम होतो. मेष राशीमध्ये शनि अशक्त असणे अशुभ आहे, परंतु तूळ राशीमध्ये उच्चस्थानी असणे शुभ परिणाम देते.

राहू

राहूला ज्योतिषशास्त्रात अशुभ ग्रह मानले जाते. या ग्रहाचा प्रभाव डोक्याच्या काही भागात, आतड्यांमध्ये आणि तोंडात पडतो. मिथुन राशीत राहु उच्च स्थानी असेल तर शुभ फळ देतो, पण धनु राशीत खाली असल्यास राहू अशुभ आणतो.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

केतू

केतू ग्रहाचा प्रभाव घशापासून हृदयापर्यंत पडतो. कुंडलीत हा ग्रह अशुभ स्थितीत असल्यामुळे त्या व्यक्तीला पायाचा त्रास होतो. धनु राशीतील केतू शुभ फळ देतो आणि मिथुन राशीतील दुर्बळ केतू अशुभ फळ देतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 6, 2022, 6:00 PM IST

ताज्या बातम्या