मराठी बातम्या /बातम्या /religion /फेब्रुवारी 2023असं असेल लव्ह लाइफ, या राशींच्या व्यक्ती करू शकतात प्रपोझ

फेब्रुवारी 2023असं असेल लव्ह लाइफ, या राशींच्या व्यक्ती करू शकतात प्रपोझ

फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो.

फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो.

फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 2 फेब्रुवारी: प्रेमाच्या दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिन्याला विशेष महत्त्व आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, फेब्रुवारी महिन्यात एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं जातं. परंतु, ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात काही राशींच्या जातकांना प्रेमप्रस्ताव मिळू शकतात, तर काही राशींच्या जातकांचे नव्या जोडीदाराशी प्रेमसंबंध जुळू शकतात. काही जणांचा प्रेमभंग अर्थात ब्रेकअपही होऊ शकतो. ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम यांनी सांगितलं, की फेब्रुवारी महिना लव्ह लाइफसाठी सर्वोत्तम आणि प्रियकर-प्रेयसीमध्ये परस्पर समन्वय वाढवणारा असेल.`

  कुंभ : या राशीच्या व्यक्ती फेब्रुवारी महिन्यात प्रेयसीसोबत सहलीचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेयसीकडे प्रेम व्यक्त करू शकाल.

  पंचमुखी हनुमानाचं मंदिर तेही पाकिस्तानच्या कराचीत; मूर्तीचं आहे विशेष महत्त्व

  मकर : या राशीच्या व्यक्ती फेब्रुवारी महिन्यात रोमान्सचा आनंद लुटू शकतील. फेब्रुवारी महिन्यात प्रियकर-प्रेयसीच्या नात्यात गोडवा अनुभवायला मिळेल.

  मेष : या राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना प्रेममय असेल. तुम्हाला जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. या राशीच्या प्रियकर-प्रेयसींना आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील.

  वृषभ : या राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना प्रेमाचा बहार घेऊन येत आहे. प्रेम व्यक्त केलं जाण्याची शक्यता आहे. प्रेमात पडलेल्या तरुणांना प्रेयसीकडून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

  मिथुन : या राशीच्या व्यक्तींना कोणाला प्रपोज करायचं असेल तर त्यासाठी हा महिना खूप चांगला राहील.

  कन्या : या राशीच्या व्यक्ती फेब्रुवारी महिन्यात सहलीला जाण्याचं नियोजन करू शकतात. प्रपोज करण्यासाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा उत्तम आहे.

  वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना प्रेमासाठी सर्वोत्तम असेल. प्रपोझ करण्यासाठी मदत मिळेल. जोडीदारासोबत प्रेमळ संबंध कायम राहतील.

  कर्क : फेब्रुवारी महिन्यात या राशीच्या व्यक्तींना जोडीदाराकडून भरपूर प्रेम मिळेल. प्रेयसीकडून सहकार्य लाभेल.

  धनू : फेब्रुवारीचा पहिला आठवडा या राशीच्या व्यक्तींच्या प्रेम संबंधात चढ-उतार आणू शकतो. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेमसंबंध सुधारतील.

  तूळ : फेब्रुवारी महिना जोडीदारासाठी चांगला असेल. तुम्हाला कोणाला प्रपोझ करायचं असेल तर तुम्ही या महिन्यात प्रपोझ करू शकता. प्रियकराला प्रेयसीकडून सहकार्य मिळेल.

  सिंह : या राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यात पिकनिकला जाण्याचे योग आहेत. प्रियकर आणि प्रेयसी पिकनिकसाठी लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात. नवे प्रेमसंबंध निर्माणही होऊ शकतात.

  मीन : फेब्रुवारी महिना या राशीच्या व्यक्तींसाठी प्रेमाच्या दृष्टीने धमाकेदार असेल. प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना प्रपोझ करू शकतात.

  (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion